शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

इमेजमधून टेक्स्ट कॅापी करणेशैल्या जाम अस्वस्थ होता. प्रोजेक्टचं सबमिशन दोन दिवसांवर येऊन पोचलं होतं. थर्मोडायनामिक-आधारित प्रोजेक्ट असल्यानं एक विशिष्ट पुस्तक त्याला प्रोजेक्ट लिहिण्यासाठी आवश्यक होतं. दोन ब्रिटिश ऑथर्सची पुस्तक होती त्याच्याकडे; पण त्यातली भाषा डोक्यात शिरत नव्हती. आणि डोक्यात शिरलेलं कागदावर उतरवलं तरओरलमधे भलतीच वाट लागली असती. याच प्रोजेक्टसाठी महत्प्रयासानं मिळवलेलं एका आपल्याकडच्या लेखकाचं पुस्तक त्यानं सहज बघण्यासाठी म्हणून पुढच्या वर्गात असलेल्या राहुलला दिलं आणि त्याला अचानक गावी जावं लागलं. त्याची आई आजारी असल्यामुळं तीन-चार दिवस तरी तो येऊ शकणार नव्हता. पुस्तक कुरिअरने पाठवावं म्हटलं तरी हातात फार वेळ नव्हता. त्यामुळे त्यानं राहुलला विनंती केली की, बाबा काहीही कर, पण त्यातली मला आवश्यक असलेली 1क्-12  पानं व्हॉट्स अॅपवर पाठव. राहुलने फोटो काढून ती पाठवली. पानं तर आली पण त्यातला टेक्स्ट त्याला कॉपी करणं शक्य नव्हतं. कारण व्हॉट्स अॅपवर पानांच्या इमेजेस आल्या होत्या. पुस्तक समोर असतं तर स्कॅन करून पीडीएफमधून थेट टेक्स्ट कॉपी करता आलं असतं. पण इमेजेसमधून टेक्स्ट कसं कॉपी करणार?
- खरं तर या अवघड वाटणा:या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. 

ओसीआर अर्थात ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकिग्नेशन या पद्धतीने पीडीएफमधून आपल्याला टेक्स्ट सहज कॉपी करता येतं. पण इमेजेसच्या बाबतीत ते इतकं सहजरीत्या होत नाही. पण आता त्यासाठीही एक जादुई अॅप्लिकेशन उपलब्ध झालं आहे. जीटी टेक्स्ट हे त्या सॉफ्टवेअरचं नाव. 
हे सॉफ्टवेअर वापरायचं कसं हे कळलं ना, तर तुमच्या अनेक अडचणी एकदम सहज सुटतील!

जीटी-टेक्स्ट काम कसं करतं ?
1) सगळ्यात आधी https//code.google.com/p/gettext/downloads/lis
या लिंकवर जा. आणि जीटी-टेक्स्ट हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.
2) या अॅप्लिकेशनची विविध व्हर्जन्स या लिंकवर उपलब्ध आहेत. त्यातील साधारण 13 एमबी आकाराचे अॅप्लिकेशन (डॉट ईएक्सई फाईल) डाऊनलोड करून घ्या. हे या अॅप्लिकेशनचे ऑफलाइन व्हर्जन आहे.
3) डाऊनलोड झाल्यानंतर हे अॅप्लिकेशन तुमच्या विंडोज मशीनवर किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल करा. छापील टाईप्ड टेक्स्ट असलेली एखादी इमेज कॉम्युटरवर सेव्ह करून ठेवा. यातील टेक्स्ट आपण आता या अॅप्लिकेशनच्या आधारे कॉपी करण्याचा प्रयोग करू. 
4) अॅप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर जीटी-टेक्स्ट असा आयकॉन तुमच्या कॉम्प्युटरवर दिसायला लागेल. 
5) त्यावर डबल-क्लिक केल्यानंतर इमेज सिलेक्ट करण्यासाठीची विंडो सर्वात आधी ओपन होईल. त्याद्वारे छापील टेक्स्ट असलेली इमेज सिलेक्ट करा. 
6) सिलेक्ट केलेली इमेज जीटी-टेक्स्ट अॅप्लिकेशनच्या विंडोमध्ये ओपन झालेली तुम्हाला दिसेल. दिलेल्या टूलबारवरील दुस:या क्रमांकाच्या टूलच्या आधारे इमेजमधील टेक्स्ट असलेला भाग सिलेक्ट करा.
7) टेक्स्ट असलेला भाग सिलेक्ट केल्यानंतर लगेचच एक पॉप-अप विंडो ओपन होईल. त्यात तुम्ही सिलेक्ट केलेलं टेक्स्ट एडिटेबल स्वरूपात तुम्हाला दिसेल. 
8)  कॉपी झालेल्या टेक्स्टमध्ये काही त्रुटी असतील तरट्राय अगेनयावर क्लिक करा. करेक्टेड टेक्स्ट दिसायला लागेल. 
9) आता हे टेक्स्ट तुम्ही कॉपी करून थेट नोटपॅड किंवा इतर कोणत्याही अॅप्लिकेशनमध्ये थेट पेस्ट करू शकता. 
10) रोमन लिपीतील कोणतेही टेक्स्ट याद्वारे कॉपी करणो शक्य आहे. 
मात्र इतर भारतीय लिपींतील टेक्स्ट तुम्हाला या पद्धतीनं कॉपी करता येणार नाही.