शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भारतीय स्वातंत्रदिन - 5


                मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
    विषमतेने दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासागर, लोकहितवादी, दयानंद सरस्वती, . फुले, न्या, रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला, लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.


वरील भाषणाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410dWgwNHdyY0RxQ3c