शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

संगणकासाठी मोफत ११ उपयुक्त संगणक प्रणालींची यादी
खाली ११ मोफत अशा ११ उपयुक्त संगणक प्रणालींची यादी दिली आहे ज्यांचा वापर केल्याने तुमच्या संगणकाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. प्रत्येक संगणक प्रणाली पुढे त्याचा वापर आणी त्याबद्दल माहिती तसेच डाउनलोड करण्यासाठीचा दुवा दिला आहे. तुम्हाला जर संगणकात काही समस्या भेडसावत असतील तर कदाचीत खालील पैकी काही संगणक प्रणाली तुम्हाला समस्यांचे निवारणबी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

(विशेष टीप- कोणतीही संगणक प्रणाली संगणकावर प्रस्थापित करण्याआधी 'सिस्टम रिस्टोर पोईंट' जरूर तयार करा)

(START - ALL PROGRAMS - ACCESSORIES - SYSTEM TOOLS - CREATE SYSTEM RESTORE POINT )

) सी क्लीनर -
           आपण जसे संगणकावर धुळ साठली की संगणक वरून नियमितपणे स्वच्छ करतो तसेच संगणक वापरताना त्यात बर्याच तात्पुरत्या फाईल्स तयार होत असतात ज्यामुळे आपल्या संगणकाचा वेग कमी कमी होत जातो ज्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवरही होत असतो. काही जण इतर प्रोग्राम वापरून ती स्वच्छ करतातही पण सी क्लीनर, आपला संगणक आतुन पुर्ण स्वच्छ करण्यास उपयुक आहे. सी.सी क्लीनरच्या मोफत आवृत्ती मध्ये देखील ५० पेक्षा जास्त वेग-वेगळ्या प्रकारच्या तात्पुरत्या फाइल्सची स्वच्छता करण्याची क्षमता आहे. आणी इतकेच नाही तर आपल्याला त्यात बर्याच प्रकारच्या सुविधा मिळतात.

) टेरा कॉपी -
           आपण जेंव्हा एखादी संगणकीय फाईल एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी कॉपी किंवा मुव्ह करतो तेंव्हा आपल्या संगणकातील आधीपासुनच प्रस्थापित असलेल्या कॉपी मध्यस्थाचा वेग हा त्या त्या संगणकावर अवलंबुन असतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात फाईल्सचे स्थलांतर करायचे असते तेंव्हा बर्याच संगणकात वेगाची समस्या भेडसावत असते परंतु टेरा कॉपी मात्र तुमच्या संगणकावर फाईल्सचे स्थलांतर पटकन करते. स्थलांतर सुरु असताना तुम्ही स्थलांतराचा सध्याचा वेग, किती स्थलांतर झाले आहे, किती बाकी आहे याची पुर्ण माहिती देते

) इंटरनेट रिपेअर -
           आपण जेव्हा संगणकावर इंटरनेटचा वापर करतो तेव्हा काही वेळेला आपल्याला इंटरनेट सुरु करताना अडचणी येत असतात, कस्टमर केयरशी संपर्क साधला असता काही वेळेला आपल्याच संगणकात बिघाड असल्याचे सांगण्यात येते. अशा वेळी काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो. संगणक एखाद्या तज्ञाला दाखवण्यावाचुन पर्याय नसतो पण अशा वेळी इंटरनेट रिपेअर टुल आपल्या उपयोगी पडते फक्त एका-दुसऱ्या टिचकीसरशी आपले इंटरनेट पुन्हा सुरु होते.
    
) इंटरनेट डाउनलोड मॅनेजर -
           आपण जेंव्हा इंटरनेट वरून फाईल्स डाउनलोड करतो तेव्हा बर्याच वेळी आपल्या ब्राऊझर मधुन त्या डाउनलोड होत असतात (उदा- गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स इत्यादी) यावेळी आपल्याला धड संगणक बंदही करता येत नाही कारण संगणक बंद केला आणी पुढच्या वेळी सुरु केला तर डाउनलोड पुन्हा सुरु करावे लागते आणी आधीच्या वेळी केलेली सर्व मेहनत, बँडविथ आणी वेळ वाया जातो. पण आपण जर तीच फाईल इंटरनेट डाउनलोड मॅनेजर मधुन डाऊनलोड केली तर मात्र आपल्याला चिंता करण्याची गरज उरत नाही कारण इंटरनेट डाउनलोड मॅनेजर फाईल डाऊनलोड करताना खंडीत डाउनलोड पुन्हा तिथपासुनच सुरु करतो. आणी अजुन एक महत्वाची सुविधा म्हणजे कोणतीही फाईल डाउनलोड करताना त्या फाईलचे ८ ते १६ समान भागात विभाजन करून डाउनलोड करतो आणी पुर्ण झाल्यावर ते पुन्हा जोडतो. याने डाउनलोडचा वेगही वाढतो

)  एफ.बी बॅकअप -
           कल्पना करा आपण आपले संगणकावरील महत्वाचे काम २-३ तास करता आहात आणी शेवटच्या क्षणी तुम्ही सेव्ह या बटणावर क्लिक करण्या ऐवजी डिलीट या बटणावर क्लिक करता. (बर्याच वेळेला आपली रिसायकल बिन सुरु असतेच असे नाही) अशा वेळी पश्चात्ताप करण्यावाचुन आपल्याकडे गत्यंतर राहत नाही. यापेक्षा जर  आपण जर त्या फाईल तयार केल्या केल्या जर बॅकअप घेतला तर आपले नुकसान होत नाही. एफ.बी बॅकअप तुम्हाला यासाठी मदत करेल.

) नेटवर्क्स -
           आपण बर्याच वेळेला संगणकावर इंटरनेटचा वापर करतो. बर्याच इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या आपल्याला महिन्याला ठराविक डाटा पुरवतात (आपण सुचवु त्याप्रमाणे) एक जीबी, दोन जीबी इत्यादी आपण कधी आपण संगणकावर वापरत असलेल्या इंटरनेटची मोजदाद तुम्ही कधी केली आहे का ?? नसेल तर नेटवर्क्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या इंटरनेट वापराबद्दल सखोल माहिती पाहु शकता. यात तुम्ही दिवसाला किती इंटरनेट वापरावे यासाठी गजर देखील लावु शकता. महिन्याचा वापर,वेळ, स्पीड या सर्वांची सखोल माहिती तुम्हाला उपलब्ध होते. इंटरनेटच्या काटकसरीसाठी देखील नेटवर्क्स उत्तम पर्याय आहे

) फॅमेली ट्री बिल्डर -
            आपली भारतीय कुटंब व्यवस्था ही मुळातच एकत्र कुटुंब पद्धतीची आहे. काळाच्या ओघात अनेक गोष्टी मागे पडत गेल्या एकत्र कुटुंब पद्धती पण यातीलच एक गोष्ट. आज आपल्याला आपल्या नातेवाईकांपैकी बरीचशी नाव ठाऊक आहेत अशी केसच निराळी. फॅमेली ट्री बिल्डर मध्ये 
आपण आपल्या कुटुंबाचे झाड बनवु शकतो (अर्थात झाडाप्रमाणे यादी) म्हणजे कुटुंबाची संपुर्ण माहिती त्यात प्रविष्ट करून जतन करू शकतो. यात १०० पेक्षा जास्त सुविधा आहेत. प्रत्येकाचे फोटो, वाढदिवस, वैयक्तिक माहिती इत्यादी सर्व पाहू शकतो. इतकेच नव्हे तर ह्या संपुर्ण झाडाचे एका टिचकीसरशी संकेतस्थळ देखील बनवु शकतो. (आपली माहिती गुप्त ठेऊ शकतो उदा- संकेतस्थळ पाहण्यासाठी परवलीचा शब्द ठरवु शकतो)

) जी-बुस्ट -
           आपण आपल्या संगणकावर बरीच कामे करतो. बर्याच वेळेला गेम देखील खेळतो पण काही वेळेस मोठ्या आकाराच्या गेम्स नीट चालत नाहीत. (उदा- मध्ये मध्ये अडकणे, संगणक बंद पडणे इत्यादी) संगणकातील 'रॅम' कमी असलेल्यांना ह्या समस्या मुख्यत्वाने भेडसावतात. अशा वेळी जी-बुस्ट आपल्या मदतीला येते. जी-बुस्ट चालु असलेल्या अनावश्यक प्रोग्राम्स ना तात्पुरते बंद करते आणी गेम्स सारख्या जास्त रॅम वापरणाऱ्या प्रोग्राम्सना जागा करून देते. तुम्ही गेम सोडुन इतरही प्रोग्राम्ससाठी जी-बुस्ट वापरू शकता.           
) फॉरर्मेट फॅक्तरी -
           आपण संगणकावरून काही साहित्य आपल्या भ्रमणध्वनीमध्ये स्थलांतरित करून पहिले असता काही वेळेला 'फाईल नॉट सपोर्टेड' असा संदेश झळकतो. जास्त करून हा संदेश चलचित्रांच्या बाबतीत झळकतो कारण भ्रमणध्वनीवर ज्या फाईल्स चालु शकतात त्या फक्त थ्री जी.पी आणी एम.पी फोर अशा प्रकारच्या असतात आणी संगणकावर बर्याच (जवळ जवळ सगळ्याच प्रकारच्या फाईल्स चालतात) अशा वेळी फॉरर्मेट फॅक्तरी आपली मदत करते. आपण संगणकावर चालणाऱ्या (उदा- .वी.आय) अशा प्रकारच्या फाईल्स फॉरर्मेट फॅक्तरी वापरून भ्रमणध्वनीवर चालणाऱ्या (उदा- थ्री जी.पी) फाईल्स मध्ये रूपांतर करू शकतो. फॉरर्मेट फॅक्तरी मध्ये बर्याच प्रकारच्या (उदा-छायचित्रे, चलचित्रे) फाईल्सच्या रूपांतराची सुविधा दिली आहे

१०) गुगल इनपुट -
           आपण जेंव्हा संगणकावर मराठीत लिहितो तेंव्हा बर्याचदा ऑनलाइन साधनांचा वापर करतो. गुगल इनपुट मात्र तुम्ही इंटरनेटचा वापर न करता देखील मराठीत लिहु शकतो. गुगल इनपुट मध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाषांमध्ये लिहु शकता (उदा- मराठी, हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नड इत्यादी) आणी लिहिताना भाषा बदलण्यासाठी फक्त दोन टिचक्या द्याव्या लागतात.

११) व्ही.एल.सी मिडिया प्लेयर -
            फॉरर्मेट फॅक्तरीच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे संगणकावर बर्याच प्रकारच्या फाईल्स चालतात परंतु संगणकातील मुख्य मिडिया प्लेयर सर्व फाईल्स चालवु शकत नाही. काही फाईल्स ह्या भ्रमणध्वनीवर चालणाऱ्या असतात. पण तरी देखील तुम्ही व्ही.एल.सी मिडिया प्लेयर चा वापर करून भ्रमणध्वनीवर चालणाऱ्या फाईल्स संगणकावर पाहु शकता. चलचित्र फाईल मध्ये
जर सुविधा असेल तर तुम्ही यात हव्या त्या उपलब्ध भाषांपैकी चलचित्रे पाहू शकता (एकु शकता). इतर बर्याच सुविधा यात पुरवण्यात आल्या आहेत.

रवि भापकर ,जामखेड