शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आधार कार्ड वरील चुकिचे नाव, पत्ता घरच्या घरी दुरुस्त करू या.
गॅस सबसिडी इतर कामांसाठी आपण आधार कार्डचा नियमित वापर करतो, पण जर त्यावर आपले नावच चुकीचे असेल तर ????
तर घाबरू नका. सदर चुका आपण घरबसल्या दुरुस्त करू शकतो..

1) प्रथम http://uidai.gov.in ह्या साईट वर जाऊ. त्यानंतर जे पण समोर येईल त्या पानावर खाली डाव्या बाजुला 'update your your aadhar data' लिंक दिसेल त्यावर क्लिक करा, इथे आपल्याला काय काय update करू शकतो ते दिसेल, तिथेच ' Update data online' वर क्लिक करून 'To submit your update/ correction request online'  वर क्लिक करा.

2) इथे आपल्याला आधार नंबर टाकावा लागेल. text verification मध्ये दिलेली character टाका OTP वर क्लिक करा. त्यामुळे तुमच्या रजिस्टर मोबाइलला OTP मेसेज येईल. तो सांगितलेल्या चौकटीत टाकायचा आहे. त्यानंतर आपण वेबसाइटवर login होऊ.

3) आता Data update request वर क्लिक केल्यानन्तर जे बदल आपल्याला करायचे आहेत ते करू शकतो. त्यानंतर जरुरी कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागतील.  confirm वर क्लिक करा. नंतर BPO service provider वर क्लिक करून submit करा.

4) या नंतर Update status वर जा, आधार नंबर urn टाका. एक मेसेज येईल Your request completed successfully नंतर sign out व्हा.

5) जेथे date update status आहे , तिथे आधार नंबर urn टाकून चेक करा आपल्याला समजेल कि आपले update झालंय कि नाही..
संकलक, विवेक पोटे