शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

कुमठे बीट उपक्रम



प्रयोगशील अधिकारी प्रतिभा भराडे, बीट- कुमठा, सातारा. यांचे अनुभव

1) मेंदू शिकण्याचा अवयव आहे. हा शिकतो कसा? निसर्गाने मानवाला जन्मताच ज्या शक्ती दिल्या आहेत त्याचाही विचार व्हायला हवा.
2) आम्ही काम करताना पहील्यादा स्वतःला बदलवले. ती अवघड प्रक्रिया आहे. आपल्या कन्सेप्ट क्लीअर व्हायला हव्यात.
3) प्रथम शाळा मुलांसाठी तयार केल्या. शाळा परीसर देखना केला. यासाठी वेळ कमी लागतो.
3) शिकणे नैसर्गिक आहे. मेंदूला जेथे आव्हान आहे तेथे शिकण्याची गती जास्त आहे.
4) मुलांना खेळायला आवडते. त्यात आव्हान असावे. पारंपारिक खेळात मज्जापेशीची जोडणी होते. मुलांची निर्णय घेण्याची ताकद वाढते. यासाठी शाळा खेळण्यासाठी परिपूर्ण करायला हव्यात.
5) पताका, तक्ते शिक्षकांशी बोलून काढून टाकले. त्याचा मुलासाठी उपयोग होत नाही हे अनुभवाअंती सिद्ध आहे.
6) वर्गाला आतून दरवर्षी पांढरा रंगा देतो. स्वच्छ  सुंदर वर्ग  दिसण्यासाठी याची मदत होते
6) शिक्षणाची दोन उद्दिष्ट साध्य करायची हे मी ठरवले आहे 1 समस्या निवारणाची ताकद निर्माण करणे. 2 स्वतःचे ज्ञान स्वतः मिळवण्याची ताकद देणे.
7) आम्ही शाळा वर्ग  स्वच्छ केले. रेडीमेड शैक्षणिक साहीत्य वर्गातून बाहेर काढले. शिक्षकांचा जिव अडकलेला असतो त्यात. मोकळा वर्ग मुलांना शिकण्याला अभिव्यक्तीसाठी आवश्यक असतो. यासाठी मुलाःचे शिकण्याचे टप्पे ठरवावे लागतात.
8) शाळेत मैदानावरील पथक माझ्याकडे  सक्तीचे आहेत. झांजपथक, लेझिम, भारतियम, टिपरी, एरोबिक्स. कवायत साधी, उभी, बैठी, साहीत्य. मुलं मज्जा करतात. 100% मुलांचा सहभाग. शाळा दाखवण्यासाठी नाही. मुलांच्या आनंदासाठी आहे.

रचनावादी अध्ययन अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा मुलांना शिक्षकांनी  शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही ...


  ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???
)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या % वजन असणार्या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात %होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.


इंग्रजी भाषा
 instruction 400 अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School  My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsone word     one sentence   one question  असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.

वर्गतयारी  मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.

उपक्रम
)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.
)चित्रगप्पा मारणे
)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.
) ठरवता गप्पा मारणे.
)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.
)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.


मराठी विषय.
शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम
)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
)शब्दभेंड्या खेळ घेणे.)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
)धुळपाटीवर लेखन
)हवेत अक्षर गिरविणे.
)समान अक्षर जोड्या लावणे.
)अक्षर आगगाडी बनवणे.
)पाहुणा अक्षर ओळखणे.
)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
)बाराखडीवाचन करणे.
)बाराखडीतक्तेवाचन करणे.
)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. 


गणित

)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
)वर्गातील वस्तु मोजणे
)अवयव मोजणे
)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
)आगगाडी तयार करणे
)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर ते १०० संख्यावाचन रोज वेळा घेणे.