शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Sunday 28 May 2017

पे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु


मोबाईलचा वापर करून खरेदी विनिमयाचे माध्यम पेटीएमने आपल्या पेमेंट्स बँकेची सुरुवात 23 मे 2017 पासून सुरू केली. ऑनलाईन व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकाला अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याचीही आवश्यकता नसलेली ही भारतातील पहिली बँक आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेचे डिझाईन देशात आर्थिक समावेशन साध्य करण्यात मदत करण्यासह अर्ध्या अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पेटीएमच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. कंपनीचे हेतू ग्राहकांना रोख व्यवहारांकडून डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टममध्ये आणण्याचा आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक खाते सुरूवातीस केवळ-आमंत्रण तत्त्वावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपल्या कर्मचा-यांसाठी आणि सहकारिंसाठी बीटा बँकिंग ऍप्लकेशन तयार करेल. पेटीएम ग्राहक ऍप्लकेशनवर जाऊन आमंत्रणाकरिता विनंती करू शकतात.

याबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा म्हणाले, आरबीआयने आम्हाला जगात एक नवीन मॉडेल बनविण्याची संधी दिली आहे. ग्राहकांचे पैसे सरकारी बाँडमध्ये सुरक्षित पद्धतीने राहणार आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी हे अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या ठेवींना सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.’
पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती यांनी सांगितले की, ’आम्ही पेटीएम पेमेंट बँक दाखल करताना अतिशय आनंदित आहोत आणि बँक सुविधेरहित ग्राहकांकरिता आर्थिक सेवा घेऊन आलो आहोत. आमची महत्वाकांक्षा भारतातील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल बँक बनण्याची आहे. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करीत आम्हाला 2020 पर्यंत 50 कोटी भारतीयांची आवडीची बँक बनायचे आहे.’

कॅशबॅक मिळवा…

पेटीएम बँकेत निधी ठेवल्यास 4 टक्के व्याज देण्यात येईल. याचप्रमाणे बँक खात्यात 35 हजारापर्यंत रक्कम जमा केल्यास 250 रुपये कॅशबॅक मिळेल. ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.