शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

रामबाण औषध


एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा  करायला जंगलातील  प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली सिंहाचे कान भरायला सुरुवात केली  ती अशी.
  लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली म्हणाला , विचार काय विचारायचे ते .
  तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह   म्हणाला . महाराज  या प्राण्यांमध्ये मला  कोल्हा  दिसला नाही .  नाही मी सहज  विचारलं या कोल्ह्याला  महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला  वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे  म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे  नंतर काय  ते बोलावे. महाराज  आजपर्यंत एवढे  पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो ते  औषध  शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे.
 सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम  असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल .  त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.
तात्पर्य :-कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम !