शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 1 June 2017

अहिल्याबाई होळकर - भाग 1*अधिकारकाळ- डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५

*राज्याभिषेक- डिसेंबर ११, इ.स. १७६७

*राज्यव्याप्ती- माळवा

*राजधानी- रायगड

*पूर्ण नाव- पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर

*पदव्या- राजमाता

*जन्म- मे ३१ , इ.स. १७२५
चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत

*मृत्यू- ऑगस्ट १३, इ.स. १७९५
महेश्वर

*पूर्वाधिकारी- खंडेराव होळकर

*दत्तकपुत्र- तुकोजीराव होळकर

*उत्तराधिकारी- तुकोजीराव होळकर

*वडील- माणकोजी शिंदे

*राजघराणे होळकर

अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते.

*बालपण-

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.[१] (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महे श्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.

*शासक-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्र
इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात  चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाई च्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.


*त्यांच्याबद्दलची मते -
"अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."[२]

"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती." [३] "आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[४] अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.[५]

*आणखी मते -
अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.[६]

"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.[७]

वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.

भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.

*अहिल्याबाई होळकर यांचे टपाल तिकिट -
अहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.[१]

या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्ववि द्यालय" असे नाव देण्यात आले आहे".

*त्यांची भारतभरातील कामे -
अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अंबा गाव – दिवे.
अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चिखलदा – अन्नछत्र
चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जामघाट – भूमिद्वार
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
नैम्बार (मप्र) – मंदिर
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुणे (महाराष्ट्र) – घाट.
पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठीकुरणे.
बर्‍हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
बिठ्ठूर – ब्रह्मघाट
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
श्री वैजनाथ (परळी,)


प्रकाशित पुस्तके -

'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी.    
अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
'कर्मयोगिनी' : लेखिका - विजया जहागीरदार
महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर


प्रसिद्ध चित्रपट -

देवी अहिल्या बाई या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाई म्हणून (खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. [२]
अहिल्याबाईच्या जीवनकालावर, इ.एम.आर.सी.इंदूर तर्फे एक २० मिनिटांची डॉक्युमेंटरी चित्रफीत बनविली गेली होती.

   🔲🔲🔲🔲🔲🔲🔲