शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

वार्षिक निकालपत्रक एक्सेल शीट सन 2022-23

 वार्षिक निकालपत्रक एक्सेल शीट सन 2022-23

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन निकालपत्रक एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या. कृपया आगोदर खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

Excel कशी वापरावी हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन व्हिडिओ पहा.

महत्वाच्या सूचना- 

1. सदर शीटमध्ये 100 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता येतो, आपल्याकडे यापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर शीट अनप्रोटेक्ट करुन हवे तितके रो इन्सर्ट करावेत. 1 ला व 100 वा रो यांच्या मध्येच इन्सर्ट करावे. वरच्या रो चा फॉर्म्युला ड्रॅग करुन घ्यावा.

2.  आपल्याला पहिल्या व दुसर्‍या सत्राचे संकलित व आकारिक गुण भरायचे आहेत.  बाकी आकडेमोड जसे की एकूण, श्रेणी, टक्केवारी आपोआप निघणार आहे.

3. Home या पेजवर आपल्या शाळेची माहिती भरावी, आतील सर्व शिटवर ती आपोआप येईल.

4. सत्र 1 व सत्र 2 साठी स्वतंत्र गुण भरण्याची सोय आहे. गुण भरण्याच्या शीटवर गुण भरले की श्रेणीनिहाय गोषवारा, जातनिहाय गोषवारा व वार्षिक सरासरी निकाल आपोआप तयार होतो .

5. Legal पेजवर प्रिंट काढता येईल असे पेज सेटअप केलेले आहे.

6. सर्व शीट एकमेकाशी हायपर लिंकने जोडलेल्या आहेत, त्यामूळे कोणतीही शीट डीलीट करु नये.

7. काम करत असताना चुकून शीटमधील फॉर्म्युले डिलीट होऊ नयेत म्हणून शिट प्रोटेक्ट केलेल्या आहेत, आपण pdshinde हा पासवर्ड वापरुन अनप्रोटेक्ट करु शकता.