शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

मैत्रीचे रहस्य



एक जंगल होते. जंगलात दोन वाघ होते.
दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात.
एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो.
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".
वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल".
सांगायचं एवढंच,

"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल".