शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आत्ताची माणसंगरम कढईतल्या मोहरीपेक्षा,
माणसं तडतड करत आहेत.
काय झालंय कळत नाही,
फारच चीडचीड करत आहेत.

नातेवाईक असो, मित्र असो,
भयंकर स्पर्धा वाढलीय.
तेंव्हापासूनच माणसाची,
मानसिक अवस्था बिघडलीय.

कुणी कुणाला काहीच विचारीना,
मनानचं कसंही वागायलेत.
आजूबाजूच्या लोकांकडून,
जास्तच अपेक्षा ठेवायलेत.

कमाई किती, खर्च किती,
काहीच कुठे मेळ नाही.
भेटायला जाणं, गप्पा मारणं,
आता कुणालाच वेळ नाही.

कॅपॅसिटी नसतांनाही,
खरेदी उगीच करायलेत.
Salary व्हायलीय कमी,
अन हप्तेच जास्त भरायलेत.

शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,
की हा घेतो फोर व्हीलर.
दूध बॅग आणायला सांगितली की,
मोजीत बसतो चिल्लर.

अरे, अंगापेक्षा बोंगा,
कशाला वाढवून बसतो.
पगार जरी झाली तरी,
उदास भकास दिसतो.

पर्सनल लोन, Gold लोन,
जे भेटेल, ते घ्यायलेत,
दिलेले पैसे मागितले तरी,
गचांडीलाच धरायलेत.

सहनशीलता आणि  संयम,
कुठे चाललाय कळत नाही,
पॅकेज भरपूर मिळायलंय,
पण, समाधान काही मिळत नाही.

घरी काय दारी काय,
नुसत्या किरकीरी वाढल्यात.
नवऱ्याला न सांगताच,
बायकांनी भिश्या काढल्यात.

कितीही साड्या, कितीही पर्स,
शर्ट गणतीच नाही.
तरीही कुरकुर चालूच असती,
धड साडी तर कोणतीच नाही.

मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,
तुला अक्कल नाही.
बायकोनं म्हणावं,
तुम्हालाच काही कळत नाही.

दोनदोन दिवस अबोला,
कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.
लग्न झालं की पोरं पोरी,
वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.

पत्नी पीडित नवऱ्याच्याही,
संघटना निघत आहेत.
डोळे मोठे करून पोट्टे,
बापाकडेच बघत आहेत.

दिवेलागण, शुंभकरोती,
'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,
शक्य असेल याच्यामुळेच,
माणसां माणसात वितुष्ट आलं.

इथं कुणी कुणाचं ऐकेना झालंयं
जो तो आपल्याच धुंदीत अनं मस्तीत जगायलयं
कामपूरता मामा धरायलयं

चित्त थोडं शांत ठेऊन,
जुनी पाने चाळावी लागतील.
यदाकदाचित पुन्हा माणसं,
एकमेकाशी प्रेमाने वागतील.