शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जिओ फोनसाठी नोंदणी सुरु

रिलायन्स जिओच्या मोफत 4G फीचर फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे. या फोनची बीटा टेस्टिंग 15 ऑगस्टपासून सुरु होईल, तर प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून करता येईल आणि डिलिव्हरी सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. जिओ फोनची नोंदणी कशी करायची व या फोनची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर एक नजर टाकू...

🎯 _कशी करायची जिओ फोनसाठी नोंदणी?_

👉 Jio.com या वेबसाईटवर लॉग ऑन केल्यानंतर keep me posted हा पर्याय येईल तिथे क्लीक करा.

👉 keep me posted यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, इमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय दिला जाईल तिथे माहिती भरा.

👉 नोंदणी करताच तुमच्या मोबाईल नंबरवर Thank You असा मेसेज येईल.

🎯 _जिओ फोनची वैशिष्ट्ये काय आहेत?_

👉 जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आहे. विशेष म्हणजे तो रिलायन्सकडून मोफत दिला जाईल.

👉 या फोनसाठी अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. मात्र हे 1500 रुपये तुम्हाला तीन वर्षांनी परत मिळतील.

👉 हा फोन खरेदी केल्यानंतर महिन्याला 153 रुपयांमध्ये अनलिमिटेड 4G डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळेल.

👉 या फोनमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

👉 व्हॉईस कमांडिंगद्वारे तुम्ही कॉलिंग, मेसेज, गुगल सर्च करु शकता.

👉 या फोनमध्ये NFC कनेक्टीव्हीटी दिली जाईल, ज्यामुळे तुम्ही तुमचं अकाऊंटही फोनशी लिंक करु शकता.