शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन

हा १४ जुलै २०१७ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाचा सारांश होय.

✍🏻 २२ जुन २०१५च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र(PSM) नावाचा कार्यक्रम इयत्ता १ ली ते ८ वी साठी लागू करण्यात आला. हाच शासन निर्णय १४ जुलै २०१७ च्या शासन निर्णयाचे अधिष्ठान होय.

👉🏻सन २०१६-१७ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वीच्या भाषा व गणित विषयाच्या १) पायाभूत चाचणी (baseline test), २) संकलीत चाचणी-१ (summative test), ३) संकलित चाचणी -२ अशा  तीन चाचण्या घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांच्या ऐकूण गुणांची नोंद देशपातळीवर शैक्षणिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केले जातात. त्यामध्ये NCERT (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली) ही शासकीय संस्था NAS (National Achievement Survey) नावाचा शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल सादर करत असते तसेच प्रथम नावाची सेवाभावी (NGO) संस्था ASER (Annual Status of Education report) नावाचा शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल सादर करत असते. तसेच राज्यस्तरावर SCERT (विद्या प्राधिकरण अर्थात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे) ही संस्था SLAS (State Level Achievement Survey) नावाचा शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल सादर करीत असते. या विविध अहवालावरून भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या संपादणूकीचा स्तर टक्केवारीच्या रुपात प्रसिद्ध केला जातो व त्यानुसार पुढील दिशा व कार्यक्रम ठरवला जातो.

👉🏻सन २०१६-१७ मधील सरल प्रणालीमधील संकलित माहितीच्या आधारे आलेले निष्कर्ष विचारात घेवून सन २०१७-१८ मधील प्रगत चाचण्यांचे नियीजन करण्यात आलेले आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वप्न – राष्ट्रीय पातळीवरील विवध संस्थांच्या मुल्यामापनात महाराष्ट्राचा कक्रमांक प्रथम तीन मध्ये यावा.

 सन २०१७-१८ मधील प्रगती चाचण्यांचे स्वरूप–
१) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इ.१ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यासाठी चाचण्या असतील.
२) वर्षभरात ३ चाचण्या राज्य स्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवून घेतल्या जातील.
३) पहिली चाचणी ही पायाभूत चाचणी (baseline) असेल. ही चाचणी प्रथम सत्रात सुरुवातीला घेतली जाईल व या चाचणीत मुलभूत क्षमता व मागील इयत्तेपर्यंतच्या क्षमता यावर आधारित प्रश्न असतील.
४) दुसरी चाचणी  ही प्रथम सत्राच्या अखेरीस घेतली जाईल व ती संकलित चाचणी – १ (summative) या नावाने ओळखली जाईल. या चाचणीत मुलभूत क्षमता व प्रथम सत्रापर्यंतच्या क्षमता यांवर आधारित प्रश्न असतील.
५) तिसरी चाचणी ही संकलित चाचणी-२ या नावाने ओळखली जाईल व या चाचणीत मुलभूत क्षमता व प्रथम सत्रातील काही क्षमता व दुसऱ्या सत्रातील क्षमता यांवर आधारित प्रश्न असतील.
६) मुलभूत क्षमता म्हणजेच वाचन, लेखन, संख्याज्ञान (ऐकून संख्या लिहिणे, संख्यांची तुलना, संख्येचे विस्तारित रूप, संख्येतील अंकांची स्थानिक किंमत) व संख्यांवरील क्रिया (बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार) अशा एकूण १० क्षमतांचा समावेश केलेला आहे.
७) या मुलभूत क्षमता प्रथम भाषा व गणित या विषयासाठी व इ.१ली ते ८ वी साठी असतील.
८) या व्यतिरिक्त शिक्षकांना करावयाचे अकारिक मूल्यमापन (formative) करावे लागणार आहे.

कोणकोणत्या वर्गासाठी कोणकोणत्या विषयाची चाचणी होईल?
इ. १ ली व २ री साठी – प्रथम भाषा व गणित (२ विषय)
इ. ३ री ते ५ वी साठी - प्रथम भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा) व गणित (३ विषय)
इ. ६ वी ते ८ वी साठी - प्रथम भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा), गणित व विज्ञान (४  विषय)

कार्यवाही
१) चाचण्यांचे गुण शिक्षकांनी अप्लिकेशन मध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाईन भरायचे आहेत. हे अप्लिकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील.
२) शिक्षकांना ताबडतोब वर्गाचा निकाल कळेल.
३) वरिष्ठ कार्यालय निकालाची कोणतीही हार्डकॉपी मागणार नाही.

विद्यार्थी प्रगत झाला हे कसे ठरवणार (निकष)–
विद्यार्थ्याने वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्षमतांमध्ये एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत.

वर्ग प्रगत झाला हे कसे ठरवणार (निकष) –
वर्गातील सर्व विद्यार्थ्यानी वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्षमतांमध्ये एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत.

शाळा प्रगत झाली हे कसे ठरवणार (निकष)–
प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मुलभूत क्षमतांपैकीप्रत्येक क्षमतेमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत आणि एकूण गुणांपैकी ६० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास ती शाळा प्रगत समजली जाईल.

पर्यवेक्षण–
१) प्रत्येक चाचणीच्या वेळी प्रत्येक दिवशी प्रत्येक शाळेवर कोणी ना कोणी पर्यवेक्षीय किंवा वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहील व ती चाचणी त्याने घेतली असे समजले जाईल.
२) DIECPD चे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता तसेच शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख हे चाचणीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असतील.
३) १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णय नुसार केंद्र स्तरावर प्रगत शाळांतील उत्कृष्ठ शिक्षकांचा CRG ग्रुप समूह संसाधन गट बनवला जाईल.
४) पायाभूत चाचणी नंतर १ महिन्याच्या आत केंद्रप्रमुख CRG ग्रुप समूह संसाधन गट यांच्या मदतीने केंद्रातील सर्व शाळांच्या सर्व इयत्तांच्या सर्व विद्यार्थ्यांची पडताळणी चाचणी घेण्यात येईल.
५) दोन्ही चाचणीतील तफावत पहिली जाईल. तफावत २० टक्के पेक्षा जास्त असल्यास शिक्षकांना ज्ञापन (नोटीस) देवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी कालबद्ध उद्दिष्ट दिले जाईल.
६) शिक्षक व केंद्रप्रमुख दोघेही वास्तव मूल्यमापन करत नसतील तर राज्यस्तरावरून तपासणी करण्यात येईल.
७) पडताळणी नंतर मुलभूत क्षमतेत ७५ टक्के पेक्षा कमी गुण व वर्ग पातळीवरील क्षमतेत ६० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय याद्या बनवायच्या आहेत.
८) अशा अप्रगत मुलांना विशेष मदत करावयाची आहे.
९) अशी अप्रगत मुले प्रगत होई पर्यंत दर महिन्याला शिक्षकाने चाचणी घ्यावयाची आहे.
१०) अनियमित मुले प्रगत नसतील तर त्यांचा पण या यादीत समावेश करावयाचा आहे.
११) चाचणीच्या दिवशी गैरहजर राहणाऱ्या मुलांना शून्य गुण द्यावयाचे आहेत अन्यथा त्यांना शाळेत आणून वन्य दिवशी चाचणी घेवून गुणदान करावायचे आहे.
१२) अशी अप्रगत मुले प्रगत झाल्या नंतर त्यांना मासिक चाचणीतून वगळावयाचे आहे.

शिक्षांकासाठी प्रोत्साहनपर योजना –
१) एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस अभिनंदन पत्र
२) एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ६० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता वाढीच्या सूचनेसह उत्तेजनार्थ पत्र
३) एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ४० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रेरित करणारे पत्र
४)  एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ४० टक्के पेक्षा कमी गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता वाढीसाठी निश्चित उद्दिष्ट देणारे पत्र

गुणावता विकासाची जबाबदारी फिक्स– 
शिक्षक,मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, DIECPD चे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता तसेच शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन PAR (Performance Appraisal Report) निर्गमित केला जाईल त्यात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्यासाठी वर्गातील / शाळेतील विद्यार्थी संपादणूक हा दर्शक (इंडिकेटर) असेल तर पर्यवेक्षीय अधिकारी यांच्यासाठी कार्यक्षेत्रातील शाळा / विद्यार्थी यांची संपादणूकह हे महत्वाचे दर्शक असतील.

 चला तर शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे जबादारीने नियोजन करून अंमलबजावणी करूया महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या प्रगत बनवूया. देश घडवूया