शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

वक्ता आणि श्रोते


एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष् सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष् ऐकू लागले. वक्ता म्हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस् इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ् त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही

त्याच्यात होती पण तो अलिकडच्याच
तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.


तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो