शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय पोषण आहार 3 - एक महिन्यासाठी

या शीटचा वापर करून आपले शालेय पोषण आहार रेकॉर्ड अद्ययावत ठेऊ शकतो, तसेच महिना अखेरीस केंद्रात माहिती देताना करावी लागणारी आकडेमोड वाचते. डायरेक्ट प्रिंट काढली की काम झाले. ही एक्सेल फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410WkFkM2ZvMEcxLVk
Unprotect पासवर्ड - month

सूचना :-


1. ही फाईल मोबाईल वर देखील वापरता येईल.

2. INPUT या पानावर आपल्या शाळेचे नाव, केंद्राचे नाव महिना व वर्ष टाकावे. महिना व वर्ष निवडण्यासाठी Dropdown मेनू दिलेला असून त्यातून निवडावे. आपल्या जिल्ह्यातील मान्य प्रमाण बदलून घ्यावे.

3. सर्व शीट एकमेकाशी लिंक केलेल्या आहेतत्यामुळे कोणतीही शीट Delet करू नये.

4. 1-5 धान्यादी आणि 6-8 धान्यादी याच शीटवर आपल्याला माहिती भरायची आहे, पण फक्त आकाशी रंगातील सेल मध्येच माहिती भरता येईल. इतर आकडेमोड व सेलमधील माहिती आपोआप भरली जाईल.

5. धान्यादी मालाच्या शीटवर माहिती भरताना डाळीचा प्रकार निवडण्यासाठी Dropdown लिस्ट दिली आहे, त्यातून योग्य ती निवड करावी.

6. आपल्याला आवश्यक आहेत तेवढेच डाळींचे कॉलम शिल्लक ठेऊन बाकीचे कॉलम  hide केले तरी चालतील.

7. शीटला सूत्रे व लिंक दिलेल्या आहेत त्यामुळे काम करत असताना चुकून सूत्रे डिलीट होऊ नयेत म्हणून शीट पासवर्ड प्रोटेक्टड केलेली आहे. आपल्याला अनप्रोटेक्ट करायची असेल तर त्यासाठी month हा पासवर्ड वापरावा