शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

लाल बहादूर शास्त्री - 4

ज्ञान सम्पाद्नाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज  झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवरलोकसेवक समाज संस्था काढली त्या द्वारे शास्त्रीजींनी  अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. १९२७ साली ललितादेवी यांचेशी त्यांचा विवाह त्यांचा संसार त्यांनी उत्तम रितीने केला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीनचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिकठीकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे दुसर्या देशापासून काय घेण्या सारखे हे  त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूजिंचा अंत झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले.
शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले.
त्याने सारे जग स्तिमित झाले आहे.भारताची मान जगात उंचावली. जय जवान जय किसान या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.

असे म्हणावेसे वाटते   ” या देशाच्या पोरुषाचा , तुज शोभतो लाल खरोखर , तुझ्या आगळ्या व्यक्तित्वाने , आम्हा दिधले नव संजीवन .


वरील भाषण पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.