शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

लाल बहादूर शास्त्री - 3

भारत देशाला  जय जवान जय किसान हा मंत्र देणार्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म२ आक्टोबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला.त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.

महात्मा गांधी यांचा जन्म शास्त्री जीचा चा जन्म एकाच तारखेला येतोत्यांचे विचारहि एकच होते.महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा  त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, ‘ भारतातील जनता दालीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा. महाराजांच्या श्रीमंतीची घानाघात  करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली  जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. ते देश प्रेमाने प्रेरित झाले. त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले.


वरील भाषण पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.