शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

प्रजासत्ताक दिन भाषण क्र.5

खाली दिलेले भाषण जर आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायचे असेल तर DOWNLOAD या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/uc?export=download&id=1NEc_XApHDAFHqHGlnIYRYzuOKIgily81



आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि मला हे सांगायला खूप वाईट वाटते कि, हजारो भारतीय नागरिक अजूनही भारताच्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरक ओळखत नाहीत. आपल्याला या स्वातंत्र्याची, मूलभूत हक्कांची किंमत राहिली नाही का? हजारो स्वातंत्र्यसेनानी या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले, त्यांनी आपल्या कुटुंबाचे, जीवाचे बलिदान दिले, जेणेकरून भारताची पुढची पिढी स्वतंत्र देशात जन्म घेईल. हाच तो त्यांचा स्वप्नातला भारत का, आणि हेच त्यांच्या स्वप्नातले भारतीय नागरिक का?
जे लोक फरक ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी क्रूर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तरीही, आम्ही ब्रिटिश कॉमनवेल्थचे भाग होतो. आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान (राज्यघटना) नव्हते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी महान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने एक प्रचंड आव्हान उचलले. दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण जगामध्ये हे प्रदीर्घ संविधान आहे.
संविधानाने आपल्याला शिक्षण, भाषण, गोपनीयता आदी जीवनावश्यक मूलभूत अधिकार दिले. भाषणाच्या अधिकाराशिवाय मी आज येथे भाषण देऊ शकलो नसतो. आपण संवैधानिक अधिकारांसाठी लढतो, तक्रार करतो, पण आपल्या संवैधानिक कर्तव्यासाठी कोणीही लढा देताना दिसत नाही. जे अज्ञानी आहेत, मी त्यांना असे सांगू इच्छितो की आपल्याला नागरिक म्हणून संविधानात जे हक्क दिले जातात तसेच आपली कर्तव्ये देखील संविधान निर्दिष्ट करते. आपण इतके अज्ञानी आहोत की आपल्याला हे माहित ही नाही की आपली काही घटनात्मक कर्तव्ये सुद्धा आहेत.
आज,  प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्ण समयी संकल्प करूयात की आपण आपल्या संविधानाचा अभ्यास करू, त्याचा आदर करू. हजारो स्वतंत्र सेनानी आणि डॉ.आंबेडकरांच्या बलिदाचे, मेहनतीचे चीझ करूयात. आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढा देताच राहायचे आहे पण सोबत आपली राष्ट्रीय कर्त्यवे सुद्धा निभावली पाहिजेत.
पुन्हा एकदा मी आपल्या प्रमुख महोदयाचं आभार व्यक्त करू इच्छितो.
माझ्याबरोबर म्हणा .. भारत माता की जय ( वेळा) .. वंदे मातरम् ( वेळा)
धन्यवाद