शिवशाहीर विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑग्स्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव या लहान गावात झाला करोडो विश्वे दारिद्र्ये असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला . असे हे अण्णाभाऊ साठे गरीब व निरक्षर पोर.
गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी ब्राम्हण शिक्षकाकडून अपमानीत होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाचा संबंध,तांत्रिक दुष्ट्या पूर्ण निरक्षर , अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड्मय , कथा , नाट्य , पथ नाट्य , लोकनाट्य ,कादंबऱ्या ,चित्रपट , पोवाडे , लोकगीत ,लावण्या ,वग ,गवळण , प्रवास वर्णन , रेखा चित्र असे सर्वच साहित्य प्रकार सशक्त व समृद्ध केले . अण्णाभाऊंनी मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्या मराठी माणसाला त्याची मुंबई संयुक्त महाराष्ट्र्रा सोबत परत मिळवून दिली .
अण्णाभाऊंची एकूण पुस्तके / ग्रंथ संख्या ७७ आहे शिवाय त्यांचे काही साहित्य गहाळही आहे अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले. पुढे त्यांचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतीकडून त्याचा सन्मान देखील झाला.
लोकनाट्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी झिडकारून मातृभमिसह शिवरायांना वंदना असणारी परंपरा रुजू केली ती अशी
'' प्रथम नमन मायभूच्या चरणा !
छत्रपती शिवबा चरणा !
स्मरोनी गातो कवना "!
माझी मैना गावावर राहिली,माझ्या जीवाची होतीय काहिली " हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनी लिहले आहे
१६ ऑगस्ट १९४७ साली " ये आझादी झुटी है देश की जनता अभी भूखी है !" असा नारा शिवाजी पार्क वर अण्णा भाऊंनी दिला. तेंव्हा त्या दिवशी रुद्ररूप धरण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही तरी देखील अण्णाभाऊ मागे हटले नाही.
अण्णाभाऊंच्या वैजयंता ,माकडीचा माळ ,चिखलातील कमळ , वारणेचा वाघ , अतगुज ,फकीरा या सात कादंबऱ्या मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले . चार चित्रपटांना विविध पारितोषिके देखील मिळाली शुक्रवार दिनांक १८ जुलै १९६९ रोजी टिळा लावते मी रक्ताचा हा शेवटचा चित्रपट प्रसिद्ध होताच अण्णाभाऊ हि श्रमिकांची रंगभूमी कायमची सोडून गेले त्यांना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले या उलट , कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर हे पुण्यातील अत्यंत श्रीमंत घरातील होते त्यांचे पुण्यात व पुढचे उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये पूर्ण झाले . पुढील आयुष्य त्यांनी अमराठी व स्वजातीच्या लोकांच्या हितासाठी खर्चकेले तसेच एकून १४ (कादंबरी , ललित लेख , कविता संग्रह , नाटक ) + अनुवादित बरेच लिखाण त्यांनी केले . पण कुठेही मराठी , भूमिपुत्र,संघर्ष ,श्रमकरी , कष्टकरी , शेतकरी यांच्या वास्तववादी व्यथा त्यांनी मांडल्या नाहीत .
शिवाय त्यांना पेशवाई व ब्राम्हण शाहीचा फारच पुळका . पण खोट्या इतिहासकारांनी फुकटच्या अफवा पसरवून कुसुमाग्रजांनी आयुष्य भर मराठी ची सेवा केली असे सांगून सरकारकडून तो मराठी भाषा दिन म्हणून लागू करून घेतला . कुसुमाग्रजांना अण्णाभाऊंच्या तुलनेत प्रदीर्घ आयुष्य लाभून सुद्धा (८७वर्षे ) चार बोटावर मोजण्या इतक्या साहित्यीकांशिवाय त्यांना कोणीच ओळखत नाही .
… पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल व परंपरागत निरक्षर वातावरणात , वाईट -रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण - संपत्ती नाकारलेल्या समाजात , अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात , शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येवून जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे अण्णाभाऊ साठे यांनी कुसुमाग्रजापेक्षा लाखो पटीने लिखाण केले , मराठी भाषाच नव्हे तर प्रांत समृद्ध केला , पण ते कोणाही ब्राम्हण नव्हते एवढीच काय ती कमतरता .
म्हणून शिवरायांचे विचार रशियापर्यंत नेणारे व 'जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव " असे म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांशी आमची वैचारिक नाळ जोडून देणारे मराठी साहित्य सम्राट, विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिवस १ ऑग़स्ट हा खरा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करूयात हा मराठी भाषा दिन प्रत्येक मूलनिवासी बहुजनांच्या घरा -घरात साजरा व्हावा , शिवरायांच्या तमाम मावळ्यांनी तो सणा सारखा साजरा करावा