शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती


खाली दिलेली माहिती आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर या पानाच्या शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे.

ध्वजाची रचना
नाव
तिरंगा
वापर
नागरी वापर
आकार
:
स्वीकार
२२ जुलै ..१९४७


भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्यांचे अशोक चक्र आहे. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी उंचीचे प्रमाण : असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

रचना
ध्वजातील गडद भगवा, पांढरा हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :
रंग
भावना
गडद भगवा
त्याग
पांढरा
शांती
हिरवा
समृद्धी
निळा
चोवीस तास

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.
त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे

ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, पावित्र्याचा बोध होतो.
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा समृध्दीोचा बोध होतो.
- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता कालचक्राच त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे

भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली
भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.
संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरणे मना असते.
राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा त्यावर फडकवावा.
संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
केवळ प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

भारतीय राष्ट्रध्वजाने साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख
भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गूप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।" ह्या गीतास १९३८च्या काँग्रेस आधीवेशनात 'झेंडा गीत' म्हणून स्विकारले गेले.
स्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, "अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.
'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, "दुनिया की याद अपना ये बाँकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायक: महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , "... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे..."  पुणे आकाशवाणीवरुन प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून "देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरुंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || ||"अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.
स्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात "नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.
भारतीय संविधानात नमुद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते.

उंच राष्ट्रध्वज
भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत 360 फूट उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधीक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे. कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फुट उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.

( माहिती स्त्रोत- विकिपिडीया )

 वर दिलेली माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.