शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Wednesday 31 May 2017

पालकांनी नक्की वाचावा असा लेख


थोडंसं विचित्र वाटेल आणि पचणार ही नाही पण पोरगं चांगलं निघावं असं वाटत असेल तर यापुढे त्याला जिल्हा परिषद, बी एमसी किंवा इतर कोणत्याही खाजगी माध्यमाच्या मराठी शाळेत किंवा निदान एसएससी बोर्डाच्या शाळेत टाका..
कारणं बरीच आहेत. आणि नसेल पटत तर तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ..
अतिशय संताप आणणारे कृत्य करून एका पोलीस ऑफीसरच्या मुलाने आईच्या बॉडी शेजारी तिच्याच रक्ताने स्माईली काढून लिहले की मी हिला कंटाळलो होतो मला शोधा आणि लटकवा.. मला यात मुलाचा दोष काही वाटत नाही कारण त्यानी
 घेतलेल्या शिक्षणात वा संस्कारात त्याला चोरी करणारा मुलगा आईचा चावा का घेतो ही गोष्टच माहीत नाही. त्याचा शैक्षणीक बोर्ड चेक केल्यास लक्षात येईल की त्याच्यावर सीबीएससी आणि आय सी एस सी चे संस्कार असतील.. तिथे माणुसघाणी आणि संस्कार नसलेली पिढी घडवण्याचे जोरदार काम सुरू आहे.. विकृत इतिहासासोबत आपल्या कल्चर चा द्वेष करायला लावणारे अभ्यासक्रम आहेत असे ऐकिवात आहे. पोराला चांगला माणूस नाही बनवत तर एक मार्केटिंग प्रॉडक्ट् बनवून बाहेर काढायची स्पर्धा लागलीये. त्याची फळं आज पालक भोगत आहेत.
जागीतिकीकरणामुळे आपल्या देशात बऱ्यापैकी पैसे आले आणि सर्वच क्षेत्रात ते पैसे पसरले . मागची पिढी हमखास एसएससी बोर्डात शिकली होती आणि त्यामुळे ती मराठीच्या तासाला धडे गिरवून वा कविता म्हणून तत्कालीन शिक्षकाकडून संस्कारक्षम झाली होती.
 या पिढीने सेटल झाल्यावर नवीन स्वप्न पाहिली व आपल्या मुलांसह ते स्वता न झेपणाऱ्या अघोषीत स्पर्धेच्या युगात उतरले व बरबाद झालेले दिसत आहेत.
ही नवी पिढी डेंजर निर्माण झालेली आहे. त्यांना अंतर्वस्त्र ही हजारो रुपयांची लागतात. पैसे असतील तर त्यात काहीच गैर नाही पण मग बाहेरच्या कपड्यांचे विचारू नका. आपल्या आई बापाची वडापाव खायची मारामार होती वा तो घेताना दहा वेळा विचार करावा लागत असे हे त्यांना पटत ही नाही वा पचतही नाही. त्यांना मॅक्डोनाल्ड, बर्गर किंग, सबवे आणि बीबीक्यू बरे वाटते त्यात हजारो रुपये ही कमी पडतात. बाप एकटा कमवत असेल तर त्याचा हे किस
 पाडतात. चार कोटीचा फ्लॅट असेल तर आपण गरीब आहोत याची त्यांना स्ट्रॉंग फिलिंग होते. मागच्या वर्षातले पुमा, नायके, रिबॉक चे शूज त्यांना फेकून द्यावेसे वाटतात. दर वर्षी फॉरेन ट्रिप केली नाही तर त्यांची इज्जत कमी होते आणि काश्मीर ला कष्ट सोसून नेले तर त्यांची गळचेपी होते. मेट्रो सिटीज ची ही हालत आहे. हळू हळू हे लोण लहान शहरात पसरत चालले आहे.

सगळ्यात डेंजर आहे तो मोबाईल त्याने 3 × 6 इंचात यांना कैद करून ठेवले आहे. मैदानं ओस पडली आहेत आणि वेब वर्ल्ड बुलंद झाले आहे.
 बहिणाबाईंची कविता वाचून घडलेली आई यांना चुत्या वाटते आणि ते तसे बिनधास्त लिहतही असावेत. ती बिचारी भावना घेऊन आपलं स्वप्न म्हणून त्या पोराकडे पाहते आणि त्याच्या भविष्यासाठी आपलं मन मारते. आपल्या आई बापाने आपल्याला वेळ परत्वे झोडले होते आपण असे करायचे नाही या विचाराने हल्ली पालक मुलांना हातही लावत नाहीत आणि ती मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेत चोऱ्या आणि वार करत आहेत? कोणाला घडवतो आहोत आपण आणि कशासाठी याचा काही अंदाज आहे का?

आज जेव्हा बातमी वाचली तेव्हा मन व्यथीत झाले आणि कठोरही झाले. मी निष्ठुर झालो आहे.जसा त्या पोराने आईचा मर्डर केला तसा तो जर स्वताच फालतु गोष्टींच्या हट्टाने सुसाईड करून मेला असता तरी कोणी आश्चर्य बाळगायचे काही कारण नाही.. कारण याला आता खूप उशीर झाला आहे. यासमोर काऊन्सिलर आणि संत महंत ही काम करू शकणार नाहीत इतके हे भयानक प्रकार आहेत. ब्रँड ची स्पर्धा आहे त्यात कोट्यावधी जरी ओतले तरी कमी पडणार आहेत.

पोरांच्या कलेने घेऊनही फायदा नाही आणि फरफटत जाऊनही फायदा नाही. एकच सांगता येऊ शकेल ते निष्ठुर झाले आहेत तर तुम्ही भावनाशील राहून काय उपयोग आहे? तुम्ही निष्ठुर व्हा आणि त्यांना त्यांच्या वाटेला स्वावलंबनाने जाउद्या. ते विकृत झालेत असे वाटले तर कायद्याचा आधार घ्या आणि त्यात संकोच बाळगू नका. जी माऊली गेली तीने त्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असणार आणि तीच्या अपेक्षाचे ओझे त्या मुलाला पेलले नाही. त्याला तुम्हीच असे गुंतवले आणि आता कुंथुन उपयोग काय?

एकच अपत्य असणाऱ्या कुटुंबात हे प्रमाण प्रचंड आहे. यांना शेअर करायचे नसते आणि असे अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम घेऊन आल्यावर हे पैस्यांसाठी पालकांचे लिलावही करू शकतील.. कारण ही भूक मोठी लागलेली आहे आणि त्याची शांती कधीच होणार नाही. ही अशी उदा. पाहून असे वाटते की अपत्य जन्मालाच आली नाही तर बरी. निदान असा दाह तरी देणार नाहीत.  मी तर म्हणेन आताच म्हातारपणी एक काठी शोधून ठेवा कारण तुमची लाठी तुमच्यावरच चालली तर?

फार गंभीर विषय असून तो योग्यत्या पद्धतीनेच हाताळण्या शिवायवाय आज तरी दुसरा पर्याय आपल्या कडे उपलब्ध नाही
श्री रविकिरण पालवे, पाथर्डी अहमदनगर
मो. 7588607639

सचिन तेंडुलकर यांना पत्र..


चला हवा येऊ द्या मधे अरविंद जगताप यांनी लिहिलेलं आणि सागर कारंडे ने वाचलेलं सचिन साठीचं पत्र !
प्रिय सचिन
खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा होती. पाकिस्तानचा अब्दुल कादिर तुला म्हणाला की नव्या बॉलरला काय मारतोस? मला मारून दाखव. आणि अब्दुल कादिरच्या पुढच्या ओव्हरमध्ये तू चार सिक्स आणि एक फोर मारला होतास. शप्पथ सांगते माझ्या लग्नात एवढ्या हौसेने केलेले गुलाबजाम त्यादिवशी फिके पडले. लोक तुझ्या खेळाचंच जास्त कौतुक करत होते. खूप राग आला होता मला तुझा.
पहिल्या रात्री अगदी लाजून बसले होते. नवरा आला. खूप वेळ मी मानच वर केली नाही. नवरा म्हणाला, तेंडूलकरने धुतल्यावर अब्दुल कादिरने सुद्धा एवढा वेळ मान खाली घातली नव्हती. पुढे पुढे तर नवरा सारखं सारखं तुझ्याविषयीच बोलू लागला. तुला वयाचे अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कशी कार मिळाली. नीट दाढी मिशा फुटायच्या आधीच तू कशा ब्लेडच्या जाहिराती करायला लागलास वगैरे. खर खोटं माहित नव्हतं. मला कळण्याचा तो भाग नव्हता. मला फक्त तुझ्याविषयी राग होता. शेजारी मी एवढी नटून थटून बसलेली असायचे आणि नवरा टीव्हीकडे बघत असायचा. त्याच्यासाठी क्रिकेट म्हणजे फक्त सचिन तेंडुलकर विरुध्ध बाकीचे देश. मी एवढी मन लावून स्वयंपाकघरात रोज नवीन पदार्थ करायचे आणि नवरा ताटाकडे न बघता टीव्ही बघत तुझ्या फटकेबाजीचं कौतुक करायचा. मी लग्नात कोणती साडी नेसले होते हे आता नवऱ्याला आठवतसुद्धा नाही. पण तू पहिला सामना सुनील गावस्करने दिलेले pad घालून खेळला होतास हे त्याला पक्कं ठाऊक असतं. माझा नवरा महापालिकेत आहे. पण तो ऑफिसला जाताना तू मैदानावर आभाळाकडे बघत जातोस तसाच जातो.
खर सांगते सचिन मला क्रिकेट मधलं काही कळत नव्हतं. अगदी नाईलाज म्हणून मी क्रिकेट बघायचे. नवरा बघतो म्हणून. आता तू प्रत्येकासाठी अगदी घरातलाच आहेस म्हणून सांगते, कित्येकदा नवऱ्याने आपल्याला जवळ घ्यावं असं वाटायचं आणि नवरा नेमकं टीव्ही जवळ असायचा. विचार कर किती राग येत असेल तुझा. खर सांगते आधी नवरा वेडा वाटायचा मला. पण हळू हळू मलाच वेड लागलं क्रिकेटचं. सासू सासऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता नाकी नऊ येतात आमच्या. तुला तर खेळताना शंभर कोटी भारतीयांच्या अपेक्षेचं ओझं होतं. नेहमीच. मला आठवतं तू खेळत असलास की रस्त्यावर ट्राफिक नसायचं. या वेळात पटकन जाऊन आपलं काम करता येईल असं सगळ्यांना वाटायचं. पण तू खेळत असताना घराबाहेर कोण पडणार? सगळे घरीच. तू रस्तेच काय काळजाचे ठोके पण थांबवायचास रे बाबा. तू खेळत असताना माझा नवरा एकदा घरातल्या नव्याकोऱ्या सोफ्यावर बसला होता रेलून. आणि नेमका तू आउट झालास. माझा नवरा त्यानंतर तू खेळत असताना त्या सोफ्यावर कधीच बसला नाही. माझे सासरे सासू आजारी होती म्हणून पहिल्यांदा चहा करत होते उत्साहात आणि तुझं पहिलं शतक पूर्ण केलंस तू नेमकं. त्या दिवशीपासून तू खेळायला आलास की माझे सासरे न चुकता स्वतः चहा करतात. माझ्या सासूचे डोळे आनंदाने भरून येतात. आधी सासऱ्याना चहा करताना बघून यायचे. नंतर तुला बघून. तू भल्या भल्या लोकांना पार बदलून टाकलस.
मथ्यू हेडन तुझं कौतुक करताना असं म्हणाला होता की मी देव पाहिलाय. तो भारतासाठी चौथ्या क्रमांकावर batting करतो. पण बऱ्याचदा तू आम्हाला आमच्यातला एक वाटतोस. कुठलीही चांगली गोष्ट घडली की तुला वडलांची आठवण होते. तू आकाशाकडे बघतोस. तुझी आई तुझ्यासाठी प्रार्थना करते. एक मराठी माणूस आश्चर्याने ‘आईला’ म्हणतो. तुझ्यासारखंच.
सचिन, तू निवृत्त झालास तो दिवस ठळकपणे आठवतो. तुझी २२ यार्डातली २४ वर्ष चाललेली घोडदौड त्या दिवशी थांबणार होती. भारताचे दोन खेळाडू batting करत होते. पण पहिल्यांदा हा देश आपलेच खेळाडू आउट व्हायची वाट बघत होता. कारण त्यांना आपल्या सचिनला खेळताना बघायचं होतं. तू आलास. खेळलास. अचानक तुझा झेल गेला. वेस्ट इंडीजच्या सामी ने तो पकडला. पण त्याला आनंद काय होणार? तो बिचारा रडायला लागला तू आउट झालास म्हणून. शत्रूलाही कौतुक असणारा खेळाडू होतास तू. आफ्रिकेच्या हंसी कोनियेने सांगितलंय, त्याला gary कर्स्टनला बऱ्याचदा आठवण करून द्यावी लागायची की तू कव्हरमध्ये फिल्डिंग करायला उभा आहेस, सचिनचं कौतुक करायला नाही. माझ्या नवऱ्याला मी काय म्हणाले ते लक्षात नसतं. पण तुझ्याबद्दल कुणी कुणी काय म्हणून ठेवलंय ते सगळं पाठ आहे.
इथून पुढे लोक कधीतरी असं घडेल की तुझा एखादा रेकॉर्ड मोडला जाईल. पत्रकार तुला विचारतील, सर तुमचा रेकॉर्ड मोडला. कसं वाटतंय? आणि तुझ्या चेहऱ्यावर प्रश्न असेल नेमका कोणता रेकॉर्ड? शंभर शतक करणाऱ्या माणसाने काय काय लक्षात ठेवायचं?
पण माझ्या एक गोष्ट मात्र आयुष्यभर लक्षात राहील सचिन. निवृत्त झाल्यावर भाषण करताना तू म्हणालास, बायकोसोबतची पार्टनरशिप माझी सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप आहे. त्या दिवशी आधीच डोळे पाणावले होते पण ते ऐकलं आणि रडायलाच लागले मी. माझाच काय जगातल्या प्रत्येक बायकोचा चुकून तुझ्यावर कधी राग धरला असेल तो आनंदाश्रुत वाहून गेला.
माझा नवरा गल्लीत अंडर आर्म खेळताना सगळी तुझीच नक्कल करतो. तुझ्यासारख्या धावा काढणं त्याला जमत नाही बाकी सगळं जमतं. पण धावा काढणं नाही जमलं तरी बायकोचं असं तुझ्यासारखं मनमोकळ कौतुक करायला त्याला जमो एवढीच अपेक्षा.
असं म्हणतात की जगात दोन प्रकारचे batsman आहेत . एक प्रकार म्हणजे तेंडुलकर आणि दुसर्या प्रकारचे म्हणजे बाकी सगळे. सचिन तू ज्याचा देवावर विश्वास नाही त्या माणसालाही हात जोडायला लावलेस. देव आहे असं म्हणायला लावलंस. तू आमच्यासाठी देव आहेस. मेल्यावर आम्हाला खरा देव कसा असतो दिसेल कदाचित. पण जिवंतपणी आम्ही तुझ्याकडेच देव म्हणून पाहतो. आणि आम्हाला सगळ्यात प्रिय एकच मंत्र आहे. ‘ सचिन सचिन’ हा मंत्र आम्हाला आजही जिंकण्याचं बळ देतो. कारण या मंत्राचा चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. तू निवृत्त झालास आणि नवऱ्याने क्रिकेट बघणं सोडून दिलं. मीच आता कम्प्युटरवर जुनी match लावते. पुन्हा एकदा घरात तोच उत्साह येतो. खर सांगते जुने सामने बघतानाही तू आउट होऊ नये एवढच वाटत राहतं. आपोआप हात जोडले जातात. राष्ट्रगीत जसं कितीदाही ऐकलं तरी आपण ज्या जोशात उभे राहतो तसं तुझा खेळ बघताना नेहमीच एक उत्साह असतो. लव्ह यु सचिन!!!

– अरविंद जगताप.

आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु कराल ?



 1. सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.

2. आपल्या मोबाइलमध्ये अॅप ओपन केल्यावर English भाषेची  निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.

3. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.

4. ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.

5.  उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे।

6. कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.

7. ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता.

8. यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.
✍✍✍✍✍✍✍✍✍
श्री.शेख सर, तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक,सोलापूर
मो. 9011418885

नवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता

नवीन नियमाने 1ते 10 वर्ग प्रत्येक वर्गाला 45 तासिका दररोज 8 तासिका पहली 40 मिनिटाची सात तासिका 35 मिनिटाची राहतील परिपाठ 10 मिनिट दररोज दररोज 8 तासिका शनिवारी 5 तासिका एकण =45 शैक्षणिक वर्ष 2017- 2018 पासून लागू

*सन २०१५- २०१६ ची संचमान्यता प्रत मिळाली असल्यास
*दि. २८ आँगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ हे जी.आर.बघावे म्हणजे आपल्याला कळेल,
इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) १ ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)
२) २० ते ३० ------- ---- ०१
३) ३१ ते ६० ------- ---- ०२
४) ६१ ते ९० ------- ---- ०३
५) ९१ ते १२० ------- --- ०४
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या

*६वी ते ८ वी साठी
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ३ ते ३५ ------- ०२
२) ३६ ते १०५ ------- ०३
३) १०६ ते १४० ---- ०४
४) १४१ ते १७५ ---- ०५
५) १७६ ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी , ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .
*९वी व १०वी साठी
४० विद्यार्थी मागे एक शिक्षक
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) २ ते ६० ------- ०३
२) ६१ ते १०० ---- ०४
३) १०१ ते १४० ---- ०५
४) १४० ते १८० ---- ०६
५) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी व १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर
*फक्त ८ वी साठी
३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ०० ते १९ ---- ००
२) २० ते ३५ ---- ०१
३) ३६ ते ७० ---- ०२
४) ७१ ते १०५ ---- ०३
५) १०६ ते १४० ---- ०४
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत
६ वीपासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM
१) १६ ते ३० --- ०१ --- ००
२) ३१ ते ४५ --- ०१ --- ०१
३) ४६ ते ६० --- ०२ --- ०१
४) ६१ ते कितीही -- ०३ --- ०१
अशी असेल
*मुख्याध्यापक पदासाठी
९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी २८/३/२०१५ ,८/१/२०१६ ,व १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक -- २० होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे अपील करावे .
🔴विषयनिहाय तासिका 🔴
🔴विषयनिहाय तासिका 🔴
🔴(इ.१ली ,२री )🔴
1- प्रथम भाषा = 15
2- इंग्रजी =6
3 - गणित=12
4 - कार्यानुभव _4
5- कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =45
🔴इ.३री,४थी 🔴
1 - प्रथम भाषा =12
2 - इंग्रजी =6
3 - गणित =8
4 - प अभ्यास (भाग १ व २)=9
5 - कार्यानुभव =4
6 - कला/संगीत =3
7 - शारीरिक शिक्षण = 3
एकूण = 45
🔴(इ.५ वी )🔴
1- प्रथम भाषा =6
2 - द्वितीय भाषा =6
3 - तृतीय भाषा =6
4 - गणीत =7
5 - प अभ्याअभ1 = 6
6 - प अभ्याअभ2 = 5
7- कार्यानुभव =3
8 - कला/संगीत =3
9 - शारीरिक शिक्षण =3
एकूण =45
----------------
🔴(इ.६वी,८वी )🔴
1- प्रथम भाषा = 6
2 - द्वितीय भाषा =6
3 तृतीय भाषा =6
4 - विज्ञान = 7
5- गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 6
7 - कार्यानुभव = 3
8 - कला/संगीत = 2
9 -शारीरिक शिक्षण = 2
एकूण = 45
---------------🌷इ;9 वी 🌷
1)प्रथम भाषा -6
2)दिव्तिय भाषा व संयुक्त भाषा -6
3)तृतीय भाषा -6
4)गणित.बीजगणित"भूमिती -7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान-7
6)सामाजिक शास्त्र -7
इतिहास व राज्यशास्त्र 4 ताशिका
भूगोल 3 ताशिका
शालेय श्रेणी विषय
7)आरोग्य व शारीरिक शिक्षण -2
8)स्वविकास व कलारसास्वाद -2
9)संरक्षण शास्त्र व एम.सी.सी स्कॉउट गाईड.नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा.एन.सी सी-2 * एकुण 45 तासिका  🍎🍑🍓🍏🍓🍓  🍎🍓  🌷🌷🌷10वी 🌹🌹 * 1)प्रथम भाषा -6 2)द्वितीय भाषा किंवा संयुक्त-4 3)तृतीय भाषा -6 4)माहिती संप्रेषण तंत्रज्ञान - 2 5)गणित (बीजगणित व भूमिती -7 6)विज्ञाण व तंत्रज्ञान -7
7)सामाजिक शास्त्र -6 ईतिहास व राज्यशास्त्र 3 तासिका भूगोल व अर्थशास्त्र 3 तासिका *शालेय श्रेणी विषय* 8)आरोग्य व शारीरिक शिक्षण -2 9)व्यक्तिमत्व विकास -2 10)कार्यशिक्षण/पूर्वव्यवसायिक अभ्यासक्रम -2 11) समाजसेवा /स्कॉऊट गाईड /नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे


* स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

*भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

*सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

*सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

*लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

*लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

*लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

*मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

*कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

*तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

*विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

*लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

*लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

*जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

*लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

*आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

*म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल.. 

ध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली

|| ध्यान (Meditation) ||

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
             
*ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

*स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........

 *वाईट सवयी नष्ट होतात

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
   
*मन आनंदी होते

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

   
*कार्यक्षमता वाढते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

*झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

       
*दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
           
*विचारशक्ती वाढते

             
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

*ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

वाडगेभर निर्जीव अन्न :


"अ बाउल ऑफ डेड फूड" या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा 'रेडी टू ईट' पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात 'रेडी टू ईट' पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )
'रेडी टू ईट' पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ....
कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :
अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, "डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो." असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !
ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे - आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

'रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो', 'खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत', 'असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?'

 - या सगळ्याला एकच उत्तर आहे, 'ब्रॅण्डिंग'!
'ब्रॅण्डिंग'ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!
आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.
अरे हो हल्ली 'रेडी टू ईट व मेक' पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.
अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.
आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.
आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.
ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

रुपाली पानसे -
मो. 9623448798

कंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका

1 ) कंबर  दुखी

१)  जायफळ  पाण्यात  उगळा  +  तिळाचे  तेल  मिक्स  करा.  नंतर  गरम  करा.  थंड  करून  दुखणा-या  जागी  लावा.
२)  आल्याचा  रस  +  मध  दिवसातून  २/३  वेळा  घ्या.
३)  गरम  पाण्याने  शेक  द्या.
४)  हलका  मसाज  करा.
५)  बर्फाने  शेकवा.
६)  रोज सावकाश  व्यायाम / योगासने करा.
७)  नियमित  प्राणायाम  करा.
८)  प्रथम  तेल  लावा  नंतर श्वास  रोखून  माँलिश  करा.  असा  उपाय  शरीराचा  कोणताही  भाग /  अवयव  दुखत  असेल  तर  नक्कीच  करा. गुण  येतोच.
९)  विश्रांति  घ्या.
१०)  दोन्ही  तळव्यांच्या  मागील  बाजूवर   (अंगठा  व  तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर  करा.
११)  पोट  साफ  राहू  द्या.
१२)  सर्वच  उपाय  एकाचवेळी  करू नका.
१३)  नियमित  सकाळी  कोमट  पाण्यातून  व  संध्याकाळी  कोमट  दुधातून  १ / १ चमचा  मेथी  दाणे  घ्या.

   आरोग्य  संदेश

व्यायाम  व  अँक्युप्रेशरने  व्हा  सुखी,
माझ्या  सल्याने  थांबेल  कंबर  दुखी.


2) मान   दुखी

कारणे  -----

जास्त  थंडीमुळे,  झोपेत  अवघडणे,  लचकणे,  झटकन  वळणे,  डोक्यावर  जास्त  ओझे  घेणे,  स्नायुंना  त्रास  होणे, इ.

उपाय  -----

१)  शेक  द्या. ( गरम  पाणी  /  वाळू  )
२)  हळद  +  चंदन  लेप  द्या.
३)  लसूण  रस  +  कापूर  मिक्स  करून  लावा.  जास्तच  आग  झाल्यास  पाण्याने  साफ  करून  खोबरेल  तेल  लावा.
४)  कोमटच  पाणी  प्या.
५)  सुंठ  उगाळून  लेप  द्या.
६)  प्रथम  तेल  लावा.  नंतर  भरपूर  श्वास  नाकाने  घेऊन  रोखून  धरा.  मानेचे  व्यायाम  सावकाश  करा.  किंवा  हाताने  हलकेसे  माँलिश  करा.
७)  असे  १० / १५  वेळा   रिकाम्या  पोटी  सकाळी  व  संध्याकाळी  करा. नक्कीच  गुण  येतो.
८)  अँक्युप्रेशर  करा  म्हणजेच  हातपाय  घासा  व  प्रेस  करा.
९)  वरील  योग्य  तेच  उपाय  करा.

      #     आरोग्य   संदेश     #

निरोगी   राहण्यासाठी   द्या  तुम्ही  झोकून.
गुण  येण्यासाठी   मात्र  श्वास  धरा  रोखून.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी



(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

स्वतः साठी एवढं तरी करा...


१)  रिकाम्या  पोटी  हातपाय   प्रेस  करा,  गरम  करा.
२)  भरपूर  टाळ्या  वाजवा.
३)  हातापायाचे  तळवे  जेथे  दुखत  असतील  तेथे  पंपिंग  करून  दाब  द्या.
४)  पायाखाली  लाटणे  घेऊन  त्यावर  तळवे  फिरवा. ( अँक्युप्रेशर  करा )
५)  आठवड्यातून  एकदा  तरी  तेलाने  सर्व  शरीराला  माँलिश  करा.
६)  नियमित  प्राणायाम  करा. ( भस्त्रिका,  कपालभाती  व  अनुलोम  विलोम  )
७)  सकाळी  एक  /  दोन  ग्लास  कोमट  पाणी  प्या.
८)  सकाळी  जास्तच  नाष्टा  करा.  ८  ते  ९  या  वेळेत.
९)  दुपारी  मध्यम  आहार  घ्या.  १  ते  २  या  वेळेत.
१०)  संध्याकाळी  गरज  असेल  तरच  जेवा. किंवा  हलका  आहार  घ्या.  ७  ते  ८  या  वेळेत.
११)  नाभिचक्र  मूळ  जागी  ठेवा.
१२)  पाय  गरम,  पोट  नरम,  डोके  शांत ठेवा.
१३)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका.
१४)  चौरस  आहार  घ्या.
१५)  जास्तीत  जास्त  शाकाहारी  रहा.
१६)  Black  Tea  च  प्या.
१७)  जेवणात  कोशिंबीर  (  कच्चे  )  खा.
१८)  ध्यानधारणा  करा.
१९)  सकारात्मक  वर्तन / विचार  ठेवा.
२०)  सत्य  बोला. समाजसेवा  करा. 
२१)  भरपूर  ऐका  मात्र  कमी  बोला.
२२)  नैसर्गिक  जीवन  जगा.
२३)  गरज  असेल  तर  घरगुती औषधे  ( आजीबाईचा  बटवा )  घेणे.
२४)  पोट  साफ  ठेवणे.
२५)  वात,  पित्त  व  कफ  प्रवृत्ती  ओळखून  उपचार  करा.

Tuesday 30 May 2017

फेव्हरेटीझ्


दैनंदिन कामासाठी किंवा गेम खेळण्यासाठी इंटरनेटवरील अनेक साईट्सचा वापर आपण करत असतो. यापैकी बऱ्याच साईट्सना आपल्याला वारंवार भेट द्यावी लागते. अशा वेळी प्रत्येक वेळेस साईटचं नाव (अड्रेस) टाईप करणं आणि ओपन करणं यामध्ये बराच वेळ जातो.यासाठी अशा काही ठराविक साईट्सचे पत्ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो.यासाठी इंटरनेट एक्सप्लोअररमधील फेवरेटीज या पर्यायाचा वापर होतो. एखादी साईट ओपन केल्यानंतर फेवरेटीजमधील _'ऍड टू फेवरेटीज'_या पर्यायावर क्लीक करा. त्यामुळे तुम्ही ओपन केलेल्या साईटवरील वेबपेजची लिंक त्यामध्ये सेव्ह होते. त्यानंतर तुम्ही पुन्हा काम करण्यासाठी बसाल त्यावेळी त्या साईटचा अड्रेस टाईप करण्याची आवश्यकता नाही. फेवरेटीजमध्ये गेल्यास तिथे याचा अड्रेस सापडेल.अनेक साईट्स स्टोअर करायच्या असतील तर त्यासाठी यामध्ये नावानुसार फोल्डरही बनवता येतात,त्यामुळे शोधायलाही सोपं जातं.

श्री. दिनेश म्हस्के, औरंगाबाद
मो. 8888339354


खरी किंमत

बोधकथा क्रमांक - 2
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? 

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " 

आणि 

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला .... 

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

 माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. 

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. 

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... 

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो "यातले सगळ्यात किमती नाणे उचल" ..

आणि 
मी रोज चांदीचे नाणेच उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......आणि असे रोज घडते

हे ऐकल्यावर विद्वानाला प्रश्न पडतो की आपल्या मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून का उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले "मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाहीस ? असला मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला घराच्या आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी पुर्ण भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला .. 

मुलगा म्हणाला
 "पिताश्री ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी राजा हा खेळ बंद करेल ..

 त्यांना जर मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या .. 

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!

 काय वाटते ????

*समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो*

*काहीजण त्यातुन मोती उचलतात*,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

*हे विश्व पण सर्वांसाठी* सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..

शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड

शालासिद्धी ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी.

सौजन्य:- म.रा.प्राथ.शिक्षक परिषद


क्षेत्र -१

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.


क्षेत्र -२

अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .

क्षेत्र -३

विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास


१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.


क्षेत्र -४

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन


१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.

क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .


क्षेत्र -६
समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.

क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .

*वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी कराव*

नवीन 9 तासांचे वेळापत्रक

नविन 9 तासाचे वेळापत्रक

परिपाठ -           10.30 - 10.50
तासिका -1        10.50 - 11.30
ता.-2.               11.30 - 12.05
ता.-3.               12.05 - 12.40

लहान सुट्टी         12.40 - 12.50

ता. -4.              12.50 - 1.25
ता. -5.              1.25 - 2.00
ता. -6.               2.00 - 2.35

मोठी सुट्टी.          2.35 - 3.20

ता. 7.                3.20 - 3.55
ता. -8.               3.55 - 4.30
ता. -9.               4.30 - 5.05





















शैक्षणिक मोबाईल एप्स

Educational Apps


मुलांना आवश्य मोबाईल हाताळू दया कारण ती आजची गरज आहे.
॥"मुलांना मोबाईल फार आवडतो... ?॥
पण काळजी घ्या..गेम खेळण्याचे फार भयंकर तोटे आहेत.त्यापेक्षा अनेक शैक्षणिक अॅपस् आहेत प्लेस्टोर्समध्ये ते डाऊनलोड करा व बनवा तुमचा मोबाईल इलर्निंग मोबाईल.. अन्‌ खेळू द्या त्यांना थोडेसे..॥
काही शैक्षणिक अॅपस् ची यादी देतो.. खालीलप्रमाणे...
(मुले,पालक व शिक्षकांसाठी उपयक्त)

1. Kidsmath
गणित प्रक्रिया बालकांकरीता उपयुक्त
2. Barakhadi 2.0
बाराखडी साधे शब्द
3. Animal ABC
4. eschool4scratch
खेळातून मनोरंजन, शब्दसंपत्तीत वाढ
5. Animal 4D
आभासी प्रतिमा दाखवणे
6. Hello English
इंग्रजी सराव करीता उपयुक्त
7. Attendance taker
विद्यार्थी हजेरी
8. Anatomy 4D
मानवी शरीर अंतर्बाह्य रचना
9. Space4D
अंतराळ अभ्यास
10. Marathi kids
धुळपाटी सारखा वापर, वर्णमाला, अंकओळख, गणित, भाषा वापर
11. 50marathistories
50 छान छान गोष्टी आहेत
12. Android Balwaadi
मराठी, इंग्रजी वाचन लेखन
13. Writings ABC 123
इंग्रजी मुळाक्षरे कसे लिहावे
14. Kings of Math
वर्ग ५ चे गणित
15. Jay Maharashtra
थोर व्यक्तींची माहीती
16. Numbers
अप्रगत मुलांसाठी
17. Kinemaster
व्हिडिओ बनवू शकतो
18. How to make origami
कागदापासून वस्तू कशा तयार कराव्यात याचे चलचित्र
19. Google Maps
एखाद्या ठिकाणचा नकाशा पाहणे
20. Kids paint
विद्यार्थ्यांकरीता ड्राईंग
21. Educational Games
एकत्रित मनोरंजन खेळ
22. Google Earth
गूगल मॅपला सबस्टिट्यूट
23. Solar system
सर्व प्लॅनेट विषयी माहिती देता येते
24. Quiz maker
ऑफलाइन टेस्ट बनविणारे apps
25. Tricks for GK
प्रत्येक गोष्ट लक्षात राहण्यासाठी tricks
26. Anmol goshti
बालकांकरीता कथा
27. Marathi dictionary
समानार्थी शब्द
28. English Marathi Dictionary
इंग्रजी मराठी शब्द
29. Khagol vishw
भूगोल teaching साठी उपयुक्त
30. ezpschool
पाठपुस्तक pdf दाखवणे
31. Google translation
कोणत्याही भाषेतून भाषांतर
32. Foxit pdf
पुस्तकांसोबत interactions
33. Starchart
अवकाश अभ्यासासाठी उपयुक्त
34. Gurukul study
इ 1 ली ते 8 वी अभ्यासक्रमातील प्रश्न
35. Gom gr
शासन निर्णय
36. TeamViewer
37. Mirrorop
38. Share it
39. Mobizen
40. Airdroid
हे सर्व apps स्क्रिन कास्ट करीता
41. Google Googles
चित्र वरुन searching करा
42. Skype
व्हिडिओ कॉल अत्युत्तम 2G वर पण
शैक्षणिक
43. Math tips and tricks
गणितातील क्लृप्त्या
44. Vedik Math
45. Xallaps multiplication
46. – – Addition
47. – – greater than less than
48. Math formulae
49. Clock learning
50.eduDroid
51. amazing india in hindi
52. shivaji & Maratha empire
53. ABC handwriting free
54. kid science : biology
55. Fun with Dots – kids learning
56. 35 pictures stories for kids
57. my class shedules
58. sky guide for kids
59. olympaid quiz
60.  Nasa appष
61. Chota bheem
62. Indian currancy game
63. math challenge
64. science game for kids
65. kelvin
66. kids gk test
67. science experiment with water
68. Abacus
69. Match and spell
70. Animal planet
71. Brain Trainer special
72.English conversation
73.Lanets space facts
74.Fun easy learn english
75.Evo memo
76.1St std marathi
77. Cursive lite
78. Fun do science
79. colourful vitamins
80. hindi writing
81. Junior science master
82. Creative kids
83.marathi mulalshare
84. Kids craft ideas
85. kidzoo
86. kids experiments
87.sage kids
88. kids encyclopedia
89. forts of maharashtra
90. Tux4kids
गणिताचा सराव
91. Hello English
नविन शब्दांचे उपयोजन सोदाहरण
92. Qr droid
Q R code ला scan करणेकरीता, अभ्यासक्रम पुस्तके या qr कोड सह आलेली आहेत.
93. Picsart
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
94. Blendcollage
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
95. Way 2 SMS
फ्रि SMS जगभर
96. Paytm
डेबिट कार्ड वरुन रिचार्ज
97. Vidmate
98. Tubemate
यू ट्यूब व्हिडीओ डाऊनलोडर
99. Kingsoft office
100. Office suit
Ms office चा वापर
101. Marathi Greetings
शुभेच्छापत्र बनविणे
102. Passportpics
पासपोर्ट बनविणे
103. Lumosity
बुद्धि ला खुराक
104. Flowers color
106. Flash card for kids
107. Gadwat
किल्ले
108. Khara mitr
109. Varnmala lite

110. Kids doodle
111. Zebra paint
113. Pratiyogita mantra
114. Table
115. Flute
116. Piano
117. Dumpster app
मोबाइल चे recycle bin
118. Google Drive
मोफत १५ जीबी
119. Text fairy
फोटोवरचा मजकूर कॉपी करा
120. Sidebook
आकर्षक PDF reader
121. Grade stalk
ऑनलाइन अध्ययन
122. Apps backup & restore
123. Android tutorial
124. S2G Excel
एक्सल मराठीत शिका
125. Telegami
अँनिमेशन व्हिडीओ
126. Varshik Niyojan

'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.

लायब्ररीज, एअरपोर्ट, सायबर कॅफे आणि कॉफि शॅाप इ. सार्वजनिक ठिकाणचे कॉम्प्युटर वापरण्यासाठी सुरक्षित असु शकतात जर आपण खालील काही सोपे नियम वापरले तर -

1) तुमीच logon information सेव्ह करु नका -

प्रत्येक वेळी "log out" करुनच बाहेर यावे. डायरेक्ट साईट बंद करु नये किंवा एका साईट वरुन दुस-या साईटवर जाऊ नये. (बरेच प्रोग्रॅम्स खासकरुन सोशल नेटवर्किंग साईटस, वेब मेल आणि इन्टंट मॅसेंजर मध्ये automatic login features असते त्यात तुमचे युजर नेम आणि पासवर्ड सेव्ह होते.) या साईटवर लॉगिन करतांना हा ऑप्शन Disable करावा.

2) कॉम्प्युटरवर sensitive information असतांना सोडून जाऊ नका –

कॉम्पयुटरवरील काम बंद करतांना चालु असलेले सर्व प्रोग्रॅम् बंद करावेत आणि सर्व विंडोज बंद कराव्यात.

3) कॉम्प्युटरमधील सर्व tracks काढून टाका -

इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मॉझीला फायर फॉक्स वापरत असाल तर लॉग आऊट झाल्यानंतर एक्सप्लोरर बंद करतांना सर्व हिस्ट्री क्लिअर करवी. सर्व delete temporary Internet files आणि webpage history डिलीट करावी.

Passwords stores करणारे features काढून टाका -

एक्सप्लोरर मधील "remembers" your passwords हा पर्याय बंद करावा.

Internet Explorer मध्ये Tools मेन्यु मधुन Internet Options वर क्लिक करावे.

नंतर Content tab -  Settings मधुन User names on passwords and forms  हा check box मधील पर्याय काढून टाकावा.

4) तुमच्यावर लक्ष ठेवले जात नसल्याची खात्री करा –

जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असलेले कॉम्पयुटर वापरत असतात तेव्हा तुमच्या हातांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याठी कॅमेरा लावलेला नाही याची खात्री करावी. यांचा वापर करुन तुमचा पासवर्ड रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

5) सार्वजनिक ठिकाण sensitive information वापरु नका -

नेहमी लक्षात ठेवा सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट वापरत असतांना अतिशय गुप्त असललेली माहितीचा वापर करु नका कारण ब-याचदा बशा काम्प्युटर मध्ये keystroke चे काही प्रोग्रॅम्स आधिच इन्स्टॉल केलेले असतात आणि ते आपण टाईप करीत असलेली सर्व माहिती स्टोअर करुन ठेऊ शकतो. मग जरी तुम्ही एक्प्लोरर मधील सर्व हिस्ट्री जरी काढून टाकली तरी त्याचा काही उपयोग होत नाही.

जर तुम्हाला खरोखर सुरक्षितता हवी असेल तर अश्या ठिकाणी तुमच्या क्रेडीट कार्ड चा नंबर टाईप करु नका किंवा आर्थिक व्यवहार करु नका.

श्री. दिनेश मस्के, औरंगाबाद
मो. 8888339354

राजा आणि कुत्रा

बोधकथा क्रमांक - 1

एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.
राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो." राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.

त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय." प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."

घन आकृती महत्त्वाची सूत्रे

========

1) इष्टीकाचित्ती  -

पृष्टफळ   =   [ 2lb + 2bh + 2lh ]

घनफळ    = l × b × h
----------------------------------------------
2)  घन

पृष्टफळ    =   6 × l²

घनफळ     = l × l × l  = l³
---------------------------------------------
3) वृत्तचित्ती / दंडगोल

वकृ पृष्टफळ  = 2πrh

एकूण पृष्टफळ = 2πrh  + 2πr²

घनफळ         = πr²h
----------------------------------------------
4)   शंकू  

वकृ  पृष्टफळ    =  πrl

एकूण पृष्टफळ  = πr² + πrl
                        = πr ( r + l )

घनफळ      = 1/3  × πr²h
----------------------------------------------
5) गोल

पृष्टफळ   =  4πr²

 घनफळ   = 4/3 × πr³
----------------------------------------------
6) अर्धगोल

वक्र पृष्टफळ = 2πr²

पृष्टफळ एकूण   = 3πr²

घनफळ    = 2/3 × πr³
---------------------------------------------
7)  पिरॉमिड

पृष्टफळ  =( पाया क्षे. )+1/2×lbn
                  (  n  -  पाया एकूण बाजु)

घनफळ   =  1/3 ×(पाया क्षे. )×h
----------------------------------------------
8)  बकेटाकृती घन

घनफळ  = 1/3×πh(r² +rR + R²)

r  - वरची ञिज्या ,R - खालची ञिज्या

==========================
📌  वरील सर्वच घनाकृतीत ....

l  -  लांबी / तिरकस उंची
b  - रूंदी
h  - उंची
r  - ञिज्या
π  - 22/7  or  3.14

==========================
श्री .प्रविण बनकर मो.8856046142

सामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1

1) सरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?

अ) जोसेफ मॅझीन ब) नेपोलियन क) बिस्मार्क ड) चर्चिल

2)’अ‍ॅट द फिट ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) जवाहरलाल नेहरू ब) मौलाना आझाद क) वल्लभभाई पटेल ड) राजेंद्र प्रसाद

3) अरब-इस्त्रायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी कशी राहिली?

अ) अरब राष्ट्रांना अनुकूल ब) अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे क) रशियाच्या भूमिकेप्रमाणे ड) इस्त्रायलला अनुकूल

4) पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल कोण होते?

अ) लॉर्ड माऊंट बॅटन ब) लियाकत अली क) बॅ.महम्मद अली जिना ड) महम्मद इकबाल

5) इंदिरा गांधी सर्वप्रथम किती साली पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या?

अ) 1964 ब) 1965 क) 1966 ड) 1967

6) खालीलपैकी कोणाचे नाव गरीब हटाव या घोषणेशी जोडता येईल?

अ) मोरारजी देसाई ब) इंदिरा गांधी क) राजीव गांधी ड) लाल बहादूर शास्त्री

7) चले जावच्या चळवळीत महात्मा गांधींनी भारतातील जनतेस कोणता मंत्र दिला होता?

अ) मरा किंवा जिंका ब) करा किंवा मरा क) जिंका किंवा मरा ड) मारा किंवा जिंका

8) खालीलपैकी कोणास मुस्लिम लिगचे संस्थापक म्हणून ओळखतो?

अ) नवाब सलिमुल्ला ब) बॅ. मोहम्मद अली जिना क) आगा खान ड) सर सय्यद अहमद खान

9) गांधी आणि लेनीन या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) वसंतराव तुळपुळे ब) नारायणराव लोखंडे क) राममनोहर लोहिया ड) श्रीपाद अमृत डांगे

10) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता?

अ) दापोलीजवळ आंबावडे ब) इंदुरजवळ महू क) मराठवाड्यात औरंगाबाद ड) रत्नागिरीजवळ चिखली

*उत्तर* : (1 - क), (2 - ड), (3 - अ), (4 - क), (5 - क), (6 - ब), (7 - ब), (8 - अ), (9 - ड), (10 - ब)

फास्ट वर्गमूळ कसे काढावे ?

1 मिनीटात वर्गमुळ काढण्यासाठी पुढील दोन Chart फक्त एकदा वाचा सहज पाठ होवून जातील..

==============================
 एक मिनीटात वर्ग शोधा....
Tricks..

 chart -1              chart -2
1²  =   1  |         10²    =  100
2²  =   4  |         20²    =  400
3²  =   9  |         30²    =  900
4²  =  16 |         40²   =1600
5²  =  25 |         50²   = 2500
6²  =  36 |         60²   = 3600
7²  =  49 |         70²   = 4900
8²  =  64 |         80²   = 6400
9²  =  81 |         90²   = 8100
10² = 100.  |   100²  = 10000
============================
एक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....

उदाहरणार्थ.....

2116  या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....

Step -1
*एकक स्थानचा अंक आधी शोधा
16 च्या  एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.
*वर्गमुळात एकक स्थानी  4 किंवा  6 असेल

Step -2
*दशक स्थानचा अंक शोधने

*Chart-2 पहा....
2116 ही संख्या   कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....
1600   -  2500 च्या दरम्यान येते.
म्हणजे ... दशक स्थानी 4 असेल .

म्हणजे वर्गमुळ   -  44  किंवा  46 असेल .      
Step -3
आता ....2116  ही संख्या ....
1600  व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....

तर 2116 ही संख्या  2500 च्या जवळ आहे

म्हणजे ....44  वा 46  पैकी   वर्ग 2500 च्या जवळ  46 चा असेल .

म्हणजे .....
√2116  =  46
=============================

श्री .प्रविण बनकर मो.8856046142

Plicker's card

मित्रांनो आज मी तुम्हांला छान App बद्दल  माहिती देणार आहे.
त्या अगोदर आपण plickers वेबसाईटला भेट द्या.
https://www.plickers.com
आपल्या Email ने login करा.
plickers dashboard वर आपल्याला अनेक टँब दिसतील.
1) Live
2) Liberary
3) Class
4) cards
5) Report
6) help

लायब्ररी: मधून विद्यार्थी  मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करु शकता save ठेवू शकता.
class -: विद्यार्थी संख्येनुसार  विद्यार्थ्यांची नावे plicker कार्ड क्र. विद्यार्थ्यांना  Assign करु शकता.
cards tab-: चा वापर करून आपण  कार्ड डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येइतके print घेऊ शकता.(print शक्यतो white  पेपरवर घ्या व लँमिनेशन करणे टाळा.)

Plicker App download


ॲप वापरण्याची पद्धत -:
प्रथम मोबाईल वरुन plicker App open करा.

class select करा.

ॲप मधील *लायब्ररी टँब* वरून प्रश्न सेट करा.

live view टँब ला 📷click करा.

विद्यार्थी automatically प्रश्नाप्रमाणे update  होतात.
आपल्याला  त्वरीत विद्यार्थी निहाय निकाल मिळतो.
विद्यार्थ्यांचे response सुद्धा नोंदवले जातात.

कार्ड डाऊनलोड करण्यासाठी टच करा.

Plickers संदर्भात व्हीडीओ पाहण्यासाठी टच करा.


टिप-: विद्यार्थी  रोस्टरची pdf बनवून print घेता येते. विद्यार्थी  Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो.
हे ॲप खूप छान आहे वेळेची बचत व अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापर व मनोरंजकता येते.

धन्यवाद
प्रदीप चासकर
आंबेगाव पुणे
9421858116/9657608354

महत्वाचे मोबाईल अँप्स

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

 WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

 ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त

Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह

  SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !

  PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

 PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह

Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट

 Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह ..

Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप

Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !

SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने

Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर!

VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा
MXPlayer : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये !

ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय !

Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा

Go Launcher / Nova Launcher  : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा!    PrinterShare, PrintHand : यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !

Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप

Softkey Enabler / Simple Control: काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !

World of Goo : भन्नाट गेम नक्की खेळून पहा

Sprinkle Island : साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर

 Smash Hit : येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम

 mmVector : उत्तम गेम

Clash of Clans : ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्‍य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत!

ManuGanu : साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत

Flipkart, Snapdeal, Amazon, eBay  , : ऑनलाइन शॉपिंग

 Facebook Lite : कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप

Hike Messenger : भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !

Opera Max : इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन

Google Indic Keyboard : भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड

Unified Remote : तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !

Tablet Remote, RemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !!

mmAZ Screen Recorder : फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप

Automatic Call Recorder : फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !

TeamViewer : तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा !

AppLock : अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप

Google Goggles : QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा

SkyMap / StarChart : ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्‍यांचा वेध !

ISS Detector : International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप

Paytm, FreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा.
*कलात्मक ऍप्स*


_तुमच्याकडे कलात्मकता आहे आणि तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल; तर ही काही अॅप्स तुम्हाला तुमची कलात्मकता वाढवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. काहीवेळा तितकीशी खास नसलेली काही अॅप्स जास्त रेटिंग घेऊन वर आलेली असतात अन् त्यामुळे काही भन्नाट अॅप्स मागे पडतात. त्यामुळे अशाच काही खास अॅप्सची माहिती..._


*_फोटोमॅथ:_*

इमेजेसमध्ये असलेली गणितं सोडवण्याचं काम सोपं करायचं असेल, तर फोटोमॅथ तुमच्यासाठी बरेच उपयुक्त आहे. इमेजच्या स्वरूपात असलेल्या गणिताला कॅमेऱ्याने टिपून, या अॅपच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतं. हे गणित कॅमेऱ्याने टिपले की, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. या अॅपमध्ये कॅलक्यूलेटर देखील आहे.


*_डांगो:_*

तुम्ही ईमोजीचा भरपूर वापर करत असाल, तर हे अॅप तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कुठल्याही प्रकारचे मेसेजिंग अॅप चालू केल्यावर डांगो आपलं काम सुरू करतं. तुम्हाला येत असलेल्या मेसेजेसवर योग्यप्रकारे नजर ठेवून, त्या संभाषणासाठी महत्त्वाचे असलेले ईमोजी आणि जिफ्स वापरण्यासाठी तुम्हाला मदत करायचं काम या अॅपमुळे अत्यंत सोपं होतं.


*_इंकइट_*

अनेक कादंबऱ्यांचा संग्रह असलेलं अफलातून अॅप म्हणजे इंकइट! वेगवेगळ्या धाटणीतील या कादंबऱ्या वाचण्यासाठी विनामूल्य आहेत. इंटरनेट नसताना वाचण्यासाठी तुम्ही या कादंबऱ्या डाउनलोड करून ठेऊ शकता. ज्या शैलीतील वाचन तुम्ही नियमितपणे करता, त्या शैलीतील इतर पुस्तकांचे प्रस्ताव तुम्हाला सतत देणारे हे अॅप वाचनासाठी निश्चितच फायदेशीर आहे.


*_मूडकास्ट:_*

तुमच्या रोजच्या दिनक्रमावर लक्ष ठेवण्याचं काम हे अॅप करतं. नेहमीच्या सवयींवर लक्ष ठेऊन, नव्या चांगल्या सवयी लावण्यास हे अॅप मदत करतं. थोडक्यात तुम्ही या अॅपवर तुमची रोजची डायरी लिहू शकता. फेसबुकला जोडले जाऊन मूडकास्ट तुमच्या एफबी पोस्टनुसार तुमच्या मूडवर लक्ष ठेवण्यासही सक्षम आहे. याच्याच मदतीने तुमच्या सवयी बदलण्यास ते हातभार लावतं.


*_पॉडकास्ट गो:_*

अँड्रॉइड फोनसाठी सर्वोत्तम पॉडकास्ट प्लेअर असं या ऍपला म्हणता येईल. तीन लाखाहून अधिक पॉडकास्ट्स त्यांच्या विविध श्रेणींनुसार तुम्हाला इथे मिळतील. यात ट्रेंडिंग आणि प्रसिद्ध पॉडकास्ट्स शोधणंही फार सोपं आहे. तुम्ही अर्धवट सोडलेले शो किंवा नवे शो यांची वेगळी यादी तयार करायची सुद्धा सोय यात आहे.

Monday 29 May 2017

छान छान गोष्टी

34 गोष्टी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.   Click Here

 किंवा

गोष्ट डायरेक्ट डाऊनलोड करण्यासाठी नावावर क्लिक करा.
1. करोडीमल

2. महामूर्ख न्हावी

3. महत्वाकांक्षी मित्र

4. मुंगुस आणि बाई

5. मूर्ख पंडित

6. राजाचे आवडते पोपट

7. साप आणि उंदीर

8. स्वार्थी पती - पत्नी

9. खरे बोलण्याचे फळ
 
10. पशु पक्षी आणि वटवाघूळ

11. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

12. दोन श्रीमंत

13. हावरटपणाचे फळ

14. मन्याचा वाजला बँडबाजा

15. आरसा हसला आरसा रडला

16. आभाळ पडलं पळा पळा

17. जादुगार ससोबा बेरकी कोल्होबा

18. कपटी जबडा हसून उघडा

19. कासव आणि हंस

20. सिंह, उंदीर आणि मांजर

21. मूर्ख उंदीर

22. मी खीर खाल्ली तर...

23. मुलांची परीक्षा

24. राजा भिकारी

25. संगतीचा परिणाम

26. संशयी स्वभाव

27. सवय सुटली

28. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

27. सिंह झाला साधू

30. पंप्या आणि टंप्या

31. सुगरण आणि माकड

32. स्वार्थी मनाचे कारस्थान

33. उपकाराची फेड

34.वाघाचा वाढदिवस

चला रंग भरुया.

नमस्कार !

मुलांना चित्रे काढणे व त्यात रंग भरणे खूपच आवडत असते.पण कमी वयोगट असणारी मुले चित्रे काढू शकत नाहीत. त्यांच्यासाठी तयार चित्रे दिली तर ?
खाली अशाच प्रकारची चित्राची पुस्तके दिली आहेत. एका पुस्तकात भरपूर चित्रे आहेत. फक्त पुस्तकाच्या नावावर क्लिक करा की झाले, पुस्तक डाऊनलोड होईल. त्यातील हव्या त्या चित्राची प्रिंट काढून द्या.


पुस्तक -१ Disney Coloring

पुस्तक-२ Dogs Coloring

पुस्तक-३ Easter Coloring

पुस्तक- ४ Flowers Coloring


























.

संगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे.

मित्रहो,
       आपण संगणकामध्ये विविध महत्त्वाची माहिती एखाद्या फोल्डरमध्ये जतन करून ठेवतो , पण काही वेळा ही माहिती दुसऱ्याने आपला संगणक ओपन केला तर ती महत्वपूर्ण माहिती ती व्यक्ती पाहू शकते , जर आपला फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड असेल तर दुसरी व्यक्ती ती माहिती पाहू शकत नाही.
       संगणकातील फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करण्यासाठी खूप पद्धती आहेत , मी एक सोपी पद्धत सांगणार आहे. त्यासाठी आपल्या संगणकात एक software पाहिजे त्याचे नाव winrar आहे जे zip file साठी असते.
       आपल्या PC मध्ये windows ३२ Bit चा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून १.८८ mb चा software डाऊनलोड करून घ्या.

                                  येथे क्लिक करा

        आपल्या PC मध्ये windows ६४  Bit चा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून २.०८  mb चा software डाऊनलोड करून घ्या.
                                      येथे क्लिक करा

        हा software आपण filehippo.com वरून फ्री मध्ये डाऊनलोड करू शकतो व डाउन लोड झाल्यावर रन करून इंस्टाल करून घ्या.
१.आता कोणत्याही drive मध्ये किंवा desktop एक फोल्डर तयार करा , त्या मध्ये आपल्या महत्वपूर्ण file पेस्ट करा किंवा जुना फोल्डर असेल असेल तर त्याच्यावर right क्लिक करा.
२.आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल त्याच्या मध्ये Add to archive…. असा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा .
३.आता परत एक पॉप ऑप विंडो ओपन त्यातील पहिला आडवा पर्याय General वर क्लिक करा त्यातील उजव्या बाजूला खाली set password असा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा.
४.आता enter password साठी नवीन विंडो ओपन होईल त्यात दोन वेळा पासवर्ड टाका व डाव्या बाजूस खाली ok वर क्लिक करा.
५.परत एकदा आलेल्या पॉप ऑप विंडो मध्ये खाली ok वर क्लिक करा .
६.आता आपल्या फोल्डर ची zip file तयार होण्यासाठी प्रक्रिया साधारण १ ते दीड मिनिटात पूर्ण होईल.
७.आपण ज्या ठिकाणी फोल्डर तयार केला होता तेथे त्या फोल्डर दोन फोल्डर होतात आपण जुना फोल्डर डिलीट करायचा आहे आणि जो winrar चा zip फाईल मध्ये फोल्डर तयार झाला असेल तो तसाच ठेवा.
८.आपण जेव्हा ही zip file ओपन करू तेव्हा आपला जुना फोल्डर दिसेल.
९.आपल्याला त्यातील कोणतीही file ओपन करायची असेल तेव्हा आपण सेट केलेला पासवर्ड मागेल जेव्हा ok वर क्लिक करू तेव्हाच ती file ओपन होईल.
१०.दुसऱ्या व्यक्तीला पासवर्ड माहिती नसल्यास तो त्या फोल्डर मधील कोणतीही file ओपन करू शकत नाही.
           अशा प्रकारे आपण खूप सोप्या पद्धतीने संगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकतो.

धन्यवाद !!
( साभार - प्रदिप पाटील पनवेल , रायगड मोबाईल क्र. ९२२२०२३९४७
)

You tube वरील videos कसे डाउनलोड करावेत ?

You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की..
तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :- 2 (Method 2)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-4 (Method 4)

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...

नवीन लिंक:-
https://www.kickyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-6 (Method 6)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

      यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.deturl.com/watch?v=Jbn39j-xa-k