शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

गुरूदक्षिणाशाळेच्या पहिल्या दिवशी
पाखरं माझी लवकर येतील
माझी मॅडम येईल म्हणून
वाटंकडं पाहत बसतील   प्रश्न नजरेत उभा राहिल
   कुठं गेली माझी आई?
   भिरभिरणाऱ्या नजरांनी
   मन मात्र गलबलून जाईलकसं सांगू बाळांनो 
बदली माझी झालीय
तुमच्या माझ्या प्रेमाची 
वाटणी बदलीनं केलीय   साथ तुमची माझी
   फक्त एवढीच राहील
   आठवणींची शिदोरी मात्र
   तुमची सोबत घेऊन जाईननव्या बाई येतील
त्याही तुमच्या आईच होतील
युगायुगांचे ऋणानुबंध
त्याही पुढे चालवतील   खूप शिका बाळांनो
   खूप खूप मोठे व्हा
   यश किर्तीचा सुगंध तुमच्या
   जगभरात दरवळू द्यात्या सुगंधी वाऱ्याने 
जग सारे मोहू द्या
हीच माझ्या प्रेमाची 
गुरूदक्षिणा मला द्या
गुरूदक्षिणा मला दया