शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील एक्सेल

नम्र सूचना -
या आगोदर आपल्याला दिलेल्या फरक बिल एक्सेल शीट मध्ये थोडी त्रुटी होती. ती काढून सदर एक्सेल परत आपल्याला देत आहे.

सदर एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


या एक्सेल सॉफ्टवेअरमध्ये तयार झालेले नमुना फरक बील पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल काढा फक्त दहा सेकंदात....!!
कसे ??

वर दिलेल्या एक्सेल शीट मध्ये आपले वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल कसे तयार करावे ?

१) सुरुवातीला शीट ओपन केल्यानंतर पिवळ्या रंगात रंगवलेल्या चौकटीमध्ये आपली ज्या दिवशी बारा वर्षे पूर्ण होतात ती तारीख व त्या महिन्याचा मूळ बेसिक पगार टाकावा.

२) आपले नाव व शाळेचे नाव बदलून घ्यावे.

३) बारा वर्षे पूर्ण झालेली तारीख  लिहीत असताना महिना व वर्ष टाईप करू नये. त्यासाठी ड्रॉप-डाऊन लिस्ट दिलेली आहे त्या चौकटीवर क्लिक करताच चौकटीच्या शेजारी छोटा काळ्या रंगाचा त्रिकोण दिसेल. त्या त्रिकोणावर क्लिक करून पूर्ण  महिन्यांच्या नावाची यादी दिसते त्या यादीतून महिना निवडावा. वर्ष देखील अशाच प्रकारे निवडावे.

४) आपले फरक बिल तयार झालेले दिसेल.

५) लीगल पेज वर प्रिंट काढा.

सूचना-
१) सदर शीट मध्ये सर्वत्र  सूत्रे दिली आहेत त्यामुळे कोणताही कॉलम अथवा रो *डिलीट* करू नये.

२) या शीट मध्ये ऑक्टोबर 2017 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीतील फरक बिल तयार होईल.

३) तयार झालेल्या फरक बीलातील आपल्याला नको  असलेल्या रो ( ज्या ठिकाणी 0 आहे ) हाईड कराव्यात डिलीट करू नयेत.

४) सदर एक्सेल शीट पासवर्ड प्रोटेक्टेड केली आहे. आपल्याला अनप्रोटेक्ट करायचे असेल व त्यात काही बदल करायचा असेल तर त्यासाठीचा पासवर्ड pdshinde असा आहे.

सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर
श्री. परशुराम शिंदे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली