१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.
२) भरपूर टाळ्या वाजवा.
३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.
४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )
५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.
६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )
७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.
८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.
९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.
१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.
११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.
१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.
१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.
१४) चौरस आहार घ्या.
१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.
१६) Black Tea च प्या.
१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.
१८) ध्यानधारणा करा.
१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.
२०) सत्य बोला. समाजसेवा करा.
२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.
२२) नैसर्गिक जीवन जगा.
२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.
२४) पोट साफ ठेवणे.
२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.