शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday 30 June 2017

चार्ज देवाण घेवाण

नमस्कार !

बदली प्रक्रियेमुळे आपणास चार्ज देव घेव करावा लागतो. शिक्षक मित्रांच्या मदतीसाठी चार्ज यादी अतिशय सोपी व सुटसुटीत pdf स्वरूपात बनविली असून ती आपल्याला नक्कीच आवडेल. फक्त प्रिंट काढा व चार्ज देवघेव करा. चार्ज यादी फाईल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Thursday 29 June 2017

आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे

आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Friday 23 June 2017

आंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या

याद्या प्राप्त होतील तश्या तात्काळ याठिकाणी ठेवण्यात येतील, कृपया थोड्या थोड्या वेळाने अपडेट पहावे. शिक्षक मित्रांना विनंती की जर आपल्याकडे याद्या प्राप्त झाल्या तर कृपया माझ्या व्हाट्सअप्प वर पाठवाव्यात जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल.

1. जिल्ह्यामध्ये येणारे (Incoming ) दि. २४ जून नंतर लागलेल्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://db.tt/2aGQ6C1vcR


2. जिल्ह्यामधून बाहेर जाणारे ( Outgoing ) दि. २४ जून नंतर लागलेल्या याद्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://db.tt/rPKcxLdRkF

3.आंतरजिल्हा बदली ( सर्व जिल्हे ) दि. १३ जून रोजी लागलेल्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://db.tt/LtZIUOlIcs

Wednesday 21 June 2017

२१ जून : योगदिन स्पेशल

१. योग म्हणजे काय ?
( शिर्षकावर क्लिक करा.)


२. योगासने व सूर्यनमस्कार याविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

३. विद्यार्थ्यांना करता येण्यासारखी सोपी २२ आसने व त्यांची माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
४. विद्यार्थ्यांना करता येण्यासारखी सोपी २२ आसने व त्यांची चित्रयुक्त माहिती PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


५. आंतर राष्ट्रीय योगदिवास मार्गदर्शक पुस्तिका मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

५. योगासने व योगदिन हिंदीतून माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Tuesday 20 June 2017

तंत्रज्ञानाचा दैनंदिन वापर

माहिती तंत्रज्ञानचा विस्तार सध्या इतक्या झपाट्याने वाढत आहे की , अवघे विश्व आपल्या हातातील मोबाईल मध्ये सामावले आहे. घर बसल्या सर्व कामे करणे शक्य झाले आहे पण त्यासाठी आपल्याला त्या सुविधा वापरायच्या कशा हे माहित असावे लागते. आपली ही गरज ओळखूनच आमचे मित्र श्री.वसंत भिसे सर यांनी विविध प्रकारच्या PDF फाईल तयार केल्या आहेत. त्या सर्व फाईल या ठिकाणी देत आहे. माहिती नक्कीच आपल्याला आवडेल. अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Sunday 18 June 2017

जिल्हांतर्गत बदली विवरणपत्रे

शिक्षकमित्रांनो नमस्कार !
सध्या बदल्यांचा धुमधडाका सुरू असून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी विवरणपत्रे या ठिकाणी देत आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपल्याला हवी असणारी विवरणपत्रे डादऊनलोड करून घ्यावीत.
http://pdsir.blogspot.in/p/blog-page_86.html

Saturday 17 June 2017

आंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले

आंतरजिल्हा बदली होणाऱ्या शिक्षकांसाठी आवश्यक असणारे दाखले पहा व डाउनलोड करा. त्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Thursday 15 June 2017

शालेय पोषण आहार करारनामा

शिक्षकमित्रांनो नमस्कार !
शालेय पोषण आहार हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली की आपल्याला न विसरता करावे लागणारे काम म्हणजे शालेय पोषण आहार करारनामा करणे. आपल्या सर्वांच्या सोईसाठी करारनामा पीडीएफ फाईल देत आहे. फाईल 2 पानाची असून 100 रु. च्या स्टँपवर जशीच्या तशी प्रिंट मारता येईल, अशा प्रकारे पेज सेट अप केलेले आहे. करारनामा फाईल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410Y2ZtU1VqR21qM1U


Wednesday 14 June 2017

शाळेसाठी महत्वाचे

1.वेळापत्रक-
                    इयत्तानिहाय आकर्षक फॉन्टस् वापरुन तयार केलेले वेळापत्रक एकदा पहाच !! आपल्याला निश्चित आवडेल. डाऊनलोड करुन वर्गात लावा. त्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://pdsir.blogspot.in/p/blog-page_49.html

2.कोरे फॉर्मस्
                      शाळेच्या पहिल्या दिवशी आवश्यक असणारे कोरे फॉर्मस् खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन डाऊनलोड करा.
http://pdsir.blogspot.in/p/karyalay.html
3. वार्षिक नियोजन-
                        इयत्तानिहाय वार्षिक नियोजन डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://pdsir.blogspot.in/p/blog-page_21.html

Tuesday 13 June 2017

इयत्ता 10 वी निकाल

सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभर उशिरानं लागत आहे. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

 निकाल पाहण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा -

1. लिंक 1

2. लिंक 2

3. लिंक 3

आंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे

सर्व जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदली याद्या शिक्षकांच्या सोयीसाठी या ठिकाणी संकलित केल्या आहेत. माहिती अपलोड करणे चालू आहे...
याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा...

https://db.tt/LtZIUOlIcs

Sunday 11 June 2017

कोरे फॉर्मस्

नमस्कार !
शाळा सुरु होत आहेत. अपल्याला विविध प्रकारचे कोरे फॉर्मस डाऊनलोड करण्याची गरज पडत असते. खाली दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड करा.
 

1.  शालेय पोषण आहार संबंधी

2. कार्यालयीन कामकाज संबंधी

Saturday 10 June 2017

सोप्पी मराठी टायपिंग

मराठी  टायपिंगसाठी गुगल इनपुट आता विसरा !!

आता युनिकोड मराठी टायपिंग करणे एकदम सोपे झाले. प्रसिद्ध व्याकरणकार श्री. शुभानन गांगल यांनी सोप्पी मराठी टायपिंग हे सॉफ्टवेअर तयार केले असून ते वापरणे फारच सोपे आहे. सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत असून त्यासंदर्भात सर्व माहितीसाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लीक करा.

1. सॉफ्टवेअर डाऊनलोड

2. माहितीपत्रक

3. मार्गदर्शनासाठी 27 फाईल

4. युनिकोड फॉन्टस

5. कविता फॉन्टस

6. दिवाळी नक्षी फॉन्टस

 

सहशालेय उपक्रम

शाळेत वर्षभरात घेतले जाणारे विविध सहशालेय उपक्रम यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

इयत्ता निहाय अभ्यासक्रम

सर्व विषयांचा इयत्तानिहाय अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Thursday 1 June 2017

जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक

एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.
अग कमला उठ पाय धु , रस ,भजॆ ,चहा बनव.

अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
ग:-गङचिरोलि, गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ला:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
पा:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
भ:- भंङारा 
ज:- जळगाव, जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोली
ब:- बिड, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
व:- वर्धा, वाशिम



25 मुद्दे - निकष आणि गुण

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष
खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.
 प्रगत शाळा निकष आणि गुण
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)
२) शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)
३) शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)
४) प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान
१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)
५) कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)
६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)
७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)
८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)
९) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)
१०) वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)
११) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)
१२) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)
१३) वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)
१४) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)
१५) कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)
१६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)
१७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)
१८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)
१९) मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)
२०) प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)
२१) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)
२२) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)
२३) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)
२४) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)
२५) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)
                      सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ६० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.

बळीराजाचा संप

आमचंच खाऊन भडव्यांनो
हात बुडाला पुसता काय..
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय....

लक्षात ठेवा, या ठिणगीचा
जेव्हा कधी वणवा होईल
तेव्हा मात्र तुमच्यावर
घान खायची वेळ येईल,

घान केलीय तुम्हीच सारी
अन् आमच्या तोंडाला पुसता काय
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय..

काल परवा कुणीतरी
पंढरपुरात बोललं
पर्यायी व्यवस्था उभारण्याचे
गुपित नवं खोललं...

कमी पडेल जे काही
त्याची आयात करणार म्हणे....

साहेब, जे करायचे ते करा
सत्ता तुमची गुलाम आहे
तुमच्या आयात निर्यातीला
आमचा आता सलाम आहे

वस्तू बाहेरुन आनता येईल
पण बाप आयात कराल काय
अन् निवडणूक आल्यावर
पाय त्यांचेच धराल काय..

असो....

साहेब, लाखो शेतकरी बापांनी
आत्महत्या केल्यायेत
आता उरलेल्यांना तरी जगू द्या
अन् आमच्या घामाचं मोल आता
आमच्याच खिशात उगू द्या...

हनुमंत चांदगुडे
 सुपे (बारामती)

मराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मिळवण्यासाठी


मराठी माध्यमातुन इंग्रजी माध्यमात जाताना, कॉलेजच्या शेवटच्या वर्गात असलेलया विद्यार्थ्यासाठी “प्लेसमेंट” सुरु झाले होते आणि मी मी म्हणणारे हुशार विद्यार्थी सुद्धा बिथरलेले दिसत होते. म्हणून अशाच एका ‘हुशार’ विद्यार्थ्याला बोलावून विचारलं की “काय रे ८०% मार्क असताना का घाबरतोस?” – तो म्हणाला “मॅडम मी मराठी शाळेतून शिकलोय”!
तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की बहुतेक मराठी माध्यमाची पोरं निव्वळ ‘मराठी’ असल्याच्या न्यूनगंडामुळे मागे पडत चालली आहेत. म्हणजे ज्यांना इंग्रजी येत ते सुद्धा मी मराठी माध्यमातून शिकलोय, इंग्रजी शाळेतलया मुलांसमोर बोलताना मी चुकणारच अशा पूर्वकल्पना करूनच बोलतात किंवा किंबहुना बोलतच नाहीत आणि आयुष्याच्या उमेदीच्या क्षणी ठेचकळतात.

ज्या लोकांना या चक्रव्यूहातून बाहेर यायचे असेल त्यांच्यासाठी काही टिप्स:

१. मराठीचा अभिमान असावा पण म्हणून इंग्रजीचा द्वेष करू नये
कोणतीही नवीन भाषा शिकल्याने आपल्याला फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकल्यामुळे तुमच्यातला मराठीपणा कुठेही लोप पावणार नाही हे ही समजून घ्या.

२. इंग्रजी वर्तमानपत्र आठवड्यातून तीनदातरी वाचा
आणि त्यातलया पाच शब्दांचे अर्थ समजून घ्या, शब्दसंग्रह जितका वाढवाल तितकाच तुमचा आत्मविश्वास पण वाढेल

३. इंग्रजी सिनेमे, मालिका नियमित पहाण्याचा प्रयत्न करा
सुरुवातीला उपशीर्षकां (subtitles) सहित पहावे.
(तरीही पहिले ५ सिनेमे कळणार नाहीत!) पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवावेत १० सिनेमांनंतर तुम्हाला subtitles शिवाय सिनेमे समजू लागतील. या मुळे नवीन इंग्रजी शब्द आणि त्याचे उच्चार तुमच्या कानी पडतील आणि इंग्रजीतून विचार करण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होईल.

४. रोज अर्धातास तरी बोलणे
मित्र, मैत्रीण , आई बाबा किंवा आरसा यांच्या पैकी कोणा एका सोबतका होईना रोज अर्धातास बोला, ( काही सुचत नसेल तर पाहिलेल्या इंग्रजी सिनेमातले डायलॉग म्हणा, किंवा स्वतःबद्दल बोला, म्हणजे तुमचं नाव शाळा वगैरे) – मग तुमच्या चुका तुम्हालाच लक्षात येतील आणि या चुका पुढे होणार नाहीत याची काळजी घ्या.

५. पुस्तक फक्त वर्तमानपत्र वाचून शब्दसंग्रह वाढवणं कठीण आहे. इंग्रजी साहित्याला शिवल्याशिवाय त्या भाषेवर विजय मिळवणे कठीण आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा का होईना एक पुस्तक जरूर वाचावं. सुरुवातच करायची असेल तर सुधा मूर्तींच्या पुस्तकांपासून करा , इंग्रजी किती सोपं आहे हे ती पुस्तकं सांगतात…!
आणि सर्वात महत्वाची गोष्ट –
तुम्ही मराठी माध्यमातून शिकलाय ही समस्यां नसून एक संधी आहे. तुम्ही तुमची मातृभाषा पूर्णपणे आत्मसात केली असल्याने तुम्ही तिचा तर आस्वाद लुटताच (तुम्हाला पु.ल. कळतात…!) आता तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची संधी देखील मिळत आहे हे ध्यानात ठेवा. हे ही लक्षात ठेवा की इंग्रजी ही आपली भाषा नसल्यामुळे तिचा वापर करताना आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहेच, फक्त चुकांची पुनरावृत्ती होणार नाही एवढं पहा.
तुमच्यासमोर अनेक लोक असे असतील जे मराठी माध्यमांतून शिकले पण असाखळीत इंग्रजी बोलतात. त्यांनी देखील वरील ५ युक्त्याच वापरल्या आहेत ह्याची खात्री बाळगा…आणि आत्मविश्वासाने कामाला लागा…!

श्रुती कुलकर्णी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर -3


विद्यावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी होते, हे खरेच; पण ते केवळ दलितांचे कैवारी होते असे रुजविण्यात आपण राजकीयदृष्ट्या कमालीचे यशस्वी झालो आहोत. बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्यात दलितेतर धर्मांध समाज जेवढा जबाबदार आहे, तेवढाच दलित समाजही जबाबदार आहे. त्यांच्या १२६ व्या जयंतीच्या विचारसोहळ्यात आजच्या सांस्कृतिक वास्तवाकडे पाठ करून परिवर्तनाचे स्वप्न पाहू शकत नाही. एकतर तत्त्वनिष्ठ असे दलितांचे स्वतंत्र राजकारण असल्याचे चित्र आज दिसत नाही. दुसरीकडे, १९७१ साली तमाम दलितांचे ऊर्जास्थान असलेली दलितांची विद्रोही चळवळ अस्तित्वात आहे, असे धाडसाने सांगता येणार नाही. वेदना, विद्रोह आणि बंडाने पेटून उठलेले दलित साहित्य आज कुठे आहे? बाबुराव बागूल यांचे क्रांतीविज्ञान, सुर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, नामदेव ढसाळांची ज्वाला भरलेली विद्रोही कविता, रा. ग. जाधवांची समीक्षा, रावसाहेब कसबे, पानतावणे आणि यशवंत मनोहरांचे वैचारिक लेखन या गोष्टी आता दलित साहित्य आणि चळवळीच्या पटलावर नाहीशा होऊन इतिहासजमा होत आहेत.


संघटित दलितांची चळवळ अशी गोष्ट नव्या भांडवलशाहीने गिळंकृत करून दलितांना सुटे सुटे करण्यात येथील धर्मांध राजकारणी कमालीचे यशस्वी झाले आहेत. याचा दृश्य परिणाम म्हणजे आज दलितांचे विशेषतः आंबेडकरी विचारांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाही, दलित साहित्य किंवा दलित चळवळ म्हणावे असे हक्काचे सांस्कृतिक विचारपीठ कार्यान्वित नाही आणि आंबेडकरी जनतेचे प्रश्न सोडवणारी निर्णायक आर्थिक धोरण दलित समाजात नाही. जे काही आहे ते सारे भावनेच्या मनोऱ्यावर उभे आहे. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला की सारे प्रश्न सुटतात, असा समज दलित समाजात पसरला आहे. निळा गुलाल, निळ्या पताका, जयभीमचा नारा, पांढऱ्या शुभ्र वस्त्रांचे परिधारण अशा भावनिक आणि मिथकांच्या गोष्टीत दलित समाज अडकतो आहे. बुद्ध धम्माचे आचरण आणि बाबासाहेबांच्या प्रती आदरभाव प्रत्येक दलिताच्या मनात ओतप्रोत भरलेला असणे ही गोष्ट अभिमानाची नक्कीच आहे. मात्र, त्याला विचारसरणीची व्यवहारी जोड देण्यात प्रागतिक प्रवाह कमी पडले हे मान्य करायला हवे.

डॉ. आंबेडकरांच्या विचारांपासून दूर जाण्याचे अनेक तोटे आंबेडकरी समाज अनुभवतो आहे. जे प्रागतिक आंबेडकरी सांस्कृतिक आचरण उभे राहायला हवे होते, ते राहिले नाही. उलट राजकारणाने सांस्कृतिक आचरणावर मात करून दलितांच्या माथी विघटनाचा शाप मारला. समग्र सांस्कृतिक परिवर्तनाची लढाई एकाच जातीने लढून उपयोगाची नाही. ती लढाई जातिव्यवस्थेशी आहे, कर्मठ आणि कुंठित झालेल्या धर्मव्यवस्थेशी आहे, भांडवलशाहीशी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती वाढत्या असहिष्णुतेशी आहे. अशावेळी समविचारी जातींनी एकत्र येऊन आपले एक प्रागतिक राजकीय धोरण निश्चित करायला हवे. बाबासाहेबांचे स्वप्न संपूर्ण उपेक्षित सममाजाच्या उन्नतीचे होते.

गेल्या काही वर्षांपासून भारतातील धर्मांध राजकारण ज्या पद्धतीने इतिहासातील घटनांचा मिथकांचा, प्रतीकांचा आणि महापुरुषांच्या नावांचा चलाखीने वापर करून लोकांच्या नावावर सांस्कृतिक आक्रमण करत आहे. हे आक्रमण कधी राजकीय निर्णयाने, कधी मन की बात करून, तर कधी देशद्रोही संबोधून केले जात आहे. विन्डी डोनिजर, पेरूमल मुरूगन, रोहित वेमुला, कन्हैया कुमार, गुरमेहर कौर, ही उदाहरणे ताजी आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्यांची जखम अजून भरलेली नाही. शिवाय, भांडवली राजकारणाला जे हवे आहे, ते घडवून आणण्यासाठी माणसांच्या मर्जीप्रमाणे राष्ट्रवादाच्या व्याख्या बदलत आहेत. राष्ट्रवाद ही गोष्ट दुधारी शस्त्र आहे, असे बाबासाहेबांनीच ‘पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी’ या ग्रंथात सांगितले आहे.

संसदीय राजकारणात धर्माचे वाढते महत्त्व लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असे मत बाबासाहेबांनी मांडले होते; पण तमाम दलित-उपेक्षित आणि बहुजनांच्या मनावरील धर्माचे गारूड उतरत नाही. राजकारण, शिक्षण, व्यापार, शेती यासारख्या अनेक क्षेत्रांत जात आणि धर्माने बस्तान पक्के केले आहे. आंबेडकरवादापुढचे आजचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचे पुनर्रोपण करण्याचे आहे. यासाठी, बाबासाहेबांनी धर्मचिकित्सा करणे, पोटजाती नष्ट करणे आणि आंतरजातीय विवाह करणे हे प्रभावी उपाय सांगितले होते; पण त्यांकडे प्रागतिक प्रवाहांनी पुरेसे लक्ष दिले नाही.

भारतातील जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय बाबासाहेबांच्या स्वप्नातला धर्मनिरपेक्ष भारत उभा राहणार नाही आणि गौतम बुद्धांना अपेक्षित असलेली शांततामय करुणाही मनामनांत रुजवता येणार नाही. सध्या धर्माच्या हातात राजकीय सत्ता गेल्याने आणि राजकारणाचे दोर भांडवलदारांच्या हातात गेल्याने प्रागतिक विचारविश्व धोक्यात आले आहे. त्याचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर सर्व समविचारी प्रागतिक पक्ष, संघटना, संस्था, व्यक्ती व समूहांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्रागतिक चळवळी फोडून त्यातील नेत्यांना विकत घेण्याचे षड‍्यंत्र इथले राजकारण सतत करील, यात शंका नाही.

परिवर्तनवाद्यांनी ब्राह्मण्याऐवजी ब्राह्मणांचा द्वेष करण्याने व आंबेडकरवाद्यांनी कम्युनिस्टांचा द्वेष करण्याने पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली. ‘बुद्ध आणि मार्क्स’, ‘बुद्ध की मार्क्स’ अशा शब्दच्छलात अडकवून आंबेडकरवाद व्यापक होऊ न देण्यात प्रागतिक विचारवंत अडकून राहिले. दलित साहित्य आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य? अशा शाब्दिक कोट्या करत दलित लेखकांची सर्जनशीलता गोठली. वेदना आणि विद्रोहाची आग पेरत दलित कवितेची पन्नाशी गेली. दलित आत्मकथनेही आवर्तात सापडली. दलित रंगभूमीची पीछेहाट झाली. दलित नेत्यांची फाटाफूट झाली. अशा अनेक पडझडीतून क्रांतीचा वारसा असलेली दलित चळवळ आज जात आहे.

प्रतिगामी आणि धर्मांध शक्तींनी महाराष्ट्रातील ओबीसी जातींना आणि हिंदू दलित जातींना राजकीयदृष्ट्या आपल्याकडे वळवून आंबेडकरी चळवळीला एकाकी पाडले. आता तर डॉ. आंबेडकर-हेडगेवार, आंबेडकर-गोळवळकर अशी तुलना करून दलित चळवळीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण आंबेडकरी समाज अजूनही जागा आहे, यावर विश्वास ठेवला पाहिजे. आंबेडकरवाद नावाचे सुंदर प्रागतिक तत्त्वज्ञान त्याच्या हातात आहे. आता केवळ बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषात न अडकता हा समाज तमाम बहुजन समाजाशी वैचारिक नाते ठेवून आणि समविचारी, धर्मनिरपेक्ष जाती-धर्मांशी सांस्कृतिक मैत्री करून जागतिकीकरणात नवा व्यापक प्रागतिक आंबेडकरवाद उभा करील, अशी आशा आहे.

डॉ. मिलिंद कसबे
(लेखक मराठीचे प्राध्यापक आहेत.)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर -2


शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.

2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.

3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.

4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.

5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.

6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.

असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.

त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्‍यांचे मोर्चे काढले.

त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली.

शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले.

देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.
आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो.

डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.

-- प्रा. हरी नरके

काही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स


१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - सर्दी, खोकला, ताप येत नाही.

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

५) स्मरण शक्तीसाठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे -
हाडे मजबूत होतात.

९) ऐकू न येणे-
चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) शरीरशुद्धी साठी-
वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) जुलाबासाठी-
चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) नाकाचे हाड वाढणे- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) मुळव्याधासाठी-
अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) पोटाच्या आजारावर -
वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) कानाच्या पडद्याला भोक -
उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) हात पायाला घाम येणे -
सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.

२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर-
अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

 डॉ.स्वागत तोडकर
 चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
 चिकित्सालय,कोल्हापूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🔷जन्म : एप्रिल १४, इ.स. १८९१

🔷महापरिनिर्वाण : डिसेंबर ६, इ.स. १९५६

🔷जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश

🔷पत्‍नी: रमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)

🔷अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर

🔷आई: भिमाई रामजी आंबेडकर

🔷वडील: रामजी मालोजी आंबेडकर

🍁हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते.

🍁भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.

🍁सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते.

🍁कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

🔷सुरुवातीचे जीवन

🍀मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे पुत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.

🍀डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.

🍀इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.

🍀रामजींनी इ.स. १८९८ साली कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.

🍀 इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला.

🍀इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरल

🍀अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली.

🍀इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.

🍀कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.

🎓शिक्षण

📚पदवी-
एम.., पीएच. डी,. डी.एस्‌सी, एल्‌एल.डी., बॅरिस्टर अॅट लॉ.

📚प्राथमिक शिक्षण

भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.

🎓उच्च शिक्षण

📚बी.ए.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.
बडोदा संस्थानचे स्कॉलर म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले.

📚एम.ए.
एम.ए.या पदवीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते.
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते.या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली.

✴आंदोलने

🌀चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

🌀काळाराम मंदिर सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली.
२ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.
रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाडावर सोपवण्यात आली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

✏पुणे करार (संक्षिप्त मसुदा)
 यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या.  नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला

🔷शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

🔷हिंदू कोड बिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भाग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.

🔷भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

🔷भारतीय घटनेचे शिल्पकार
भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्‍न करण्यात आले.
१९४६ ला माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. संविधान निर्मितीच्या पूर्वेतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, अन्य कुणापेक्षाही जास्त आहे.
 बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे.

🌀धर्मांतर
बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.त्या दिवशी अशोकविजयादशमी होती(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता).हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. महास्थविर चंद्रमणी यांचेकडूनत्रिशरण व पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली.व आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला.

🌀महापरिर्निवाण
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्‌धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.

   🙏बाबासाहेब आम्बेडकर🙏  

 ⭐जीवनेतिहास (थोडक्यात)⭐

🔷 १४ एप्रिल इ.स.१८९१
🔶महू गावी जन्म.
🔷 इ.स.१८९६
🔶आई, भिमाईचे निधन
🔷 नोव्हेंबर इ.स.१९०० 🔶सातार्‍याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
🔷 इ.स.१९०४
🔶एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
🔷 इ.स. १९०६
🔶रमाई यांचेशी विवाह
🔷 इ.स.१९०७
🔶मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
🔷 इ.स.१९०८ जानेवारी 🔶एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
🔷 इ.स.१९१२
🔶मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला.
🔷 इ.स. १९१३
🔶बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
🔷  जून इ.स.१९१५
🔶एम.ए.ची परीक्षा पास झाले.
🔷  जून इ.स.१९१६
🔶कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
🔷 इ.स.१९१७
🔶कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
🔷 जून इ.स.१९१७
🔶लंडनहून एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
🔷 इ.स.१९१८
🔶साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
🔷 नोव्हेंबर इ.स.१९१८
🔶सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
🔷 जून ३१ इ.स.१९२०
🔶साप्ताहिक मूकनायक सुरू केले
🔷 मार्च २१ इ.स.१९२०
🔶कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
🔷 जून इ.स.१९२१
🔶लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
🔷 मार्च इ.स.१९२३
🔶रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्‌‍सी.(अर्थशास्त्र) ही पदवी
🔷२० जुलै इ.स.१९२४
🔶बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
🔷 २० मार्च इ.स.१९२७
🔶चवदार तळे सत्यागृह
🔷एप्रिल ३ इ.स.१९२७
🔶बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
🔷सप्टेबर इ.स.१९२७
🔶समाज समता संघ स्थापन केला.
🔷 इ.स.१९३४
🔶परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
🔷 मे २६ इ.स.१९३५
🔶रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन
🔷 ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ 🔶येवला, येथे धर्मांतराची घोषणा
🔷 ऑगस्ट इ.स.१९३६
🔶स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
🔷 डिसेंबर इ.स.१९४०
🔶थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
🔷जुलै इ.स.१९५१
🔶भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
🔷मे इ.स.१९५३
🔶मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
🔷डिसेंबर २५ इ.स.१९५५ 🔶देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
🔷डिसेंबर 6 , इ.स.1956
🔶महापरिनिर्वाण

    🌹बाबासाहेब आंबेडकर 🌹

📚यांनी व त्यांच्यावरील  लिहिलेली  काही निवडक पुस्तके📚

📕माझी आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
📗हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
📘दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितिज पब्लिकेशन, नागपूर, २००४
📙आंबेडकर - नलिनी पंडित, ग्रंथाली प्रकाशन.
📓भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म.श्री. दीक्षित, स्नेहवर्धन प्रकाशन.
📔महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन.
📒डॉ. बाबासाहेब आणि आम्ही - आहेर अविनाश, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा - इंद्रायणी साहित्य, पुणे.
प्रबुद्ध - खेर भा. द., मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९.
📗डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध - दामोदर मोरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९४.
📘गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे - कुलकर्णी रंगनाथ, १९९१.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र - संपादक : धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१.
📓आंबेडकर यांचे राजकीय विचार - भ. द. देशपांडे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
📒आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी - कृष्णा मेणसे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात - शंकरराव खरात, इंद्रायणी साहित्य.
📔आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना - डॉ. रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📗आंबेडकर आणि मार्क्स - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन
📓बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची - धनंजय कीर.
📙डॉ. आंबेडकरांचे अंतरंग- द. न. गोखले, मौज प्रकाशन.
📒आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य(अध्यक्षीय व इतर भाषणे) - संपादक : अडसूळ भाऊसाहेब, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७.
📔भीमकालदर्शन (दिनदर्शिका-संपादक सुहास सोनवणे
📗आंबेडकर आणि मार्क्स - सुगावा प्रकाशन, पुणे, १९८५.
📘ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - काळे वि. र. , वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा - अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६.
📓संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७२.
📒डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार - बी. सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७३.
📕मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर - कांबळे सरोज, सावित्रीबाई ङ्गुले प्रकाशन, १९९९.
📔डॉ. आंबेडकर विचारमंथन, - कुबेर वा. ना., लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई.
📗पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर - खरात माधवी, श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे - खरात, शंकरराव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९६१.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे - क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२.
📓डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान - जाधव नरेंद्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२.
📒डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ - जाधव राजा आणि शहा जयंतीभाई, राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४.
📕भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम - यदुनाथ थत्ते, कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४.
📔डॉ. बाबासाहेब आंबेडकर-नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान - थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५.
📗डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी, - देशपांडे रा.ह., अनुवाद : गोखले श्री. पु., नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ - संपादक : दया पवार , महराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३.
📙भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - संजय पाटील, निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४.
📓डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास - शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८.
📒डॉ. आंबेडकर : एक चिंतन - मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर, रचना प्रकाशन, मुंबई.
📕प्रज्ञासूर्य - संपादक : शरणकुमार लिंबाळे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१.
📔डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म - प्रभाकर वैद्य, शलाका प्रकाशन, १९८१.
📗भीमप्रेरणा : भारतरत्‍न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार - संपादक : अ.म. सहस्रबुद्धे, राजा प्रकाशन, मुंबई, १९९०.
📘संविधान सभेत डॉ. आंबेडकर - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर - डॉ. सौ. अनुराधा गद्रे, मनोरमा प्रकाशन.
📓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - विजय जाधव, मनोरमा प्रकाशन.
📒बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. सुभाष गवई, ऋचा प्रकाशन.
📕ज्योतिराव, भीमराव - म. न. लोही, ऋचा प्रकाशन.
📔चंदनाला पुसा - डॉ. दा. स. गजघाटे, ऋचा प्रकाशन.
📗डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सचिन खोब्रागडे, ऋचा प्रकाशन.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नाना ढाकुलकर, ऋचा प्रकाशन.
📙विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास - कोसारे एच. एल., ज्ञानदीप प्रकाशन, नागपूर.
📓डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र) - एकूण खंड १५, खैरमोडे चांगदेव भवानराव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. ( १ ते ९ खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित आणि खंड १० वा सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित).
📒आंबेडकर भारत - भाग १ - बाबुराव बागुल, राजहंस प्रकाशन, पुणे.
📕आंबेडकर भारत - भाग २ - बाबुराव बागुल, सुगावा प्रकाशन, पुणे.
📔आठवणीतले बाबासाहेब, योगीराज बागुल.
📗डॉ. आंबेडकरांचे मारेकरी-अरुण शौरी - लेखक डॉ. य दि फडके 📘ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
📙सत्याग्रही आंबेडकर (संपादक सुहास सोनवणे)
📓बहुआयामी (संपादक सुहास सोनवणे)
📒शब्दफुलांची संजीवनी (संपादक सुहास सोनवणे)
📕डॉ. आंबेडकर आणि समकालीन (संपादक सुहास सोनवणे)
📔ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
📗आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार'- प्रा. डॉ. सी. एच. निकुंभे
📘गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📙The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts (Sage publication-1993) (लेखक : डॉ. मा.स. गोरे)
📓Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies (लेखक - डॉ. एस.एस. धाकतोडे)
📒डॉ. आंबेडकर दर्शन (लेखसंग्रह, संपादक मनीष कांबळे)
📕माणूस त्याचा समाज व बदल -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धान्तन (लेखक : सुधाकर गायकवाड)

---------------------------------------------
🌹भारतरत्न डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचा कुळ परिचय  🌹
---------------------------------------------

⭐आजोबा: मालोजी सकपाळ
⭐वडील : रामजी मालोजी सपकाळ
⭐आई : भीमाताई रामजी सपकाळ
⭐आईचे वडील: धर्माजी मुरबाडकर
⭐आत्या : मीराबाई मालोजी सकपाळ
⭐भाऊ : आनंदराव रामजी आंबेडकर
⭐बहिण : मंजुलाबाई,तुळसाबाई, गंगूबाई रामजी आंबेडकर
⭐वहिनी : लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर
⭐पत्नी : रमाबाई भिमराव आंबेडकर
⭐दूसरी पत्नी : डॉ सविता भिमराव आंबेडकर
⭐सासरे : भीकू धोत्रे ( वलंगकर )
⭐सासु : रखमा भीकू धोत्रे
⭐मेहुने : शंकरराव भीकू धोत्रे
⭐बहिनीचे पति :धर्माजी कोळेकर
⭐बाबांचे मुले-मूली : यशवंत,रमेश, इंदु, राजरत्न,गंगाधर
⭐सुन : मिराबाई यशवंत आंबेडकर
⭐नातवंडे : प्रकाश, रमाताई, भिमराव, आनंद

======================

आण्णा भाऊ साठे


शिवशाहीर विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑग्स्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव या लहान गावात झाला करोडो विश्वे दारिद्र्ये असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला . असे हे अण्णाभाऊ साठे गरीब व निरक्षर पोर.
         गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी ब्राम्हण शिक्षकाकडून  अपमानीत होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाचा संबंध,तांत्रिक दुष्ट्या पूर्ण निरक्षर , अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड्मय , कथा , नाट्य , पथ नाट्य , लोकनाट्य ,कादंबऱ्या ,चित्रपट , पोवाडे , लोकगीत ,लावण्या ,वग ,गवळण , प्रवास वर्णन , रेखा चित्र असे सर्वच साहित्य प्रकार सशक्त व समृद्ध केले . अण्णाभाऊंनी मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्या मराठी माणसाला त्याची मुंबई संयुक्त महाराष्ट्र्रा सोबत परत मिळवून दिली .
         अण्णाभाऊंची एकूण पुस्तके / ग्रंथ संख्या ७७ आहे शिवाय त्यांचे काही साहित्य गहाळही आहे अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले. पुढे त्यांचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतीकडून त्याचा सन्मान देखील झाला.
             लोकनाट्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी झिडकारून मातृभमिसह शिवरायांना वंदना असणारी परंपरा रुजू केली ती अशी

                                                                 '' प्रथम नमन मायभूच्या चरणा !
                                                                       छत्रपती शिवबा चरणा !
                                                                        स्मरोनी गातो कवना "!
                                                           
माझी मैना गावावर राहिली,माझ्या जीवाची होतीय काहिली " हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनी लिहले आहे
१६ ऑगस्ट १९४७ साली " ये आझादी झुटी है देश की जनता अभी भूखी है !" असा नारा शिवाजी पार्क वर अण्णा भाऊंनी दिला. तेंव्हा त्या दिवशी रुद्ररूप धरण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही तरी देखील अण्णाभाऊ मागे हटले नाही.
              अण्णाभाऊंच्या वैजयंता ,माकडीचा माळ ,चिखलातील कमळ , वारणेचा वाघ , अतगुज ,फकीरा या सात कादंबऱ्या मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले . चार चित्रपटांना विविध पारितोषिके देखील मिळाली शुक्रवार दिनांक १८ जुलै १९६९ रोजी टिळा लावते मी रक्ताचा हा शेवटचा चित्रपट प्रसिद्ध होताच अण्णाभाऊ हि श्रमिकांची रंगभूमी कायमची सोडून गेले त्यांना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले या उलट , कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर हे पुण्यातील अत्यंत श्रीमंत घरातील होते त्यांचे पुण्यात व पुढचे उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये पूर्ण झाले . पुढील आयुष्य त्यांनी अमराठी व स्वजातीच्या लोकांच्या हितासाठी खर्चकेले तसेच एकून १४ (कादंबरी , ललित लेख , कविता संग्रह , नाटक ) + अनुवादित बरेच लिखाण त्यांनी केले . पण कुठेही मराठी , भूमिपुत्र,संघर्ष ,श्रमकरी , कष्टकरी , शेतकरी यांच्या वास्तववादी व्यथा त्यांनी मांडल्या नाहीत .
               शिवाय त्यांना पेशवाई व ब्राम्हण शाहीचा फारच पुळका . पण खोट्या इतिहासकारांनी फुकटच्या अफवा पसरवून कुसुमाग्रजांनी आयुष्य भर मराठी ची सेवा केली असे सांगून सरकारकडून तो मराठी भाषा दिन म्हणून लागू करून घेतला . कुसुमाग्रजांना अण्णाभाऊंच्या तुलनेत प्रदीर्घ आयुष्य लाभून सुद्धा (८७वर्षे ) चार बोटावर मोजण्या इतक्या  साहित्यीकांशिवाय त्यांना कोणीच ओळखत नाही .
              … पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल व परंपरागत निरक्षर वातावरणात , वाईट -रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण - संपत्ती नाकारलेल्या समाजात , अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात , शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येवून जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे अण्णाभाऊ साठे यांनी कुसुमाग्रजापेक्षा लाखो पटीने लिखाण केले , मराठी भाषाच नव्हे तर प्रांत समृद्ध केला , पण ते कोणाही ब्राम्हण नव्हते एवढीच काय ती कमतरता .
                   म्हणून शिवरायांचे विचार रशियापर्यंत नेणारे व 'जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव " असे म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांशी आमची वैचारिक नाळ जोडून देणारे मराठी साहित्य सम्राट, विश्वरत्न अण्णाभाऊ साठे  यांचा जन्म दिवस १ ऑग़स्ट हा खरा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करूयात हा मराठी भाषा दिन प्रत्येक मूलनिवासी बहुजनांच्या घरा -घरात साजरा व्हावा , शिवरायांच्या तमाम मावळ्यांनी तो सणा सारखा साजरा करावा

शेवगा खा, सांधेदुखी पळवा !


भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून या वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या.

एक्स्पोर्ट ची मागणी तेव्हडिच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले. भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे.

एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुढगे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.

तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जतांना दिसत आहेत.

आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील. मग हाच शेवगा इसराईल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येईल व तेव्हा तो लाईन लाऊन आपल्याला घ्यावा लागेल.

महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे. आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. शेवग्याची शेंग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.

शेवग्याची चटणी , शेवगा सूपचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील. ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत.

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे.

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा वळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे.

शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गजराच्या १० पट विटामिन अ मिळते. दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.

केळीच्या १५ पट पोट्या- सियम मिळते, पालकाच्य २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा.

ज्या कुणाला वरील पदार्थ बनवायचे असल्यास त्यातील तज्ञ श्री *सतीश नेने* कोपरगाव ७५८८२९७३५७, व ८४११८८७००८!

गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही  ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत.

शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो. हे ओर्गानिक कॅल्सियम पचनास चांगले चालते. जास्थ पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते. ते सावलीत वळून ठेवावे. एक्स्पोर्ट चे कारण : पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत. हाडांचे झीजने कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झला आहे.

डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे


1.हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो.

2.सांध्यांना आराम -
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

3.वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.

4.बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो.

5.कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

6.जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

7.थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.

8.हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते.

9.अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.

10.रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे


जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!
कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे.
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्यास मदत होते.
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते.
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात.
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव.
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते.
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

देशात प्रथमच नदीखालून बोगदा


हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखालील दुहेरी बोगद्याचे बांधकाम पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. देशातील हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरणार आहे. कोलकात्यातील रेल्वेच्या १६.६ किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पांतर्गत ५२० मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

नदीखाली ३० मीटर खोल या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. यातील एक मार्ग पूर्वेकडे, तर दुसरा मार्ग पश्चिमेकडे जाणार आहे. हावडा आणि महाकरण मेट्रो स्टेशनदरम्यान ये-जा करणारे प्रवासी या बोगद्यात प्रवासादरम्यान फक्त एक मिनिटासाठी असतील. मेट्रो ट्रेन या बोगद्यातून ८० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहे. १६.६ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पामध्ये १०.६ किमी लांबीचा बोगदा असून त्याचा ५२० मीटरचा भाग नदीखालून जाणार आहे. नदीखालून बोगदा तयार करण्यासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च आला आहे; तर संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा खर्च सुमारे ९ हजार कोटी रुपये आहे.

नदीखालील बोगद्याच्या निर्मितीचे काम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते. पूर्व-पश्चिम मेट्रो ऑगस्ट २०१९मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्यामध्ये पादचारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

अशी असेल १ रूपयाची नवी नोट


भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रूपये मुल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने 30 मे रोजी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे.

नोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.

खासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती

आता परीक्षेद्वारे शिक्षक भरती, तावडेंचा ऐतिहासिक निर्णय
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई 30 May 20

मुंबई: राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या खासगी शाळांमधल्या शिक्षक भरीतासाठी यापुढे परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच मेरिटनुसारच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सरकारच्या या निर्णयामुळं शिक्षक भरतीसाठी लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती आता अभियोग्यता (ॲप्टीट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (CET) रद्द करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या, अनुदानास पात्र असलेल्या शैक्षणिक व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता आणण्यासह गुणवत्तेवर शिक्षकांची निवड व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याअंतर्गत शिक्षण सेवक पदांच्या भरतीसाठी राज्यस्तरीय समान काठिण्य पातळी चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही परीक्षा 200 गुणांची राहणार असून तिचे मराठी व इंग्रजी अशी दोन माध्यमे असतील.

इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, 1981 मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच “शिक्षक पात्रता परीक्षा” (TET)  उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील.

या चाचणीत मिळालेल्या गुणाच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांना रिक्त पदे आणि आरक्षण विषयक बाबींच्या अंतर्भावासह संबधित संगणकीय प्रणालीवर किमान 15 दिवसांकरिता प्रसिद्ध करावी लागणार आहे. कोणत्याही वर्षी प्राप्त झालेले चाचणीचे गुण कोणत्याही वर्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहे.

अभियोग्यता चाचणी देण्याची संधी उमेदवारास 5 वेळा मिळणार असून यातील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे संबंधित संस्थेकडे संगणकीय प्रणालीच्या आधारे अर्ज करता येईल.

तसेच राज्यातील सर्व शासन सहाय्यित संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च शाळांमधील शिक्षण सेवकांची रिक्त पदावर भरती करताना कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार “सरल” या संगणकीय प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची मान्यता करण्यात येणार आहे.

राज्यातील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदांची माहिती ही विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदूनामावलीनुसार “मदत” या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी  व्यावसायिक व किमान शैक्षणिक पात्रतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदुनामावलीनुसार जाहिरात “पवित्र” या संगणकीय प्रणालीमध्ये किमान 15 दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच सदर जाहिरात वृत्तपत्रांमधून संबंधित संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या आधारे करण्यात येणार असून यामुळे भरती प्रक्रियेतील अनुचित हस्तक्षेपाला आळा बसणार आहे.

खाजगी शाळेतील रिक्त पदांवर चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1981 मधील नियमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली  आहे. मात्र,स्वयंअर्थसहाय्यित शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवक भरतीस अभियोग्यता चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.

अहिल्याबाई होळकर - भाग 1



*अधिकारकाळ- डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५

*राज्याभिषेक- डिसेंबर ११, इ.स. १७६७

*राज्यव्याप्ती- माळवा

*राजधानी- रायगड

*पूर्ण नाव- पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर

*पदव्या- राजमाता

*जन्म- मे ३१ , इ.स. १७२५
चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत

*मृत्यू- ऑगस्ट १३, इ.स. १७९५
महेश्वर

*पूर्वाधिकारी- खंडेराव होळकर

*दत्तकपुत्र- तुकोजीराव होळकर

*उत्तराधिकारी- तुकोजीराव होळकर

*वडील- माणकोजी शिंदे

*राजघराणे होळकर

अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते.

*बालपण-

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.[१] (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महे श्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.

*शासक-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्र
इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात  चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाई च्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.


*त्यांच्याबद्दलची मते -
"अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."[२]

"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती." [३] "आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[४] अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.[५]

*आणखी मते -
अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.[६]

"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.[७]

वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.

भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.

*अहिल्याबाई होळकर यांचे टपाल तिकिट -
अहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.[१]

या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्ववि द्यालय" असे नाव देण्यात आले आहे".

*त्यांची भारतभरातील कामे -
अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अंबा गाव – दिवे.
अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चिखलदा – अन्नछत्र
चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जामघाट – भूमिद्वार
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
नैम्बार (मप्र) – मंदिर
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुणे (महाराष्ट्र) – घाट.
पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठीकुरणे.
बर्‍हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
बिठ्ठूर – ब्रह्मघाट
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
श्री वैजनाथ (परळी,)


प्रकाशित पुस्तके -

'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी.    
अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
'कर्मयोगिनी' : लेखिका - विजया जहागीरदार
महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर


प्रसिद्ध चित्रपट -

देवी अहिल्या बाई या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाई म्हणून (खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. [२]
अहिल्याबाईच्या जीवनकालावर, इ.एम.आर.सी.इंदूर तर्फे एक २० मिनिटांची डॉक्युमेंटरी चित्रफीत बनविली गेली होती.

   🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

अँड्रॉइड फोनवर‘ज्युडी’चा हल्ला


तुमच्याकडे अँड्रॉइड प्रणाली आधारित स्मार्टफोन असेल आणि तुम्ही एखादे अॅप सुरू केल्यावर स्क्रीनवर आलेली जाहिराती पाहण्याच्या मोहात पडला असाल तर सावधान! तुमच्या मोबाइलला ज्युडी या मालवेअरची लागण होण्याचा धोका आहे. कम्प्युटरना ग्रासलेल्या ‘वॉनाक्राय’ या मालवेअरच्या धक्क्यातून जग नुकते सावरत असतानाच या नव्या मालवेअरचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

ज्युडीची लागण आतापर्यंत ८.५ ते ३६.५ दशलक्ष वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनना झाल्याची भीती चेकपॉइंट या सायबर सुरक्षा सोल्युशन्स एजन्सीने व्यक्त केली आहे. या मालवेअरने गुगलचे अधिकृत अॅप स्टोअर असलेल्या ‘गुगल-प्ले’लाच आपले लक्ष्य बनवले आहे. ज्युडी हे मालवेअर जाहिरातींना चिकटत असल्याने त्याला अॅडवेअर असे म्हणण्यात येत आहे. ज्युडीची लागण एका कोरियन कंपनीने विकसित केलेल्या ४१ अॅपना झाल्यामुळे ज्युडीचे प्रताप उघड होऊ लागले. मात्र, ज्युडीमुळे किती देशांना फटका बसला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुगलप्लेवर उपलब्ध अॅपपैकी अनेक अॅप या मंचावर वर्षानुवर्षे उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स अद्ययावत केले गेले आहेत. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या अॅपना ‘ज्युडी’ची लागण झाली आहे, अर्थात कोणकोणत्या अॅपच्या आज्ञावलीमध्ये ज्युडीने स्वतःचे कोड घुसवले आहेत, हे कळण्यास वाव नाही. चेक पॉइंटने ज्युडीविषयी माहिती जाहीर केल्यावर गुगलप्लेने तत्काळ असे बाधित अॅप काढून टाकले आहेत.

▪️ज्युडीची कार्यप्रणाली

अँड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर पॉपअप होणाऱ्या जाहिरातींतून ज्युडी त्या मोबाइल फोनमध्ये प्रवेश करतो. मग वारंवार जाहिराती पॉपअप करून त्यावर क्लिक करण्यासाठी मोबाइल वापरकर्त्याला उद्युक्त करतो. अशा प्रत्येक क्लिकबरोबर या मालवेअरच्या निर्मात्यांसाठी ज्युडी महसूल मिळवतो.

‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा


भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलतर्फे येत्या दोन वर्षांत उपग्रह (सॅटेलाइट) फोन सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही सेवा सर्वांसाठी असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांची मोबाइलची सेवा अचानक ‘डाउन’ होण्याच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे.

‘बीएसएनएल’चे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव म्हणाले की,‘ आम्ही इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनकडे यासंदर्भात अर्ज केला आहे. या प्रक्रियेला काही वेळ लागण्याची शक्यता आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांमध्ये आम्ही देशभर सॅटेलाइट फोनसेवा सादर करू. सॅटेलाइट फोनचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात ते सेवा देऊ शकतील. इतकेच नव्हे तर, विमानात किंवा पाणबुड्यांमध्येही ते सेवा देण्यास सक्षम आहेत. परंपरागत मोबाइल टॉवर आजूबाजूच्या पंचवीस ते तीस किलोमीटर क्षेत्रातच कार्यरत राहू शकतात. मात्र, सॅटेलाइट फोनच्या सेवेवर कार्यक्षेत्राची मर्यादा येत नाही.’

सॅटेलाइट फोनसाठी ‘बीएसएनएल’तर्फे ‘INMARSAT’सेवेची मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा सरकारी आस्थापनांसाठी कार्यरत होणार आहे. त्यामध्ये पोलिस, रेल्वे, बीएसएफ आदींचा समावेश आहे. त्यानंतर सर्वसामान्यांनाही सॅटेलाइट फोनचा उपयोग करता येणार आहे. सध्या देशात अतिशय अल्प प्रमाणात सॅटेलाइट फोनचा वापर केला जातो.