शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भाषण 3 - बदलत्या काळातील शिक्षकदिन


                                                               गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु
गुरुर देवो महेश वरा
गुरुर साक्ष्यात परब्रम्ह
तस्मय श्री गुरुवे नमः
अशा ध्वनीनादाने मन कित्ती प्रसन्न होते, नकळत आपले लाडके शिक्षक दैवत नजरेसमोर उभे राहते . मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो अथवा विषयीचे असोत. ती व्यक्ती आजन्म आपल्या लक्ष्यात राहते आपण ती विद्या आठवून सदोदित त्यांचे ऋणी राहतो. असा हा अविस्मरणीय दिन म्हणजे " सप्टेंबर " हा दिन शिक्षक दिवस म्हणुन ओळखला जातो.
जुन्या काळातली शिक्षण संस्था हि थोडी कठोर पण शिस्तप्रिय खूप होती . आजही काही प्रमाणात तीच परीस्थिती आहे.
पण... पण ...
त्या वेळी शिक्षकांसमोर शिक्षकांचा आदर करून त्यांना वंदनीय करून त्यांचे आदर्श आज्ञारुपी मनी वसवून त्याची अंमलबजावणी होत असे. अन आताच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली शिक्षकांची विद्यार्थी वर्गातील कित्तेक ठिकाणी होणारे त्याचे बाजारीकरण पाहून मन दु:खी होऊन जाते. येणारी नव पिढी उद्गारते "त्यात काय एवढे आम्ही पैसा देतोय त्या बदली ते आम्हांला शिकवतात." हे सारे बदलत चाललेल्या अत्याधुनिक नवनवीन शिक्षणसंस्थेच्या नियमांमुळे डोनेशन व्यवस्थेने दान दाता यामुळे आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होऊन एक गर्व पालकवर्गात हि बोळावतोय अमुकअमुक ठिकाणी आमच्या पाल्यासाठी आम्ही दान करून दाता बनून नकळत बिंबवलेल्या गुरुशिष्याच्या पवित्र नात्याला असे हे मिजासखोरी गालबोट चिरडून टाकून अशा वेळी या बदलत चाललेल्या या शिक्षण संस्थेला एकच प्रश्न विचारावासा वाटतो...
जुन्याचे आधुनिकीकरण करण्यामध्ये निष्पाप गुरुशिष्याला का भरडले जातेय ?
का असे का ?
पूर्वीही बिकट परिस्थिती मधून जाऊन कित्तेक आदर्श गुरुशिष्य आजही आपल्याला पहावयास मिळतात मग आजचे चित्र असे का ?
फ़क़्त शिक्षक दिन म्हणून सप्टेंबर गाजावाजा करत साजरा करण्यापेक्ष्या एका आदर्श शिक्षकाने एक आदर्श विद्यार्थी तरी आपल्या हाथून घडवावा असा पण करावा हीच खरी आजच्या काळाची गरज आहे.


वर दिलेले भाषण पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेलया बटणावर क्लिक करा.