शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भाषिक उपक्रम - ऐका व सांगा.उद्देश :-- तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा
               सांगता येणे.
सूचना :- सांगितलेली माहिती काळजीपूर्वक
               ऐका परत सांगा.

 संच -
   गाय पाळीव प्राणी आहे.
  वाघ जंगली प्राणी आहे.

 संच -
  सिंह जंगली प्राणी आहे.
  घोडा पाळीव प्राणी आहे.

 संच - .
  मोर राष्ट्रीय पक्षी आहे.
  कोंबडा पाळीव पक्षी आहे.

 संच - .
  बदक पाण्यात पाहते.
  घार आकाशात उंच उडते.

संच - .
   ऊस गोड असतो.
   मिरची तिखट असते.

 संच - .
   चिंचेचे पान छोटे असते.
   वडाचे पान मोठे असते.

 संच - .
   सूर्य सकाळी उगवतो.
   सूर्य संध्याकाळी मावळतो.

 संच -
   उन्हाळ्यात कडक ऊन असते.
   हिवाळ्यात थंडी असते.

संच -.
   कापसापासून कापड बनते.
   ऊसापासून साखर बनते.

 संच - १०.
   बगळ्याचा रंग पांढरा असतो.
   कावळ्याचा रंग काळा असतो.

 संच - ११.
   मीठ खारट असते.
   लिंबू आंबट असते.

 संच - १२.
   गुलाबाच्या झाडाला काटे असतात.
   गुलाबाचे फूल अत्यंत सुंदर असते.

 संच - १३.
   आरसा काचेपासून तयार करतात.
   आरशात आपला चेहरा पाहता येतो.

 संच - १४.
   ज्वारीची भाकर करतात.
   गव्हाची चपाती करतात.
   तांदळाचा भात करतात.
   डाळीची आमटी करतात.

 संच - १५.
   ससा गवत खातो.
   ससा भित्रा असतो.
   पण तो चपळ असतो.

 संच -१६.
   आम्ही सकाळी लवकर उठतो.
   दात स्वच्छ घासून तोंड धुतो.

 संच - १७.
   रात्र संपते, सकाळ होते.
   पाखरांची किलबिल सुरू होते.

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि. प्रा.शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि. धुळे
                 📞 ९४२२७३६७७५