शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय पोषण आहार 4- वार्षिक उपयोगासाठी


नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी गेल्या वर्षी तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत ! 

यावर्षी हे नवीन एक्सेल सॉफ्टवेअर आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. गेल्या वर्षीच्या सॉफ्टवेअर पेक्षा हे वापरण्यास अधिक सुलभ, सुटसुटीत बनविले आहे. 

सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये-
1) पूर्णपणे युनिकोड मध्ये बनविले आहे, त्यामुळे कोणत्याही मोबाईल वरून किंवा कॉम्पुटरवर वापरता येईल.
2) फक्त रोजची उपस्थिती व वापरलेले कडधान्य नोंदवावे लागते. 
3) मासिक उपयोगिता, मासिक ऑनलाईन रिपोर्ट, वार्षिक उपयोगिता हे सर्व रिपोर्ट आपोआप तयार होतात.
4) सर्व मालाची साठा नोंदवही आपोआप तयार होते.
5) सर्व रिपोर्ट, साठा नोंदवही, तसेच प्रत्येक महिन्याची नोंदवही या सर्वांची A4 साईज पानावर प्रिंट काढता येते.

नवीन काय आहे?
1) गेल्या वर्षीच्या शीट मध्ये असणारे बॅकग्राउंड कलर काढले आहेत, त्यामुळे प्रिंट चांगली येते.
2)गेल्या वर्षीच्या सॉफ्टवेअरमध्ये 44 शीट होत्या, आता फक्त 17 शीट आहेत.
3) आवश्यक सूचना त्याच पानावर दिल्याने वापर करताना अडचण येत नाही.


( Last Update 8 April 2018)


पासवर्ड- mdm
इयत्ता 1 ली ते 5 वी साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून डाऊनलोड करा.


इयत्ता 6 वी ते 8 वी साठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून डाऊनलोड करा.

वर दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड  झालेली फाईल ओपन होत नसेल खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन झिप फाईल डाऊनलोड करून घ्या व नंतर अनझिप करुन वापरा.