१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले
साम्राज्य उभारले आणि
दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण
भरडत राहिलो. पण
भारतातील थोर
देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे,
सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला
देश १५
ऑगस्ट १९४७
रोजी स्वतंत्र झाला.
१४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं.
नेहरू हर्षाने म्हणाले,
''मध्यरात्री बारा वाजता सारे
जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन
स्वातंत्र्य संपादन केले.....!
स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता
तुमच्यातील एक'
अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली.
भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक'
ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला
आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू
झाले
वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.