शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Wednesday 31 May 2017

पालकांनी नक्की वाचावा असा लेख


थोडंसं विचित्र वाटेल आणि पचणार ही नाही पण पोरगं चांगलं निघावं असं वाटत असेल तर यापुढे त्याला जिल्हा परिषद, बी एमसी किंवा इतर कोणत्याही खाजगी माध्यमाच्या मराठी शाळेत किंवा निदान एसएससी बोर्डाच्या शाळेत टाका..
कारणं बरीच आहेत. आणि नसेल पटत तर तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ..
अतिशय संताप आणणारे कृत्य करून एका पोलीस ऑफीसरच्या मुलाने आईच्या बॉडी शेजारी तिच्याच रक्ताने स्माईली काढून लिहले की मी हिला कंटाळलो होतो मला शोधा आणि लटकवा.. मला यात मुलाचा दोष काही वाटत नाही कारण त्यानी
 घेतलेल्या शिक्षणात वा संस्कारात त्याला चोरी करणारा मुलगा आईचा चावा का घेतो ही गोष्टच माहीत नाही. त्याचा शैक्षणीक बोर्ड चेक केल्यास लक्षात येईल की त्याच्यावर सीबीएससी आणि आय सी एस सी चे संस्कार असतील.. तिथे माणुसघाणी आणि संस्कार नसलेली पिढी घडवण्याचे जोरदार काम सुरू आहे.. विकृत इतिहासासोबत आपल्या कल्चर चा द्वेष करायला लावणारे अभ्यासक्रम आहेत असे ऐकिवात आहे. पोराला चांगला माणूस नाही बनवत तर एक मार्केटिंग प्रॉडक्ट् बनवून बाहेर काढायची स्पर्धा लागलीये. त्याची फळं आज पालक भोगत आहेत.
जागीतिकीकरणामुळे आपल्या देशात बऱ्यापैकी पैसे आले आणि सर्वच क्षेत्रात ते पैसे पसरले . मागची पिढी हमखास एसएससी बोर्डात शिकली होती आणि त्यामुळे ती मराठीच्या तासाला धडे गिरवून वा कविता म्हणून तत्कालीन शिक्षकाकडून संस्कारक्षम झाली होती.
 या पिढीने सेटल झाल्यावर नवीन स्वप्न पाहिली व आपल्या मुलांसह ते स्वता न झेपणाऱ्या अघोषीत स्पर्धेच्या युगात उतरले व बरबाद झालेले दिसत आहेत.
ही नवी पिढी डेंजर निर्माण झालेली आहे. त्यांना अंतर्वस्त्र ही हजारो रुपयांची लागतात. पैसे असतील तर त्यात काहीच गैर नाही पण मग बाहेरच्या कपड्यांचे विचारू नका. आपल्या आई बापाची वडापाव खायची मारामार होती वा तो घेताना दहा वेळा विचार करावा लागत असे हे त्यांना पटत ही नाही वा पचतही नाही. त्यांना मॅक्डोनाल्ड, बर्गर किंग, सबवे आणि बीबीक्यू बरे वाटते त्यात हजारो रुपये ही कमी पडतात. बाप एकटा कमवत असेल तर त्याचा हे किस
 पाडतात. चार कोटीचा फ्लॅट असेल तर आपण गरीब आहोत याची त्यांना स्ट्रॉंग फिलिंग होते. मागच्या वर्षातले पुमा, नायके, रिबॉक चे शूज त्यांना फेकून द्यावेसे वाटतात. दर वर्षी फॉरेन ट्रिप केली नाही तर त्यांची इज्जत कमी होते आणि काश्मीर ला कष्ट सोसून नेले तर त्यांची गळचेपी होते. मेट्रो सिटीज ची ही हालत आहे. हळू हळू हे लोण लहान शहरात पसरत चालले आहे.

सगळ्यात डेंजर आहे तो मोबाईल त्याने 3 × 6 इंचात यांना कैद करून ठेवले आहे. मैदानं ओस पडली आहेत आणि वेब वर्ल्ड बुलंद झाले आहे.
 बहिणाबाईंची कविता वाचून घडलेली आई यांना चुत्या वाटते आणि ते तसे बिनधास्त लिहतही असावेत. ती बिचारी भावना घेऊन आपलं स्वप्न म्हणून त्या पोराकडे पाहते आणि त्याच्या भविष्यासाठी आपलं मन मारते. आपल्या आई बापाने आपल्याला वेळ परत्वे झोडले होते आपण असे करायचे नाही या विचाराने हल्ली पालक मुलांना हातही लावत नाहीत आणि ती मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेत चोऱ्या आणि वार करत आहेत? कोणाला घडवतो आहोत आपण आणि कशासाठी याचा काही अंदाज आहे का?

आज जेव्हा बातमी वाचली तेव्हा मन व्यथीत झाले आणि कठोरही झाले. मी निष्ठुर झालो आहे.जसा त्या पोराने आईचा मर्डर केला तसा तो जर स्वताच फालतु गोष्टींच्या हट्टाने सुसाईड करून मेला असता तरी कोणी आश्चर्य बाळगायचे काही कारण नाही.. कारण याला आता खूप उशीर झाला आहे. यासमोर काऊन्सिलर आणि संत महंत ही काम करू शकणार नाहीत इतके हे भयानक प्रकार आहेत. ब्रँड ची स्पर्धा आहे त्यात कोट्यावधी जरी ओतले तरी कमी पडणार आहेत.

पोरांच्या कलेने घेऊनही फायदा नाही आणि फरफटत जाऊनही फायदा नाही. एकच सांगता येऊ शकेल ते निष्ठुर झाले आहेत तर तुम्ही भावनाशील राहून काय उपयोग आहे? तुम्ही निष्ठुर व्हा आणि त्यांना त्यांच्या वाटेला स्वावलंबनाने जाउद्या. ते विकृत झालेत असे वाटले तर कायद्याचा आधार घ्या आणि त्यात संकोच बाळगू नका. जी माऊली गेली तीने त्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असणार आणि तीच्या अपेक्षाचे ओझे त्या मुलाला पेलले नाही. त्याला तुम्हीच असे गुंतवले आणि आता कुंथुन उपयोग काय?

एकच अपत्य असणाऱ्या कुटुंबात हे प्रमाण प्रचंड आहे. यांना शेअर करायचे नसते आणि असे अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम घेऊन आल्यावर हे पैस्यांसाठी पालकांचे लिलावही करू शकतील.. कारण ही भूक मोठी लागलेली आहे आणि त्याची शांती कधीच होणार नाही. ही अशी उदा. पाहून असे वाटते की अपत्य जन्मालाच आली नाही तर बरी. निदान असा दाह तरी देणार नाहीत.  मी तर म्हणेन आताच म्हातारपणी एक काठी शोधून ठेवा कारण तुमची लाठी तुमच्यावरच चालली तर?

फार गंभीर विषय असून तो योग्यत्या पद्धतीनेच हाताळण्या शिवायवाय आज तरी दुसरा पर्याय आपल्या कडे उपलब्ध नाही
श्री रविकिरण पालवे, पाथर्डी अहमदनगर
मो. 7588607639