भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rearly in history, when we step out from old to the new…. India discovers herself again. - Pandit Nehru. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं.
भारत जगतील सर्वात मोठे
लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते.
भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच
धार्मिक विविधतेमुळे भारत
जेव्हा स्वतंत्र झाला
तेव्हा अनेकांनी भारत
हा देश
एकसंध राहणार नाही
असे भाकित वर्तवले होते.
परंतू विविधतेत एकता
हेच भारताचे वैशिष्ठय ठरले
आणि आज
६८ वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे
गेले नाहीत. (अपवाद काही
धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान,
विज्ञान, शेती,
शिक्षण असा
विविध क्षेत्रात प्रगती केली.
आज भारताकडे स्वत:
चा आण्विक साठा
आहे. भारत
महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत
असल्याचं म्हटलं जातयं.
या दिवशी ड्राय डे
असुनही पर्यटन स्थळी मदयपींना आवर
घालण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ
करावी लागते. खरच
स्वातंत्र्याची किंमत कधी
कळणार आपल्याला. कदाचित आपण
आणखी ९
वर्षांनी आपण
स्वातंत्र्यपुर्तीची ७५
री धुमाधडाक्यात साजरी करु
पण तेव्हा चित्र खरेच
पालटले असेल
अशी आशा
व्यक्त करु
या.
वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.