शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

म्युचलफंडची गुंतवणुक सर्वसामान्यांनसाठी सुवर्णसंधी

म्युचलफंड गुंतवणुक ही दोन प्रकारची ती खालील प्रमाणे

) एकत्रित गुंतवणुक करणे म्हणजेच एकाचवेळी सर्व गुंतवणुक  करून वाट पहाणे.
 उदा:-   समजा आपण एकत्रित १लाख गुंतवले ज्या तारखेला लाख गुंतवले त्या तारखेला unit ची किंमत २००  असेल तर ५०० unit आपल्याकडे जमतिल. गुतंवणुक केलेली रक्कम आपण कधीही काढुन घेवु शकतो. गुतवणुक परत घेताना unit ची किंमत ही जर २५० असेल तर लाख २५००० मिळतिल. ( पण गूंतवणुक करते वेळीस शेअर बाजार निर्देशांक खाली असणे गरजेचा आहे तरच मोबदला मोठ्या प्रमाणात होतो चक्रवाढ व्याज ही मिळते. म्हणुन जोखिम जास्त असण्याची शक्यता आहे. )

) दुसरी गुंतवणुकीची पद्धतही थोडीशी वेगळी आहे ही पद्धत सर्व सामान्यांनसाठी अप्रतिम आहे.

ही गुंतवणुक ही आपण दरमहा करु शकतो. यात जोखिमही फार कमी आहे. गुंतवणुक आपण कधीही काढून घेवु शकतो.

उदा:- आपण गुंतवणुक ही दरमहा म्हणजेच समजा १००० रु गुंतवणुक करत आहोत त्या वेळेस unit ची किंमत १५० असेल तर दरमहा unit जमतील जर unit चा दर वाढला तर अगोदरील महीन्यात घेतलेले unit नफ्यात असतिल जर unit ची किमंत घटल्यास नविन महीन्यात घेतलेले unit हे सरासरीच्या हीशोबाने फायद्यातच असतिल हे नक्की.
यात चक्रवाढ व्याज ही मिळतेच (यात जोखिम फार कमी असते )

गुतवणुकदाराचे पँनकार्ड आधारकार्ड फोटो बँकेत खाते असणे गरजेचे.


पैसे हे दरमहा जमाखात्यातुन वजा करुन गुंतवणुक केली जाते त्याच जमाखात्यात जमा केली जाते.