शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

माहात्मा गांधी -2



भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशायांना वीरोध केला.पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म ऑक्टोबर१८६९ मध्ये पोरबंदर येथे झाला त्यांनी ब्यरिष्टर पदवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यातच त्यांनी ऑफ्रिकेत वर्णभेदाचा अनुभव घेतला.गोऱ्या इंग्रजांनी कृष्णवर्णीयांना एवढ्या वाईट रीतीने वागवायचे कि जणू ते कोणी गुलामच होते. तेच त्यांनी ऑफ्रिकेत अनुभवले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्यांनी बसायचे हे गोऱ्यांनी ठरवायचे! गांधींनी याविरुद्ध अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग स्वीकारून विरोध व्यक्त केला. ऑफ्रीकेतून परततांना त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला होता.

गांधीजी भारतात आल्या नंतर त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संपर्क साधून भारतातील परिस्थिती समजावून घेतली. सर्वत्र प्रवास करून प्रत्यक्षात त्या परिस्थितीचा अनुभव घेतला.माणसाने माणसांना मानुसकिनेच वागवावे हेच सूत्र सर्वांना समजावणे आवश्यक असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. समाजातल्या उच्च-निच्च, धनवान- द्लीद्री, सुशिक्षित असुशिक्षित, मालक- मजूर, स्त्री- पुरुष  अश्या भेदा मधली दुरी कमी करने हेच प्राथमिक काम प्रथम करण्याचे ठरविले. त्याच बरोबर इंग्रजांच्या देशविघातक जुलमी धोरनांना विरोध करतांना अहिंसा,सत्याग्रह या साधनांचा वापर करण्याचा निश्चय केला.

आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजणार्या गांधीजींचा मृत्यू ३० जानेवारी १९४८ रोजी झाला.



वरील भाषण पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.