शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

मित्रा App डाउनलोड करण्याविषयी

प्रति,
गटशिक्षणाधिकारी सर्व
केंद्र प्रमुख, सर्व
मुख्याध्यापक (सर्व)/शिक्षक (सर्व)
सर्व व्यवस्थापणाच्या सर्व माध्यमाच्या शाळा

विषय:- आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी MITRA App Download  करण्याबाबत
             उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते कि, जि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App  मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध असुन त्याची डायरेक्ट डाउनलोड ची लिंक खाली दिली आहे.

या ॲप मध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षक,विद्याप्राधिकरण टिम,व एक स्टेप यानी एकत्रित येउन शालेय पाठ्यपुस्तकातील प्रत्येक वर्ग व विषय व पाठनिहाय दर्जेदार आभ्यासक्रम तयार केला आसुन तो आपणास आता मित्रा ॲप व्दारे मोफत उपलब्ध झालाय...

आपल्या केंद्रातर्गत कार्य करणार्या सर्व शिक्षकांनी तात्काळ हे ॲप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाउनलोड करुन घ्यावे.व आपल्या पंचायत समिती क्षेत्रातील सर्व शिक्षकाना हे ॲप डाउनलोड करण्यास सांगावे

सदर अँप आपण येथून डाउनलोड करू शकता 👇.