शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday, 27 March 2023

मी तंत्रस्नेही होणारच - ऑनलाइन मार्गदर्शन बॅच -2

 🏆 मी तंत्रस्नेही होणारच ! 🏆

             ❇️ बॅच - 2  ❇️

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो 🙏

                 आपण शाळेत काम करत असताना नेहमी आपल्याला कसली ना कसली माहिती मागवली जाते. बऱ्याच वेळेला ती सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी मध्ये द्या अशी मागणी केली जाते. अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक भराव्या लागतात. शाळेची पोर्टल तर डझनभर झाली आहेत. या डझनभर पोर्टलवर नेहमी काम करावे लागते. याशिवाय विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे, ऑफिस कडून आलेल्या एक्सेल मध्ये माहिती भरून पुन्हा पाठवणे अशी अनेक कामे आपल्याला करावे लागतात. आपल्यातील काही बंधू-भगिनींना तंत्रज्ञानाची काहीच माहिती नसल्यामुळे अशी कामे करताना फार अडचणी येतात. त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. यामुळे एक तर कामे वेळेत होत नाहीत, किंवा झाली तर त्यामध्ये चुका होण्याची शक्यता असते. ही कामे करून घेण्यासाठी आर्थिक झळ सहन करावी लागते ती वेगळीच... ! 

                 म्हणूनच, शिक्षक बंधू भगिनींच्या मागणीमुळे मी तंत्रस्नेही होणारच हा ऑनलाइन मार्गदर्शनाचा उपक्रम आपण हाती घेतला आहे. पहिली बॅच 20 मार्चपासून सुरू झाली. या बॅचमधील सदस्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया या ऑनलाइन मार्गदर्शना बद्दल दिल्या आहेत. ज्यांना काही जमत नव्हते, किंवा आपल्याला जमू शकते असा आत्मविश्वास ही नव्हता असे शिक्षक बंधू भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. तेव्हा आपणही याच विचारात असाल की- 

मला हे जमेल का ?

                 याचे उत्तर आहे, होय, नक्की जमेल. कारण ज्यांना काहीही जमत नाही अशा बंधू-भगिनींना डोळ्यासमोर ठेवून अगदी सोप्या भाषेत अगदी प्राथमिक अवस्थेपासून ऑनलाइन मार्गदर्शन केले जाते. या बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचा वेगळा व्हाट्सअप ग्रुप तयार करून झालेल्या भागावर काही अडचणी येत असतील तर चर्चा केली जाते. आवश्यक तिथे मार्गदर्शन केले जाते. 

शिक्षक बंधू भगिनींच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे -

❇️ प्रश्न 1- मार्गदर्शन कसे होणार ?

उत्तर - हे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने होईल.  मार्गदर्शन वर्गासाठी नोंदणी करणाऱ्यांचा एक वेगळा ग्रुप तयार केला जाईल. त्या ग्रुप वर दररोज ऑनलाईन सेशनची लिंक, आयडी व पासवर्ड पाठवला जाईल. त्या लिंक वर क्लिक करून जॉईन व्हायचे आहे. 

❇️ प्रश्न 2- वेळ किंवा कालावधी किती ?

उत्तर - मार्गदर्शनाचा कालावधी तीन महिन्याचा असेल. या तीन महिन्यात दररोज सायंकाळी एक तास ऑनलाईन सेशन घेतले जाईल. आठवड्यातील दर रविवारी सेशनला सुट्टी असेल.

❇️ प्रश्न 3- नेमके काय शिकायला मिळणार ?

उत्तर - शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून करावी लागणारी सर्व ऑनलाइन कामे, शाळेची सर्व पोर्टल, विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरणे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पावर पॉइंट (PPT), PDF , व्हिडिओ तयार करणे, यूट्यूब चैनल तयार करणे व व त्यावर व्हिडिओ अपलोड करणे, ऑनलाइन चाचण्या तयार करणे, मोबाईल मधील बहुपयोगी ॲप्स स्मार्ट वापर आणखी याशिवाय बरेच काही.

❇️ प्रश्न 4- काही अडचणीमुळे एखादे सेशन पाहायला जमले नाही, किंवा एखादा भाग समजला नाही तर ?

उत्तर - एक तासाच्या सेशन मधील महत्त्वाचा भाग रेकॉर्ड केला जाईल. हे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाईल. अडचणीमुळे चुकलेले सेशन किंवा न समजलेला भाग व्हिडिओ पाहून सराव करता येईल. काही अडचणी असतील तर ग्रुप वर शंका विचारता येतील. आपल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.

❇️ प्रश्न 5- बॅच कधीपासून सुरू होणार  ?

उत्तर- 1 एप्रिल 2023 पासून दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत. 

❇️ प्रश्न 6- बॅच 2 मध्ये नाव नोंदणी कशी करावी ?

उत्तर - संपूर्ण तीन महिन्यासाठी नाममात्र शुल्क 1000 रु. आहे. यामध्ये पूर्ण एक वर्षाचा सपोर्ट मिळेल. म्हणजे एकदा 1000 भरून आपली नाव नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्याचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि त्यानंतरही पूर्ण एक वर्षापर्यंत आपल्याला मदत मिळेल. या बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर 1000 रु. गुगल पे किंवा फोन पे द्वारे पाठवावेत. त्याचा स्क्रीन शॉट काढून याच नंबरला वैयक्तिक पाठवावा. स्क्रीन शॉट सोबत आपले पूर्ण नाव, आपल्या शाळेचे नाव, तालुका व जिल्हा ही माहिती टाईप करून व्हाट्सअप वर पाठवावी. आपल्याला लगेच बॅच दोनच्या ग्रुप मध्ये ऍड केले जाईल.

सपर्क- पी.डी शिंदे सर 9011116046

Google pay/ Phonepe / WhatsApp No. 9011116046

Account Name - Vidya Shinde

मर्यादित फक्त 50 शिक्षकांची बॅच केली जाणार असल्यामुळे, ज्यांची नाव नोंदणी अगोदर होईल त्यांना प्राधान्य दिले जाईल.