शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

UDISE २०१७/१८ कसा भरावा ?

United District Information System Of Education      [UDISE]

चला समजून घेऊया UDISE २०१७/१८ कसा भरावा हे.


UDISE साठी आपल्या शाळेतील पटसंख्या व सर्व माहिती ३० सप्टेंबर २०१७ हि संदर्भित तारीख मानून संपूर्ण माहिती भरावी.
सर्व मध्यम अनुदानित विनाअनुदानित शाळांनी UDISE भरणे बंधनकारक आहे.
माहिती भरतांना इंग्रजी कॅपिटल मध्ये व अंकांच्या ठिकाणी आंतराष्ट्रीय संख्यांचाच वापर करावा.
UDISEचा १ ते ३ भाग आपणास छापील पुरवले जातील त्यात काही दुरुस्ती असल्यास लाल पेनने करावी.
१.८ मध्ये तुकड्या नोंदवतांना समजा तुमच्या शाळेत १ ली ची मान्यता पात्र १ तुकडी आहे.व शाळेत ६० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने आपल्या शाळेत २ तुकड्या असतील तर मान्यता नसलेली तुकडी सुद्धा येथे नोंदवायची आहे यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या पडताळता येणार आहे.
१.२० व १.२१ मध्ये शाळेस मान्यता वर्ष आपल्या मान्यता पत्रावरूनच टाकावा.
जसजसे मान्यता मिळत गेल्या त्या प्रमाणे वर्ष टाकावे.
१.२८ मध्ये शाळेचे मध्यम अचूक नोंदवावे .
१.२९ मध्ये शाळेत शिकण्यात येणाऱ्या
 [भाषा प्राथमिक साठी मराठी -10,इंग्रजी - 19 ]
[भाषा माध्यमिक व ५ वीच्या पुढील शाळेसाठी मराठी -10,इंग्रजी – 19,हिंदी -04 ]
व आपल्या शाळेत असतील त्या प्रमाणे अचूक नोंदवावे.
१.३३ मध्ये शाळांचे अंतर नोंद करतांना गावातीलच शाळा असल्यास .०५ कि.च्या आत असल्यास ० लिहावे व ०.५ च्या पुढे अंतर असल्यास पूर्णांकात नोदवावे


शाळा तपशील 
१.३६ मध्ये नोंद करतांना आपल्या गावात जास्त अंगणवाड्या बालवाड्या असल्यास आपल्या शाळेशी कनेक्ट परिसरातील सर्व अंगणवाड्या / बालावाडीचा समावेश करावा.एकूण विद्यार्थी संख्या व तेथे असलेल्या कर्मचारीसंख्या लिहावी. 

१.३७ ते १.४० RTE 2009नुसार माहिती नोंदवावी.
१.४१ खाजगी शाळासाठी 

a.चालू वर्षी RTE 2009नुसार २५% आरक्षणाने प्रवेश नोंदवा.

b. मध्ये मागील वर्षी RTE 2009नुसार प्रवेश केल्यापैकी  सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नोदावावी.
१.४२ शा.व्य.स.फकत शासकीय व शासनमान्य शाळांनी भरावी.

यात SMC चे बँक खाते माहिती आय एफ सी कोड व्यवस्थित पुस्तकात पाहून नोंदवावा.खाते सुरु आहे का याची खात्री करावी.


भाग २
२.१ शाळा इमारत- सर्व इमारत खोल्या निर्लेखित केल्या असलयास इमारत नाही असे -५ नोंदवा.

समजा एक खोली निर्लेखित असेल तर धोकादायक लिहा.

२.२ इमारत प्रकार  पक्की-१ अर्धी पक्की म्हणजे वरती पत्रा -२ कच्ची मातीची -३ तंबू -४

पुढील माहिती आपल्या स्थानिक उपलब्धतेनुसार नोंदवा.

 भाग ३ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संचमान्यतेनुसार अचूक नोंदवा.

छापील माहिती येईल त्यात दुरुस्ती असेल तर लाल पेनने करावी. नवीनपाने जोडण्याची आवश्यकता नाही.

{महत्वाचे  संकेतांक अचूक नोंदवावेत.}

भाग ४
आपणास ३० सप्टेंबर २०१७ च्या पटाला अनुसरून अचूक नोंदवा आपल्या शाळेचा पट जुळला पाहिजे.

   ४.१ पहिलीला प्रवेश वयोगट व पटसंख्या बरोबर यायला हवी.

४.२ चालू वर्षाची पटसंख्या १ ते ४ ओळीत  वर्ग निहाय नोंदवा त्या खाली एकूण पैकी ५ ते १७ मध्ये संख्या लिहावी .

४.३ वयोगटानुसार पटसंख्या लिहावी.[४.२ व ४.३ ची पटसंख्या इयत्ता व लिंगनुसार जुळली पाहिजे.]

४.४ माध्यमानुसार पटसंख्या लिहावी[ हि संख्या  ४.२ व ४.३ ची पटसंख्या इयत्ता व लिंगनुसार४ जुळली पाहिजे.]

४.५ पुर्नाप्रवेश असल्यास नोंदवा.

४.६ विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदवावी.

४.७ ते ४.९ उच्च माध्यमिक व जुनिअर कॉलेज साठी आहे ती अचूक नोंदवावी


भाग- ५ विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा शाळेतील नोंदीनुसार अचूक नोंदवा. 
मोफत पाठ्यपुस्तके
गणवेश
इतर

 भाग ६
शाळेतील मागील वर्षाचा निकाल जातवारी नुसार अचूक नोंदवा.

भाग -७
 उच्च माध्यमिक व जुनिअर कॉलेज साठी आहे मागील वर्षाचा निकाल जातवारी नुसार अचूक नोंदवावी.

भाग ८
शासकीय व शासन अनुदानित शाळेला शासनाकडून मिळालेला निधी व खर्च निधी नोंद करावी.

भाग -९ व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी आहे.

भाग ११ 
शाळेची अतिरिक्त माहिती प्रत्येक शाळेने अचूक नोदवावी शाळेतील बाबींची सत्यता पडताळून लिहावी.


काही शंका असल्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.