शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भाषण 2 - शिक्षक दिन... भारतातला आणि जगभरातला !

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
आज सप्टेंबर... शिक्षक दिन... शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते... त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती.... शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...
जगभरातील शिक्षक दिन...
चीनमध्ये १९३१ मध्ये नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक दिनाची सुरूवात करण्यात आली. चीनी सरकारकडून मात्र १९३२ मध्ये या दिवसाला स्वीकृती मिळाली.
त्यानंतर १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस, २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला... पण त्यानंतर पुन्हा १९५१मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.


वर दिलेले भाषण पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेलया बटणावर क्लिक करा.