शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जिओ फोन बुक करायचाय ?

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त फीचर फोन आज (दि. 24 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बुकिंग जरी आज होणार असली तरी ग्राहकांच्या हातात हा फोन सप्टेंबर महिन्यात पडणार आहे. जो अगोदर बुक करेल, त्यालाच अगोदर हा फोन मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच फोन बुक करण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

1) मेसेजवर बुक करा
जर तुम्हाला दुकानांमध्ये रांगेत उभं रहायचं नसेल तर तुम्ही घरबसल्याही जिओ फोन बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल. यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन " JP> तुमचा पिनकोड> जवळच्या जिओ स्टोअरचा कोड " 7021170211 या क्रमांकावर पाठवावा लागेल. मेसेज पाठवताच तुम्हाला Thank You असा रिप्लाय येईल.( ज्या ग्राहकाला जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्याला जिओ स्टोअरचा कोड आवश्यक आहे. तो कोड आपल्या नजीकच्या जिओ स्टोअरकडून दिला जाईल, जिथे जिओ फोन उपलब्ध असेल.)

2) ऑनलाईन बुकिंग
हा फोन आपण My Jio अ‍‍पवर बुक करू शकता. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन Sign Up करू शकता. त्यानंतर KEEP ME POSTED वर क्लिक करून तिथे मागितलेली आवश्यक माहिती भरा.

3)  ऑफलाईन प्री बुकींग
आपल्या जवळच्या जिओ रिटेलरकडे जा. त्यांना आपण आपल्या आधारकार्डची एक फोटो देऊन बुकिंग करू शकता.
      जिओच्या 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येणार आहे, हा त्याचा सर्वात मोठा फायदा असेल. तुम्ही सतत इंटरनेट वापरत नसाल, तरीही तुम्हाला मोफत व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल. जिओ फोन हा 0 रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये 3 वर्षांनी परत मिळतील.
     जिओ फोन बुक करण्यासाठी ग्राहकाकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. आधार कार्डची फोटो कॉपी जवळच्या अधिकृत जिओ फोन विक्रेत्याला द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर असे करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.