शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जिओ फोन - महत्वपूर्ण गोष्टी

रिलायन्स जिओने आपला स्मार्ट 4G फीचर फोन लाँच केला. मात्र अजूनही या फोनच्या फीचरबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी आज जाणून घेऊयात...      

1) जिओफोनमध्ये सिंगल सिमची सुविधा असणार आहे. येत्या काळात जिओ ड्युअल सिम सपोर्ट करणारा फोन लाँन्च करणार की नाही यासंदर्भात अद्याप काहीही सांगू शकत नाही.

2) देशात जिओ 4G VoLTE नेटवर्क ऑफर करतं आणि याचा अर्थ असा होतो की ग्राहक केवळ जिओचचं सिमकार्ड या फोनमध्ये वापरू शकतील. या फोनमध्ये एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल सारखे सिमकार्ड्स चालणार नाहीत.

3) जिओच्या 4G VoLTE फीचर फोनमध्ये जिओ अॅप्सचा सपोर्ट असणार आहे. तसेच, या फोनमध्ये फेसबूक, युट्यूबही सपोर्ट करणार आहे. मात्र, व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.

4) फोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम नाही. म्हणजेच गुगलच्या अनेक सर्व्हिसेस यात नसतील. यात रिलायन्सची OS असेल.

5) रिलायन्स जिओच्या या स्मार्ट फिचर फोनमध्ये प्ले स्टोअरही नसेल. म्हणजेच प्ले स्टोअरवर असलेले अॅप इन्स्टॉल करता येणार नाही.

6) या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा नाही. यामुळे व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही. पण व्हॉईस कॉलिंग लाईफटाईम फ्री राहिल.

7) या फोनमध्ये जिओ चॅटचा ऑप्शन ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. जिओ चॅटच्या माध्यमातून ग्राहक चॅटींग करु शकतील.

8) या फोनमध्ये हॉटस्पॉटची सुविधा नाही. मात्र वायफाय तर तुम्ही नक्कीच वापरु शकता.

9) जिओ फोनची स्क्रिन छोटी आणि रिझॉल्यूशनही कमी असल्याने कमी डेटावरच संपूर्ण काम चालणार आहे. यासाठी 500 एमबी प्रतिदिन FUP लिमिट असणार आहे.

10) जिओ फोनवर टीव्ही पाहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिओ फोन टीव्ही केबल फिचर संदर्भाच कंपनीने काही स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे फ्रि असेल की यासाठी चार्ज लागेल हे अजून कळणे बाकी आहे.