शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

स्वांत्र्यदिना दिवशी घ्यायची शपथ



“ You be the change you wish to see in the world”
Mahatma Gandhi

जगात समाजाकडून अपेक्षा ठेवताना, आपण स्वतः त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय सहभाग देतो ? हे महत्वाचे आहे.

शपथ
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त मी भारत मातेला स्मरुण शपथ घेतो / घेते की, जगात हवा असणारा बदल मी प्रथम स्वतःमध्ये, स्वतःच्या घरामध्ये करेन. घर स्वच्छ ठेवेन, परिसर स्वच्छ ठेवेन, शाळा स्वच्छ ठेवेन, माझ्या घरात शौचालय बांधण्यासाठी मी आग्रह धरेन योगदान देईन. माझ्या गल्लीत, माझ्या गावात मी पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त करेनच. गावत अंधःश्रद्धा निर्मुलन करेन. शौचालय असेल तर स्वच्छता असेल आणि स्वच्छता असेल तरच आरोग्य असेल, हा विचार घरोघरी नेईन. अरोग्यादायी गावसंपन्न गाव हाच नारा देऊ. शौचालय ही गरज नाही तर सर्वांचा अधिकार आहे.

आरोग्यदायी होतील महाराष्ट्रातील नरनारी |
जर शौचालय असेल प्रत्येक दारी

 
 वरील शपथ पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410a1VSUEJYdmVRTFk