दैनंदिन कामासाठी किंवा गेम खेळण्यासाठी इंटरनेटवरील अनेक साईट्सचा वापर आपण करत असतो. यापैकी बऱ्याच साईट्सना आपल्याला वारंवार भेट द्यावी लागते. अशा वेळी प्रत्येक वेळेस साईटचं नाव (अड्रेस) टाईप करणं आणि ओपन करणं यामध्ये बराच वेळ जातो.यासाठी अशा काही ठराविक साईट्सचे पत्ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो.यासाठी इंटरनेट एक्सप्लोअररमधील फेवरेटीज या पर्यायाचा वापर होतो. एखादी साईट ओपन केल्यानंतर फेवरेटीजमधील _'ऍड टू फेवरेटीज'_या पर्यायावर क्लीक करा. त्यामुळे तुम्ही ओपन केलेल्या साईटवरील वेबपेजची लिंक त्यामध्ये सेव्ह होते. त्यानंतर तुम्ही पुन्हा काम करण्यासाठी बसाल त्यावेळी त्या साईटचा अड्रेस टाईप करण्याची आवश्यकता नाही. फेवरेटीजमध्ये गेल्यास तिथे याचा अड्रेस सापडेल.अनेक साईट्स स्टोअर करायच्या असतील तर त्यासाठी यामध्ये नावानुसार फोल्डरही बनवता येतात,त्यामुळे शोधायलाही सोपं जातं.
श्री. दिनेश म्हस्के, औरंगाबाद
मो. 8888339354