शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

कविता 2 - शिक्षक

शाळांना जर का शिक्षक
लाभला नसता

तर आयुष्याच्या गणिताचा
भूगोल झाला असता                 ॥ १ ॥

फळयावर जर खडूचा
हात फिरला नसता

तर....अ ब क ड ,बाराखडीचा
अर्थ कळला नसता.                   ॥ २ ॥

डोळे भरून येतात जेव्हा
हातात पगार येतो.

गुरूजी तुम्हीच आकार दिला,
जेव्हा मातीचा मी गोळा होतो.     ॥ ३ ॥

पायथागोरस, आर्किमिडिज,
 न्यूटनअजूनही तोंडपाठ
आहेत गुरूजी.

तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या
 रेणुसूत्रात मला तुम्हीच
दिसता गुरूजी.                          ॥ ४  ॥

तुमच्या हातून खाल्लेला मार
आजपर्यंत विसरलो नाही मी.

घोड़ी करुन उभे करायचात
तुम्ही आता तीच पद्धत
व्यायामाला वापरतो मी.             ॥ ५ ॥

शाळा चुकवायचो कित्तेकदा
उनाडक्या करतांना.

पण भीती वाटायची तुमची
गृहपाठ तपासतांना.                    ॥ ६ ॥

आज मात्र तुम्ही सोशल साईटवर
चेष्टेचा विषय झालात

मास्तर कोमात;  गुरूजी जोमात.
मास्तर पळाला;  यात्रेला गेला      ॥ ७ ॥

असल्या कमेंट्स
जेव्हा लोक करतात.
काळीज फाटतंय हो गुरूजी
आमचे आदर्श रोज मरतात .         ॥ ८ ॥

तुमची प्रतिमा मात्र माझ्या
हृदयातआदरणीयच राहील.

मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो.
ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील. ॥ ९ ॥

वर दिलेली कविता पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेलया बटणावर क्लिक करा.