शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 2 April 2020

शालेय पोषण आहार शिल्लक साठा वाटप एक्सेल


१) फक्त पट व मागील शिल्लक साठा भरा.
२) वाटप अहवाल आपोआप तयार होईल.
३) इयत्ता निहाय प्रत्येक वर्गाची यादी तयार होते. फक्त विद्यार्थ्यांची नावे टाका, वर्गाची यादी तयार होईल.
४) शाळेचे नाव, पट, व शिल्लक साठ्याची माहिती इनपुट या पानावर भरावी. 


                  तांदूळ, सर्व कडधान्ये व मसाल्याचे पदार्थ वाटप करण्यासाठीची शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
                फक्त तांदूळ व सर्व कडधान्ये वाटप करण्यासाठीची शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Sunday 23 February 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी फरक बिल एक्सेल 2020


नमस्कार !

सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजीत राऊत साहेब यांची ठोस भूमिका आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचा पाठपुरावा यामुळे यावर्षी देखील महाराष्ट्रात प्रथम सांगली जिल्ह्यात वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली. आता शिक्षकांचे फरक बिल काढण्यासाठी एक्सेल घेऊन आलो आहे. आपल्याला निश्चितच उपयोग होईल.


वरिष्ठ वेतन श्रेणी एक्सेल कशी वापरावी या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

वरिष्ठ वेतन श्रेणी एक्सेल फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



एक्सेलचा वापर करून फरक बिल तयार करणे-
१) सुरुवातीला Input या पेज वरील तक्त्यात कर्मचाऱ्यांची सर्व माहिती भरून घ्यावी.
२) Difference या शिटवर कर्मचार्‍याच्या नावासमोर असणाऱ्या पिवळ्या चौकटीत Input या शिट वरील कर्मचाऱ्याचा अनुक्रमांक नंबर टाकून एंटर करा.
३) आपले फरक बिल तयार झालेले दिसते.

खाली दिसणार्‍या अनावश्यक कोऱ्या चौकटी घालवण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा-
१) Difference शिट ओपन करा.
२) REVIEW बटण मधून किंवा  शिटच्या नावावर राईट क्लिक करून Unprotect Sheet वर क्लिक करा.
३) पासवर्ड विचारला जाईल, pdshinde हा पासवर्ड टाका व OK करा.
४) जितक्या रो नको आहेत तितक्या रो डावीकडील रो नंबर सिलेक्ट करा व राइट क्लिक करून Hide करा, डिलीट करू नका.

महत्त्वाच्या सूचना-
१) सर्व शीट एकमेकांशी लिंक केल्या आहेत, त्यामुळे कोणतीही शीट डिलीट करू नये, असे झाल्यास एक्सेल काम करणार नाही.
२) Difference शीट अनप्रोटेक्ट केल्यानंतर शिट मध्ये इतरत्र कोठेही क्लिक करू नये. त्या ठिकाणचा एखादा फॉर्म्युलाला निघून गेला तर आपले कॅल्क्युलेशन चुकू शकते.
३) आपल्याला माहिती फक्त Input या पेजवरच भरायची आहे, इतरत्र ती आपोआप घेतली जात असल्याने इतर कोठेही काहीही टाईप करू नये.
४) संगणकाचा डेट फार्मॅट दिनांक,महिना,वर्ष ( DDDMMYYYY ) असाच असायला हवा. आपला संगणकाचा डेट फॉर्मेट महिना अगोदर व तारीख नंतर असा दिसत असेल तर कॅल्क्युलेशन चुकीचे येते.
५) सदर शिट संगणक किंवा लॅपटॉपवरच योग्यप्रकारे काम करेल. मोबाईलवर योग्य प्रकारे काम करेल याची खात्री देता येत नाही.

Tuesday 28 January 2020

दिव्यांगाचे / अपंगत्वाचे २१ प्रकार

ही माहिती PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


(१) पूर्णतः अंध - (Blindness)
दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे,
डोळे जन्मतः बंद असणे.
हालचाल करताना अडचणी येतात.
(२) अंशतः अंध - (Low Vision)
सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे.
दूरचे/जवळचे कमी दिसणे.
पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात.
उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे.
(३) कर्णबधिर - (Hearing Imapairment)
कोणताही आवाज ऐकू न येणे,
कमी ऐकू येणे,
(४) वाचा दोष - (Speech and Language Disability)
अडखळत बोलणे, स्पष्ट न बोलणे, शब्दांची तोडफोड करणे.
बोलताना शब्द मागे पुढे करणे, त्यात तारतम्य नसणे यालाच 'वाचा दोष' असे म्हणतात.
जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे.
टाळूला छिद्र असणे.
• clept palete.
(५) अस्थिव्यंग -(Locomotor Disability)
ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले' असे म्हणतात.
हालचाल करण्यास अक्षम.
सहज दिसणारे अपगत्व,
(६) मानसिक आजार - (Mental Illness)
असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन,
खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे.
भयानक स्वप्न पडणे.
भ्रम आभास असतो.
कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.
(७) अध्ययन अक्षमता -(Learning Disability)
वाचन, लेखन, गणितीय क्रियांत अडचण .
आकलन करण्यास अवघड जाते.
| अंक ओळखण्यात गोंधळ, अक्षर उलटे लिहणे, शब्द गाळून वाचणे.
काही मुलांमध्ये वर्तन समस्या असतात.
कमी संभाषण दिसून येते.
बुध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो.
विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात.
(८) मेंदूचा पक्षाघात - (Cerebral Palsy)
हालचालींवर नियंत्रण नसते.
अवयवांमध्ये ताठरता असते.
मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.
हालचालीची क्षमता कमी असते.
(९) स्वमग्न - (Autism)
स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
बदल न आवडणे, त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
खेळणी, वस्तू यांसोबत अधिक रमतात.
(१०) बहुविकलांग - (Multiple Disability)
एक किंवा जास्त अपंगत्व असते.
अशा ब-याच मुलांना चालताना, बोलताना, उभे राहताना, शि- श असे दैनंदिन कार्य करताना
समस्या असतात. (ADL)
(११) कुष्ठरोग - (Leprosy Cured Persons)
हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे.
त्वचेवर चट्टे, काळे डाग असतात.
हात, पाय, बोटे सुन्न पडतात.
(१२) बुटकेपणा - (Dwarfism)
सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असते.
(१३) बौधिक अक्षमता - (Intellectual Disability)
बौद्धिक क्षमता(IQ) ७० पेक्षा कमी असते.
दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार करण्यास कठीण जाते.
तार्किक प्रश्न सोडवताना अडचणी येतात.
नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी येतात.
काही मुलांना वर्तन समस्या असतात.
(१४) मांसपेशीय क्षरण - (Mascular Disability)
गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .
उभे होताना हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.
० मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .
(१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार - (Chronic Neurological Conditions)
मेंदूमध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.

(१६) मल्टिपल स्क्ले रोसिस - (Multiple sclerosis)
. हातापायातील स्नायूमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
स्नायूमध्ये शिथिलता येते व स्नायू काम करणे कमी करतात.
मलमूत्र क्रियांवरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.
(१७) बॅलॅसेमिया - (Thalassemia)
रक्ताची कमतरता
वारंवार रक्त पुरवावे लागते.
चेहरा सुकलेला असतो.
वजन वाढत नाही.
श्वास घेण्यात त्रास होतो.
वारंवार आजारी पडतात.
(१८) अधिक रक्तस्राव - (Hemophilia)
० हा आनुवांशिक रक्तविकार आहे.
रक्त वाहिन्यांतील बिघाडामुळे हा रोग होतो.
यामध्ये रक्तस्राव होतो.
जखमा झाल्यास अधिक रक्तस्राव होतो .
कधी कधी रक्तस्राव थांबत नाही.
रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.
(१९) सिकल सेल - (Sickle Cell Disease)
रक्ताचे प्रमाण कमी असणे.
रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात.
शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो.
हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.
(२०) ऍसिड अटॅक - (Acid Attack Victim)
• ऍसिड अटॅकमुळे चेहरा, हात, डोळे यांवर परिणाम होतो.
त्वचा भाजल्यासारखी दिसते.
चेहरा विद्रुप होतो.
(२१) कंपवात रोग - (Parkinson's Disease)
डोपामिन रेणूच्या अभावामुळे रोग्याला कंप सुटतो.
हालचाली संथ होतात, स्नायू ताठर होतात .
वजन कमी होत जाते.
५० ते ६० वयाच्या दरम्यान होतो.