शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय पोषण आहार 8.0

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी या आगोदर तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत ! 

नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 8.0 आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. 


सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये-
1) पूर्णपणे युनिकोड मध्ये बनविले आहे, त्यामुळे कोणत्याही मोबाईल वरून किंवा कॉम्पुटरवर वापरता येईल. ( आपल्याला जर सदर फाईल मोबाईलवर वापरायची असेल तर मोबाइलवर Microsoft Excel किंवा Office 365 नावाचे ॲप इन्स्टॉल करायला हवे. )
2) फक्त रोजची उपस्थिती व वापरलेले कडधान्य नोंदवावे लागते. 
3) मासिक उपयोगिता, मासिक तांदूळ हिशोब, वार्षिक उपयोगिता हे सर्व रिपोर्ट आपोआप तयार होतात.
4) सर्व मालाची साठा नोंदवही आपोआप तयार होते.
5) सर्व रिपोर्ट, साठा नोंदवही, तसेच प्रत्येक महिन्याची नोंदवही या सर्वांची A4 साईज पानावर प्रिंट काढता येते. 

महत्वाच्या सूचना -
1 ) ही एक्सेल ओपन केल्यानंतर होमपेजवर आपल्या शाळेचे नाव व केंद्राचे नाव टाकून घ्यावे. सीटमध्ये आत इतरत्र कोठेही शाळेचे नाव टाकण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आपोआप होम पेज वरील नाव घेतले जाईल. नाव टाकण्यासाठी गूगल इनपुटचा ( युनिकोड मराठी टायपिंग ) वापर करावा.
2 ) होम पेज वर दिलेल्या महिनावार माहिती भरणे व रिपोर्टच्या बटणावर क्लिक करून हव्या त्या पानावर जाता येईल.
3 ) शालेय पोषण आहारसाठी शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल पासून होते. त्यामुळे 31 मार्च रोजीचा शिल्लक साठा एप्रिलच्या शीटवर मागील शिल्लक वस्तू या रो मध्ये भरून घ्यावा.
4 ) महिन्यामध्ये ज्या तारखेला तांदूळ प्राप्त होतो ती तारीख न चुकता पिवळ्या रंगाच्या सेलमध्ये लिहावी. तारीख टाईप करू नये तर त्याठिकाणी दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करावी. लक्षात ठेवा तारीख निवडली नाही तर तांदूळ हिशोब वही मध्ये तांदळाची नोंद घेतली जात नाही.
5 ) केशरी रंगाच्या पट्टीमध्ये आपल्या जिल्ह्यातील प्रमाण सेट करून घ्यावे. 
6 ) दररोज पट व उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या लिहावी. त्यापुढील कडधान्याच्या कॉलम मध्ये लिस्ट मधून शिजवलेले योग्य ते कडधान्य सिलेक्ट करावे.

सर्व शीट एकमेकांशी लिंक केलेल्या आहेत त्यामुळे कोणतीही शीट डिलीट करू नये. तसेच शीट मधील सूत्रे वापरताना चुकून निघू नयेत म्हणून प्रोटेक्ट केली आहे.


पासवर्ड- pdshinde

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून Sheet डाउनलोड करा.

इयत्ता 1 ली ते 5 वी -   




इयत्ता 6 वी ते 8 वी -