शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय पोषण आहार 1 - केंद्र एकवट

नमस्कार शिक्षक मित्रांनो !

आपल्यापैकी बरेच शिक्षक तसेच केंद्रप्रमुख केंद्रस्तरावरील कामे करतात. दर महिन्याला शालेय पोषण आहार योजनेची केंद्राची एकवट करताना आपली अगदी दमछाक होत असेल. पण आता काळजी करू नका. आपल्यासाठी एक सोपी एक्सेल फाईल तयार केली आहे. खालील सूचना वाचा आणि अगदी कमी वेळात अचूकपणे केंद्र एकवट करा.

एक्सेल फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
पासवर्ड - pds
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410QjJRZDJKNHhnZXM

1. सदर फाईलचा वापर करून २० किंवा त्यापेक्षा कमी शाळांची एकवट करता येते.

2. या फाईल मध्ये Kokila हा फॉन्ट वापरलेला आहे, त्यामुळे आपल्या PC किंवा लॅपटॉप वर हा फॉन्ट अगोदर डाउनलोड करून इन्स्टॉल करावा लागेल. हा फॉन्ट इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
                                                                                   
                       Click Here      
      
3. INPUT या पानावर शाळांची नावे, केंद्राचे नाव टाकावे 

4. सर्व शीट एकमेकाशी लिंक केलेल्या आहेत, त्यामुळे कोणतीही शीट Delet करू नये. 

5. 1 ते 5 शाळा आणि 6 ते 8 शाळा या शीटवर आपल्याला शाळांची माहिती भरायची आहे, पण फक्त आकाशी रंगातील सेल मध्येच माहिती भरता येईल. इतर आकडेमोड व सेलमधील माहिती आपोआप भरली जाईल.

6. आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्याच शाळांच्या Row शिल्लक ठेऊन बाकीच्या Row hide कराव्यात. 

7. शीटला सूत्रे व लिंक दिलेल्या आहेत त्यामुळे काम करत असताना चुकून सूत्रे डिलीट होऊ नयेत म्हणून शीट पासवर्ड प्रोटेक्टड केलेली आहे. आपल्याला अनप्रोटेक्ट करायची असेल तर त्यासाठी pds हा पासवर्ड वापरावा.