शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 साठीच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची सूचना


सूचना क्रमांक: १०६४
दिनांक : १५/०७/२०१७
प्रदीप भोसले,हवेली,पुणे
_________________________________________
➡ जिल्हाअंतर्गत बदली साठीच्या वेळापत्रकाबाबत व संवर्ग २ फॉर्म भरण्याविषयीच्या महत्वाची सूचना

सर्वांना सूचित करण्यात येते की,जिल्हांतर्गत बदली अंतर्गत संवर्ग २ साठी जालना, सोलापूर, बीड, परभणी,लातूर या जिल्ह्यांना फॉर्म भरण्यासाठी लॉगीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर सुविधा या जिल्ह्यांना दिनांक १५/०७/२०१७ ते दिनांक १८/०७/२०१७ या मुदतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.तसेच जिल्हांतर्गत बदली अंतर्गत संवर्ग १ च्या कर्मचाऱ्याना फॉर्म भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांना दिनांक १८/०७/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.जिल्हांतर्गत बदली फॉर्म भरताना खालील सुचना लक्षात घ्याव्यात.

१) कर्मचाऱ्यांने भरलेला फॉर्म verify केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येत नाही.त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्यावी.

२) संवर्ग १ मध्ये फॉर्म भरून verify केलेला असेल तर अशा कर्मचाऱ्यांस पुन्हा कोणत्याही संवर्गामधून बदलीसाठी फॉर्म भरता येणार नाही.परंतु संवर्ग १ मध्ये फॉर्म भरून फक्त save केलेला असेल म्हणजेच सदर फॉर्म हा Draft Mode मध्ये असेल तर तो फॉर्म Delete केल्यानंतरच संवर्ग २ चा फॉर्म भरता येईल हे लक्षात घ्यावे.