शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Sunday, 24 March 2019

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल

सातव्या वेतन आयोगानुसार आपला पगार किती होतो तसेच फरक बीलाची रक्कम किती होईल हे पाहण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सेल शीट उपलब्ध करून दिल्या आहेत त्या वापरण्यासंदर्भातच्या सूचना व एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
( एक्सेल शीट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आपली अडचण माझ्या 9011116046  या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी, कृपया फोन करू नये. )

31 मार्च 2019 अखेर फरक बील काढण्यासाठीची एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 
Tuesday, 19 February 2019

वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील एक्सेल

23/10 च्या शासन निर्णयानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात वरिष्ट वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टीमने केलेले अथक परिश्रम आणि सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजित राऊत साहेब यांचे अनमोल सहकार्य अतुलनिय आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ लगेचच येणार्‍या पगारात देण्यात येणार असल्याचे राऊत साहेबांनी आश्वासन दिल्याने 31 जानेवारी 2019 अखेर पर्यंतचे आपले फरक बील काढण्यासाठी शिक्षक बांधवांना बरीच धावपळ करावी लागणार आहे. नेमकी हिच अडचण ओळखून शिक्षक बांधवांना मदत करण्यासाठी फरक बीलाची ही शीट तयार करण्यात आलेली आहे. 

फरक बीलाची ही शीट डाऊनलोड करण्यासाठी तसेच वापर करण्यासंदर्भातील सूचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा..