शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आधार नंबर व नाव पॅनकार्डला कसे जोडावे ?

1. नेटचा वापर करून :-
प्रथमतः खालील लिंकला टच करुन ओपन करा

येथे क्लिक करा

सदरील माहीती भरणे अत्यंत आवश्यक आहे.तसा संदेश टॅक्स विभागाने तुमच्या रजीस्टर केलेल्या नंबरवर पाठवलेला आहे.

👉पॅन नंबर टाका (अचुक )

👉आधार वरील नाव टाकावे.(जसे आहे तसेच टाकावे)

👉आधार नंबर टाका.

👉 त्या नंतर कॅपचा टाकावा .(अचूक)

👉त्यानंतर लिंक अाधार या टॅबला टच करावे.अशा पध्दतीने आपले आधार माहीती पॅनला जोडल्याचा संदेश स्र्कीनवर येईल

👉 ज्यांची माहीती लिंक होणार नाही त्यांना ओटीपी येईल तो टाकणे अवश्यक

अशा पध्दतीने लिंकवर क्लिक करून सबमीट करा माहीती जोडली गेलेली असेल. 

2. SMS च्या सहाय्याने :-

आपल्याकडे नेट सुविधा नसेल तर आपण मेसेज पाठवून देखील आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकतो. त्यासाठी खालीलप्रमाणे SMS टाईप करा -

UIDPAN (स्पेस) तुमचा आधारकार्ड नंबर (स्पेस) तुमचा पॅन कार्ड नंबर

वरीलप्रमाणे टाईप केलेला SMS 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.