शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Sunday 30 June 2024

शालेय पोषण आहार Excel 8.0

  दीर्घ कालावधीपासून आपल्या सर्वांची विनंती व मला येणारे असंख्या मेसेज या सर्वांचा विचार करुन शालेय पोषण आहार एक्सेल शीट अपडेट केली आहे. या नविन शीटचे नाव आपण MDM 8.0 असे ठेवले असून यामध्ये या आगोदरच्या MDM 7.0 या शीटमधील काही किरकोळ त्रुटी दूर केल्या आहेत. नक्कीच ही शीट आपल्याला आवडेल. आपण डाऊनलोड करुन वापरा, इतरांनाही सांगा...!


सदर एक्सेल शिट कशी वापरायची ? यासंदर्भातील सूचना सविस्तर वाचण्यासाठी व शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


Monday 28 August 2023

मी तंत्रस्नेही होणारच - ऑनलाइन मार्गदर्शन बॅच -4

 शिक्षक बंधू-भगिनींनो,

मी तंत्रस्नेही होणारच ! अंतर्गत शिक्षक बंधू-भगिनींना त्यांची नोकरी करताना येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी व करावी लागणारी तंत्रज्ञानाची कामे शिकवण्यासाठी आपण जो उपक्रम हाती घेतला आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत तीन बॅच पूर्ण झाल्या आहेत. या अंतर्गत चौथी बॅच कधी सुरू करणार ? अशी बहुसंख्य शिक्षकांनी विचारणा केली होती. अशा सर्व शिक्षक बंधू-भगिनींना कळविण्यात येते की आपण जर या चौथ्या बॅचमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर नाव नोंदणी सुरू झाली आहे...!

🟢 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून कोणत्याही एकाच WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा. पुढील माहिती या ग्रुपवरच दिली जाईल.

ग्रुप 1-    Click Here For Join Groupe

ग्रुप 2-    Click Here For Join Groupe

✳️ महत्त्वाची वैशिष्ट्ये- ✳️

1️⃣ दररोज एक तास ( आठवड्यातील सहा दिवस ) ऑनलाइन मार्गदर्शन होईल. कोर्स कालावधी तीन महिन्यांचा असेल. ( 70 ऑनलाईन सेशन्स )

2️⃣ शिकवलेल्या भागाचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाईल, त्यामुळे न समजलेला भाग पुन्हा रेकॉर्डिंग पाहून सराव करता येईल.

3️⃣ तंत्रज्ञान विषयक सर्व कामे मोबाईल वरूनच कशी करावी, हे शिकवले जाईल, त्यामुळे आपल्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसला तरी काही हरकत नाही. 

4️⃣ शिक्षकांना दररोज करावे लागणारी ऑनलाईन कामे, सर्व शालेय पोर्टल, गुगल प्रॉडक्ट्स, सायबर सुरक्षा, वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, फाईल मॅनेजमेंट, डॉक्युमेंट मॅनेजमेंट याशिवाय आणखी बरेच काही शिकायला मिळेल.

5️⃣ ज्यांना तंत्रज्ञानातील काहीही माहिती नाही, अशा शिक्षक बंधू भगिनींसाठीच हे मार्गदर्शन असल्यामुळे अगदी सुरुवातीपासून अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन होईल.

6️⃣ झालेल्या भागावर स्वाध्याय दिला जातो व तपासला जातो, अडचण आले येत असल्यास मदत केली जाते.

तर मग आता विचार कसला करताय ? आत्तापर्यंत झालेल्या तिनही बॅचमधील शिक्षक बंधू-भगिनी अत्यंत समाधानी असून याच्या तोडीचा दुसरा कोर्स कुठेही उपलब्ध नाही अशा प्रतिक्रिया या सदस्यांनी दिल्या आहेत. आपण सहभागी व्हाल तर आपलीही हीच खात्री पटेल.. चौथ्या बॅचमध्ये सहभागी होण्याची अनमोल संधी दवडू नका...!


Sunday 9 April 2023

वार्षिक निकाल एक्सेल 2022-23

 आपल्या शाळेचा निकाल तयार करण्यासाठी आवश्यक एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.Tuesday 7 June 2022

अनोखी साहित्यकृती "३९७ किलोमीटर"

 "३९७ किलोमीटर"

खाली दिलेल्या पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करून सदर साहित्यकृती आपण खरेदी करू शकता.


''लोकायत प्रकाशन' सातारा संस्थेमार्फत लवकरच प्रकाशित होणारी "३९७ किलोमीटर " ही साहित्यकृती वाचकांच्या भेटीला आली आहे.

              " संघर्षाच्या मैदानात कधीकधी समोर आभासी रूपातील अपयश दिसत असतानाही जो परतीचे दोर कापून टाकतो आणि प्राप्त परिस्थितीला धैर्याने सामोरे जातो तोच अंतिमत: 'विजयी 'ठरतो ,,ही जीवनाच्या कठीण प्रसंगात वापरली जाणारी मनोभूमिका सांगणारं पुस्तक...असं या पुस्तकाचं थोडक्यात वर्णन करता येईल."

        नव्या वाचनवाटा धुंडाळत जाणार्‍या जाणकार वाचकांना,नवयुवकांना समर्पित हे पुस्तक आपणास निश्चित आवडेल ही अपेक्षा बाळगतो.,...

"३९७ किलोमीटर" लवकरच महाराष्ट्रभर प्रकाशित झाली आहे .🙏🙏


प्रकाशक ..- लोकायत प्रकाशन ,सातारा


Tuesday 4 January 2022

DMAT ( डिमॅट ) अकाऊंट - महत्व व फायदे

                        मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना कालावधीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होऊ लागली. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बँकेच्या वेळोवेळी व्याजदर घटवण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्या कष्टाच्या पैशाला जास्तीत जास्त परतावा शोधण्याचे मार्ग सुरू झाले. त्यातूनच गेल्या दीड वर्षामध्ये भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. साधारणपणे 2000 ते 2020 या वीस वर्षात जितकी डिमॅट अकाउंट खाती भारतीय शेअर बाजारात खोलली गेली, तितकीच नवीन खाती फक्त 2020 नंतर दीड वर्षात खोलली गेली. यावरून नवीन पिढी शेअर मार्केट कडे किती झपाट्याने वळत आहे हे लक्षात येते. भारताबरोबर भारताच्या बाहेरून देखील मोठ्या प्रमाणावर पैसा भारतीय शेअर मार्केट मध्ये गुंतवला जात आहे. कारण 2030 पर्यंत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा विकास होईल यावर सर्व जगातील गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले तर दरवर्षी किमान 20% ते 30% परतावा सहज मिळू शकतो. म्हणूनच डिमॅट अकाउंट खोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हालाही जर डिमॅट अकाउंट खोलायचे असेल तर खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आपले खाते खोलण्याची प्रोसेस सुरू करू शकता.


कागदपत्रे काय लागतील ?

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) रंगीत फोटो

४) कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक

५) सही

                वरील सर्व कागदपत्रांचा मोबाईल मध्ये फोटो काढून व्यवस्थित क्रॉप करून ठेवावा. खाते उघडण्याच्या प्रक्रियेत या इमेजेस आपल्याला अपलोड कराव्या लागणार आहेत.


खर्च किती येईल ?

                     Upstox मध्ये सध्या खाते नि:शुल्क उघडले जाते. पण ही मर्यादित कालावधी ऑफर असल्यामुळे  आपण खाते उघडत असताना जर ही ऑफर अस्तित्वात नसेल तर आपल्याकडून दोनशे ते तीनशे रुपये चार्ज घेतली जाण्याची शक्यता आहे. पण वरील बटणावर क्लिक करून आपले खाते उघडून पूर्ण होईल, व आपण पहिला शेअर्स खरेदी कराल, तेव्हा चारशे रुपये कॅशबॅक Upstox कडून आपल्या अकाउंटला जमा केला जाईल. म्हणजेच आपला गेलेला खर्च पुर्ण वसूल...!

शेअर्स व्यतिरिक्त कमाई शकते का ?

                     होय, तुम्ही जर शेअर्स खरेदी विक्री करू इच्छित नसाल तर, तुमच्या ॲप मधून तुमच्या मित्रांना खाते खोलण्याची रेफरल लिंक पाठवून कमाई करू शकता. तुम्ही पाठवलेल्या लिंक मधून जर तुमच्या मित्राने अकाउंट खोलले तर त्या बदल्यात तुम्हाला 800 रुपये कॅश बॅक मिळतो. व तुमच्या मित्राने पहिला शेअर्स घेतल्यावर मित्राला चारशे रुपये व तुम्हाला चारशे रुपये कॅश बॅक मिळतो. म्हणजे तुमच्या मित्राने फक्त खाते खोलले व काहीही खरेदी-विक्री केली नाही, तर तुम्हाला आठशे रुपये मिळणार. पण मित्राला काहीही मिळणार नाही. पण जर त्यांनी खाते उघडून एक शेअर्स खरेदी केला ( नंतर त्याच दिवशी विकला तरी चालेल ) तर तुम्हाला बाराशे रुपये व मित्राला चारशे रुपये कॅशबॅक मिळेल. या पद्धतीने आपण कितीही व्यक्तींना रेफर करू शकतो.

Thursday 14 October 2021

1 जुलै ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीतील महागाई भत्ता फरक

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपली माहिती भरा व 1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 अखेर 5 टक्के प्रमाणे महागाई भत्ता फरक किती होईल ते पहा..


Friday 8 October 2021

28 % महागाई भत्त्यासह वाढलेले वेतन पहा

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपली माहिती भरा व 1 ऑक्टोबर 2021 नंतरचे आपले नविन वेतन, वाढलेला महागाई भत्ता आणि जुलै ते सप्टेबर 2021 अखेर महागाई भत्ता फरक किती होईल ते पहा..Wednesday 30 June 2021

1 जुलै 2021 नंतर तुमचा पगार किती निघणार ?


Online वेतनवाढ कॅल्क्युलेटर
खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपली माहिती भरा व आपले वेतन पहा..Thursday 2 April 2020

शालेय पोषण आहार शिल्लक साठा वाटप एक्सेल


१) फक्त पट व मागील शिल्लक साठा भरा.
२) वाटप अहवाल आपोआप तयार होईल.
३) इयत्ता निहाय प्रत्येक वर्गाची यादी तयार होते. फक्त विद्यार्थ्यांची नावे टाका, वर्गाची यादी तयार होईल.
४) शाळेचे नाव, पट, व शिल्लक साठ्याची माहिती इनपुट या पानावर भरावी. 


                  तांदूळ, सर्व कडधान्ये व मसाल्याचे पदार्थ वाटप करण्यासाठीची शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
                फक्त तांदूळ व सर्व कडधान्ये वाटप करण्यासाठीची शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.Sunday 23 February 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी फरक बिल एक्सेल 2020


नमस्कार !

सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजीत राऊत साहेब यांची ठोस भूमिका आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचा पाठपुरावा यामुळे यावर्षी देखील महाराष्ट्रात प्रथम सांगली जिल्ह्यात वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली. आता शिक्षकांचे फरक बिल काढण्यासाठी एक्सेल घेऊन आलो आहे. आपल्याला निश्चितच उपयोग होईल.


वरिष्ठ वेतन श्रेणी एक्सेल कशी वापरावी या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

वरिष्ठ वेतन श्रेणी एक्सेल फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.एक्सेलचा वापर करून फरक बिल तयार करणे-
१) सुरुवातीला Input या पेज वरील तक्त्यात कर्मचाऱ्यांची सर्व माहिती भरून घ्यावी.
२) Difference या शिटवर कर्मचार्‍याच्या नावासमोर असणाऱ्या पिवळ्या चौकटीत Input या शिट वरील कर्मचाऱ्याचा अनुक्रमांक नंबर टाकून एंटर करा.
३) आपले फरक बिल तयार झालेले दिसते.

खाली दिसणार्‍या अनावश्यक कोऱ्या चौकटी घालवण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा-
१) Difference शिट ओपन करा.
२) REVIEW बटण मधून किंवा  शिटच्या नावावर राईट क्लिक करून Unprotect Sheet वर क्लिक करा.
३) पासवर्ड विचारला जाईल, pdshinde हा पासवर्ड टाका व OK करा.
४) जितक्या रो नको आहेत तितक्या रो डावीकडील रो नंबर सिलेक्ट करा व राइट क्लिक करून Hide करा, डिलीट करू नका.

महत्त्वाच्या सूचना-
१) सर्व शीट एकमेकांशी लिंक केल्या आहेत, त्यामुळे कोणतीही शीट डिलीट करू नये, असे झाल्यास एक्सेल काम करणार नाही.
२) Difference शीट अनप्रोटेक्ट केल्यानंतर शिट मध्ये इतरत्र कोठेही क्लिक करू नये. त्या ठिकाणचा एखादा फॉर्म्युलाला निघून गेला तर आपले कॅल्क्युलेशन चुकू शकते.
३) आपल्याला माहिती फक्त Input या पेजवरच भरायची आहे, इतरत्र ती आपोआप घेतली जात असल्याने इतर कोठेही काहीही टाईप करू नये.
४) संगणकाचा डेट फार्मॅट दिनांक,महिना,वर्ष ( DDDMMYYYY ) असाच असायला हवा. आपला संगणकाचा डेट फॉर्मेट महिना अगोदर व तारीख नंतर असा दिसत असेल तर कॅल्क्युलेशन चुकीचे येते.
५) सदर शिट संगणक किंवा लॅपटॉपवरच योग्यप्रकारे काम करेल. मोबाईलवर योग्य प्रकारे काम करेल याची खात्री देता येत नाही.