शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आईची किमयाएका शाळकरी मुलाला शाळेतील
बाईनी एक चिट्ठी दिली आणि
सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे.
मुलगा धावत धावत घरी आला आणि
ती चिट्ठी आई जवळ दिली.
आई ने ती चिट्ठी पहिली मात्र आणि
त्या मुलासमोर ती वाचून दाखवली.
त्यातील मजकूर असा होता...
"प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. "
कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत.
एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली .
तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती.
ती पाहताच तो ढसा ढसा रडायला लागला.
त्यातील मजकूर असा होता " प्रिय पालक आपला मुलगा मतीमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अश्या मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठू नये. त्याचा आभ्यास तुम्ही घरीच घ्याव
त्याला कळून चुकल त्याच्या आई ने ते पत्र खोट वाचून दाखवील होत.
हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्ख जग प्रकाशमय करून टाकल.
काय म्हणाव अश्या मातेला जीने एका मतीमंद मुलातून एक शास्त्रज्ञ घडविला.
ही किमया फक्त आईच करू शकते.